चिनाब पार करायला तिने उडी टाकलीय कारण तो वाट बघतोय तिची, नेहमीप्रमाणे. कालमेघांनी दाटलेला अवकाश, नदी रोरावते आहे पण तिला चैन कुठली? आयुष्यभरासाठी साथ तर गमावलीच आहे, हे जे चार क्षण मिळतात प्रेमाचे, त्यावरच तर जगतेय ना ती.
ती हातातल्या घड्याला विनंती करते आहे “घेऊन चल मला.”
पण कच्चं मडकं करणार तरी काय? हा रौद्र प्रवाह त्याचं अस्तित्व विरघळवून टाकायला कितीसा वेळ लावणार आहे? स्वतःच्या जीवाची पर्वाच नाही त्याला. ज्याला स्वतःची खात्री उरली नाही, त्याचा काय भरवसा, हे तिला कुठं समजतंय?
कच्ची मेरी मिट्टी, कच्चा मेरा नाम नी
हाँ मैं नाकाम नी
कच्चैयां दा होगा कच्चा अंजाम नी
है गल आम नी
कच्चैयां ते रख्खियें ना उम्मीद पार दी
अड़िये, अड़िये, हां नी अड़िये
“नको ना गं हट्ट करुस. बघ तरी लाटा कश्या उसळतायत. तसंही अर्ध्या मुर्ध्या तयारीने कधी कोण पल्याड लागलंय?”
“मागे फिरायचं? तो वाटेकडे डोळे लावून बसला असताना? असतील लाटा उंच. तू नको घाबरू. ही नदी नाही अडवू शकत मला. असं नाही तर तसं, त्याच्याकडे जायचंच आहे.”
तिचा निर्धार पाहून घड्याला तरी कुठं शांत बसवतंय.
“चल बाई, पकड घट्ट. माझी सोबत नाही होणार शेवटपर्यंत कदाचित, पण मार्ग तरी दाखवू शकतो ना? चल.”
घडा तर केव्हाच गिळंकृत झाला. पण तिच्या चेहऱ्यावर समाधान पसरलंय कारण त्याचा हात हातात आहे. तिला अर्ध्यावर सोडून जाण्यासाठी थोडाच परत आला होता तो. तिचा घास घ्यायला टपलेल्या त्या दुष्टेनेच एकत्र आणलंय दोघांना. त्याच्या नावाचा बट्टा नको होता ना तुमच्या खानदानापुढे? तुम्ही विलुप्त झालात काळाच्या गर्तेत, पण त्याचं नाव जोडलं गेलंय आता तिच्याशी, कल्पांतापर्यंत.
संदर्भ : Coke Studio Pakistan ने प्रस्तुत केलेले 'पार चना दे'
फार सुंदर लिहिलय.. सोणी
फार सुंदर लिहिलय.. सोणी महिवाल ची गोष्ट आहे ना ही. एक अजरामर प्रेम कहाणी
मागे कधीतरी अर्निका या id ने लिहिलेलं या गाण्याचं रसग्रहण वाचलं होतं. तेव्हापासूनच माझं आवडतं गाणं आहे हे
सुंदर लिहिलय.
सुंदर लिहिलय.
'पार चना दे'
सुंदर रसग्रहण!
खूपच सुंदर आहे गाणं. आधी ऐकलं
खूपच सुंदर आहे गाणं. आधी ऐकलं नव्हतं. धन्यवाद इथे लिहिल्याबद्दल!
माझेमन यांनी वर केलेले सुंदर
मूळ गाण्याची लिंक मिळेल का?
गाणे ऐकण्यापेक्षा मला हे
गाणे ऐकण्यापेक्षा मला हे रसग्रहण आवडले.गाण्यातील शब्द कळत नव्हते.
छान, तरल लिहिले आहेस.
छान, तरल लिहिले आहेस.
छान लिहिलं आहे. गुलजार यांची
छान लिहिलं आहे. गुलजार यांची 'रावीपार' नावाची कथा आठवली. डेंजर आहे ती पण.
आवडलं....
आवडलं....
मस्त लिहिलेय.
मस्त लिहिलेय.
गाणे तर अफलातुन बनले आहे. नुरी मधले दोघे भाऊ व त्यांची आई गाण्यात आहे व आपली शिल्पा राव. तो सगळा सिजन नुरीनेच गाजवला होता.
सुंदर रसग्रहण!
सुंदर रसग्रहण!
सुंदर रसग्रहण!
सुंदर रसग्रहण!