खरतर मला चित्रपट पाहायचा तसा फार मोह नाही. पण कधी कधी एखाद दृश्य बघताना जर त्यातील काहीतरी नवीन वाटलं तर निश्चितच मी चित्रपट बघतो. ठरवून असं मुद्दामच नाही. परवा असाच एका दाक्षिणात्य चित्रपटाचा एक सिन पाहिला. थोडं काहीतरी वेगळं वाटलं म्हणून चित्रपट पण पाहिला. अप्रतिम ..! त्याची कथा तर अप्रतिम होतीच , अभिनय हि अप्रतिम होता. अर्थात मी तो हिंदीमध्ये भाषांतरित केलेला पाहिला होता. आणि नावही माहित नव्हतं. त्यातील अभिनेते ओळखीचेवाटले पण त्यांची नावे माहित नव्हती. मला कथानक खूप आवडलं. त्यातील सुरुवात आणि शेवट मला नाही पाहता आला , पण आता तो शोधावा कसा हा मोठा प्रश्न होता. गुगल गुरुजींनी आपलं काम खरंच खूप सोपं केलं आहे मी मला जे माहित होत ते विचारत गेलो आणि शेवटी त्या चित्रपटाचे नाव कळलं .
नाव होत - "९६"
आता एखादा क्रमांक चित्रपटाचं नाव ? तर हो . मग मी वेळ काढून मुद्दाम त्यातील राहिलेले सिन पाहिले. आणि जाणवलं कि -कुछ तो बात है इसमे ..!
कथानक सुरु झालं एका पुरातन वास्तूचं फोटोशूट करण्यापासून. नायक जो आहे तो प्रवासी फोटोग्राफर असतो. आणि त्याच एक स्वतःच ट्रैनिंग सेंटर आहे. जिथे तो आपल्या विद्यार्थ्यांना फोटो शूट बद्दल मार्गदर्शन करतो. ह्या जुन्या वास्तूमध्ये फोटो शूट करतानाचे बारकावे सर्वाना सांगत असतो. सगळ्यात असूनही अलिप्त असतो तो. त्यांच्यातच बसून जेवतो आणि त्यांना वेगवेगळ्या टिप्स पण देत असतो. रात्री उशीर झाल्यामुळे तो ड्रायविंग करायला खूपकंटाळला असतो आणि आपल्या विदयार्थ्यांना विचारतो कोणी चांगली ड्राईव्ह करू शकतो का? मला एका ठिकाणी जायचं आहे , आणि मला खूप थकवा आल्याने मी ड्राईव्ह नाही करू शकणार . एक विद्यार्थिनी तयार होते. तिला हे सर फार आवडत असतात , यांच्याविषयी खूप आदरहि असतो.
ती खूप सांभाळून सरांना नेत असते. एका वळणावरती नायक म्हणतो वेगळ्या रस्त्याला ने,कारण तो शॉर्टकट आहे . ती म्हणते कि गूगलने रस्ता वेगळा दाखवला आहे , तर तो तिला तिकडे का नेण्यास सांगतो हे कळत. त्याच गाव, त्याची शाळा तिथे असते. मग त्या गावातील आठवणी जाग्या होतात. शाळेतील रखवालदार भेटतात, ते वयस्कर झालेले असतात. खूप खूप आठवणींचा अलबम उघडला जातो. नायकाला जाणवत , आपल्याला या सर्वाना एकदा भेटलं पाहिजे. मग मित्रांचे संपर्क सुरु होतात . आणि २ महिन्यानंतर स्नेहमेळावा ठरतो.
थोडं फ्लॅशबॅक आहे आता. चित्रपटाचं नाव ९६ कारण तो १०वीचा १९९६ चा वर्ग असतो आणि आता हे सर्व २० वर्षांनी एकत्र येत असतात. हे सगळं घडताना व्हाट्सअप ग्रुप मुळे एकमेकांचे सध्याचे चेहरे दिसतात , खूप गमती जमती होतात . आणि अखेर तो दिवस येतो.एका टेबलवर नायक आणि २-३ मित्र- मैत्रिणी बसलेल्या आहेत. आणि आता जेवायचं कधी विषय आल्यानंतर ज्याने सर्व अरेंज केलं असत तो म्हणतो अजून एकजण यायची आहे, कोण - "जानकी". इथे खरी कथानकात रंगत येते. जानकी नाव ऐकल्याबरोबर जो आपला नायक आहे त्याचा चेहरा एकदम बदलतो. (आपल्या नायकाच नाव आहे -राम ) . आता हि मागची कहाणी काय आहे , किती रंजक आहे हे सर्व चित्रपटातच पाहायला पाहिजे. मी ती सांगून त्यातील रहस्य उलगडणार नाही. पण एक नक्की सांगेन, यात जी काही निरागसता दाखवली आहे , ती खरंच बघा. कदाचित वाटेल हि तर नेहमीची प्रेमकहाणी आहे. पण तस नक्कीच नाही. हि कहाणी तशी म्हटलं तर पूर्ण आणि आणि म्हटलं तर अपूर्ण हि आहे. तस पाहिलं तर फक्त स्नेहमेळाव्याच्या दिवशीची कथा निम्म्याहून अधिक आहे. आणि याचा शेवट खूप काही सांगून जातो.
९६ - एक चित्रपट आस्वाद
Submitted by विश्राम कुलकर्णी on 17 January, 2024 - 06:39
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
खरच खुप छान चित्रपट आहे . मी
खरच खुप छान चित्रपट आहे . मी पाहिलाय.
मी ही पाहिलाय..
मी ही पाहिलाय..
फारच सुरेख आहे ९६. थंड
फारच सुरेख आहे ९६. एक निरागस कहाणी उत्तमरीत्या पडद्यावर सादर केल्याबद्दल दिग्दर्शकाचे विशेष कौतुक. विजय सेतुपती आणि तृषाचा अभिनय उत्तम आहे. तृषाला मी आत्तापर्यंत ग्लॅमरस भूमिकेत बघितले आहे. या भूमिकेत ती मला जास्त आवडली. विजय सेतुपती तर छा गया हैं. हा मी पाहिलेला त्याचा पहिलाच चित्रपट. गोविंद वसंतचे संगीतही विशेष उल्लेखनीय आणि कथेला पूरक आहे. एकही शब्द न समजला नाही तरी 'इरविंग थीवाय'ने मनावर गारुड केले.
*** स्पॉयलर अलर्टसह ****
एकेमकांपासून दूर गेल्यानंतर काही वर्षांनी भेटतानाची अस्वस्थता, केवळ गैरसमजाने दुरावलो हे कळल्यानंतरचा आक्रोश, 'वो अफसाना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन'चा संयत स्वीकार आणि तरीही एकमेकांविषयी वाटणारी इंटेन्स ओढ विजय सेतुपती आणि तृषाने प्रभावीपणे व्यक्त केली आहे.
साधारण 'ती सध्या काय करते'सारखी स्टोरीलाईन असली तरी हा पिक्चर अतिशय सटल आणि प्रेमकथेवर भर देणारा आहे.
प्राईमवरती काल दिसलेला.
प्राईमवरती काल दिसलेला. पहावासा वाटतोय. उत्तम ओळख.
छान ओळख!
छान ओळख!
वा, छान ओळख. परफेक्ट उत्सुकता
वा, छान ओळख. परफेक्ट उत्सुकता वाढवमारी, बघायला हवा. धन्यवाद
अतिशय सुरेख पिक्चर....आवडत्या
अतिशय सुरेख पिक्चर....आवडत्या मुव्हीज च्या लिस्ट मध्ये आहे. ट्रेन/ मेट्रो मधल्या गाण्याच्या शेवटी जेव्हा एअरपोर्ट दिसतो तेव्हाचे expressions अफाट आहेत दोघांचे..फार सुरेख गाणं आहे ते...
म्युझिक सुद्धा खूप छान..स्पेशली get-together chya वेळेस त्रिशाची एन्ट्री होते तेव्हाच...ती माझी रिंग टोन आहे..
छान ओळख करून दिलीयं
छान ओळख करून दिलीयं चित्रपटाची..!
छान ओळख !
छान ओळख !