हिंदी चित्रपटसंगीताचा प्रवास
या धाग्यावरील प्रतिसादांतून प्रेरणा घेऊन त्याबद्दल चर्चा करण्यासाठी धागा.
संगीतकार, गीतकार, गायक, वादक, गाण्याचं टेकिंग, या विषयावरची किंवा संदर्भ आलेली पुस्तके, यु ट्युब चॅनेल्स, ऐकावेत असे रेडियो कार्यक्रम, कोण श्रेष्ठ यावरून हमरीतुमरीवर येणे, कोणावर अन्याय झाला आणि कोणाचे वाजवीपेक्षा जास्त कौतुक झाले, इ.इ.
सुरुवात सुरुवातीपासून म्हणजे पार्श्वगायन सुरू व्हायच्या आधीच्या काळात पडद्यावर दिसणारे लोक स्वतः गाणी म्हणत तेव्हापासून करूया.
नमस्कार,
नुकतेच एक जुने हिंदी भक्तीगीत ऐकायला मिळाले.
मुझीमे रहके मुझीसे दूर,
ये कैसा दस्तूर रे मालिक ये कैसा दस्तूर
सन १९७२-७३ ची गोष्ट. महालक्ष्मीच्या फेमस स्टुडीओमधे "वचन" या चित्रपटाच्या गाण्यांचे (कैसी पडी मार) रेकॉर्डींग चालले होते. फावल्या वेळात संगीतकार शंकर (एस्.जे.) हे एका निवांत जागी पान जमवत बसले होते. भोवती शारदा आणि ईतर गोतावळा होताच. ईतक्यात मशहूर ट्रंपेटवादक पं. रामप्रसाद शर्मा (प्यारेलालजींचे वडील) तिथे आले. शंकर-जयकिशन (जयकिशन तोपर्यंत हे जग सोडून गेले होते) हे ईंडस्ट्रीतल्या बर्याच जणांचे श्रद्धास्थान. त्यामुळे सहाजिकच शंकरजीना बघून ते थांबले. नमस्कार्-चमत्कार झाले. बोलता-बोलता लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचा विषय निघाला. शंकरजींच्या आजूबाजूचे चमचे (शारदा सकट) अकारण कुचेष्टा करण्यात रमले.
माझे काहि आफ़्रिकन मित्र, भारतीय हिंदी सिनेमांचे चाहते आहेत. त्यांना त्यात नेमके काय आवडते
असे मी विचारल्यावर, ते म्हणाले कि आम्हाला गाणी आणि नाच आवडतात. (अर्थात ढिशुम ढिशुम
फायटींग पण खुप आवडते.)
मला जरा नवल वाटले कारण आजकाल जे सपाटीकरण झालय त्यात, कुठल्याही देशांतील नाचात
फारसा फरकच राहिलेला नाही. अगदी खरं सांगतो, आफ़्रिकेतील लोकनृत्ये आणि आजकालच्या
हिंदी चित्रपटातील नाच, यात भाषा सोडली तर फार फरक नाही. उलट आपले कलाकारच जोशपूर्ण
हालचाली करण्यात कमी पडतात असे वाटते.
नवीन संकलनाचे तंत्र आणि कुशल नृत्यदिग्दर्शक आल्यामूळे हिंदी चित्रपटातील नृत्ये, देखणी