हम आपके है कौन ही एका लग्नाची कॅसेट असेल तर जानी दुश्मन ही अनेक लग्नांची कॅसेट आहे. यात किमान ८ लग्नं आहेत. फरक इतकाच की हआहैकौ मधे एकाच लग्नात खूप गाणी वाजतात आणि इथे एकच गाणं सगळ्या लग्नांत. शिवाय हा चित्रपट स्थळकाळाच्या मर्यादा ओलांडून गेला असून यात पॅरलल युनिव्हर्सची संकल्पना पण मांडली गेली आहे. राजकुमार कोहलीला आद्य सायफाय मूव्हीमेकर असं सर्टिफिकेट मिळावं याची मी शिफारस करते.
सुरूवातीलाच एका मोटारीतून विक्रम (ज्यूली फेम!) त्याच्या बायकोबरोबर ट्रेन स्टेशनवर जाताना दिसतो. त्यात त्याला काही नको ते चाळे करावेसे वाटतात. ड्रायव्हरने बघू नये म्हणून तो एकदम तीन सिगार शिलगावतो. पण ड्रायव्हर असतो मॅकमोहन. तो आरसा अॅडजस्ट करून आपणही कमी नाही हे दाखवतो. तेवढ्यात गाडी होते पंक्चर - ती ही बरोब्बर एका हवेलीच्या समोर. आपण चुकून रामसेपट तर लावला नाही ना याची मी इथे खात्री करून घेतली. हवेलीत कुणी नसतं. पण जिन्यावरून धुळीत पावलांचे ठसे उमटवत कुणीतरी अदृष्य खाली येतं आणि फोटोतून रजा मुराद स्वतःची ठाकूर ज्वालाप्रसाद अशी ओळख करून देतो. विक्रमच्या बायकोकडे हावरटपणे पाहून तो अचानक स्वतःच्या लग्नाच्या पहिल्या रात्रीची गोष्ट सांगायला लागतो. अरे, विचारलंय का तुला? तर सुहागरातीला ज्वालाप्रसादला त्याची बायको अगदी खुलभर दुधात विष कालवून देते. त्याच्यासमोर ती ते विष ग्लासात ओतते तरी त्याला दिसत नाही. यालाच वासनांध म्हणत असावेत. ते दूध पिऊन ज्वालाप्रसाद वेडीवाकडी तोंडं करायला लागतो आणि त्याने अज्ञानात मरू नये म्हणून बायको सांगते की मी आता तुझा पैसा घेणार आणि मला आवडणार्या माणसासोबत सुहागरात मनवणार. अशी क्लॅरिटी हवी! ठाकूर बदला घेण्याचं नक्की करून सुखाने मरतो पण त्यानंतर स्वतःच्या बायकोचं काही बरंवाईट करण्याऐवजी तो शादी के लाल जोडे में कुठलीही बाई दिसली की तिला मारत असतो म्हणे. आता हे सांगायला फोटोतून बाहेर यायची काय गरज? पण तो येतो. विक्रम आणि बायको पळतात आणि बाहेर येऊन बघतात तर गाडी गायब. आता याच हवेलीच्या जवळपास एक जंगल असतं. तिथे अमरीश पुरी एका दुल्हनला पळवून आणतो. त्याचं तिच्यावर प्रेम असतं. दुल्हन म्हणते पण माझं प्रेम नाहीये. तेवढ्यात ज्वालाप्रसाद तिथे येतो आणि अमरीशच्या शरीरात शिरतो. एकदम खूप वादळी वारा सुटतो. ज्वालाप्रसादचं नशीब जोरावर असावं -एक दुल्हन निसटली तरी फिकीर नाही, दुसरी हजर! पछाडला गेल्यानंतर अमरीश फँग्ज असलेल्या अस्वलासारखा दिसायला लागतो. का? कोण जाणे! तो ज्वालाप्रसादसारखा दिसायला लागला तरी ठीक एकवेळ, पण व्हाय अस्वल? मग तो त्या गीता नामे दुल्हनला मारायला आपला हात लांबचलांब करतो ( हे कोहलीकाकांचं ऑब्सेशन असावं - आठवा बीस साल बाद मधली डिंपल ). अस्वलाला न शोभणारे आवाज करत तो एक लाडीक चापटी मारल्यागत करतो आणि गीता गतप्राण होते. तेवढ्यात तिथे विक्रम आणि बायको तडफडतात आणि याला घाबरून पळत सुटतात. ज्वालाप्रसादचं बहुधा आंधळा मागतो एक डोळा सारखं होत असावं. पण एवढ्या केसांमधे त्याच्या चेहर्यावरचा आनंद काही दिसू शकला नाही. बायकोने लाल जोडा घातलेला नसूनही तो त्यांच्या मागे लागतो. मग वीज पडते, झाडाला आग लागते आणि विक्रम सपत्नीक निसटतो.
विक्रम आणि बायको स्टेशनला पोचतात. तिथे अचानक मॅक्या त्यांना त्यांची बॅग आणून देतो. तो पण भूत असतो का हे काही समजलं नाही. विक्रम आणि बायको ट्रेनच्या एका १८ बाय २५च्या प्रशस्त डब्यात (कुपे?) शिरतात. या डब्याच्या मधोमध दार आहे, एका साइडला समोरासमोर बाक आहेत आणि दाराच्या दुसर्या साईडला काहीही नाही! कदाचित या लोकांनी सगळा संसार या डब्यातून नेणं अपेक्षित असावं. त्यांच्या समोरच्या बाकावर अमरीश पुरी येऊन बसतो. गाडी सुटते. विक्रम बायकोला सांगतो की तू पहिल्यांदाच सासरी चालली आहेस तर शादी का जोडा घालून ये. उतरायच्या आधी घातला असता तर सासू रागवणार होती का? आमरस पुरी एक हॉरर स्टोरीज असं इंग्लिश पुस्तक वाचायला घेतो. या पुस्तकात वाचून तो माणसं भुतं कशी होतात, त्यांना मारायचं कसं वगैरे मौलिक माहिती देतोच पण त्याचबरोबर पछाडलेला माणूस ओळखायची पाच लक्षणं सांगतो -
१. अश्या माणसांना नेहमी घाम येतो
२. ते नेहमी ओठ चावत बोलतात
३. त्यांचे हातपाय थरथरत असतात
४. त्यांचे डोळे कधी उघडझाप करत नाहीत
५. ते आगीला खूप घाबरतात
या एका संभाषणात पूर्ण पिक्चरचं सार सामावलेलं आहे. हे पुस्तक भुतांवर पीएचडी करणार्यांना अभ्यासक्रमात कंपल्सरी करावं असं माझं मत आहे. यातलं काहीही आमरस पुरी करत नसल्याने विक्रमला शंका येत नाही. त्याची बायको लाल जोडा घालून येते. आता ट्रेनचा डबा अचानक छोटा होतो. आमरस पुरी अस्वल होतो आणि डोकं गरगर फिरवून दाखवतो. अस्वल पुरी हल्लाबोल करतो, मधेमधे येणार्या विक्रमला खिडकीतून खाली फेकतो आणि बायकोला ठार करतो. गाडी कुठल्याश्या फलाटाला लागते. पोलिस येतात आणि लाशें पाहतात. विक्रमच्या बायकोसोबत त्यांना अमरीश पुरीची पण लाश मिळते. आँ?? तिला पुरीने मारलं, आणि पुरीला??
पोलिस म्हणतात या एरियातला हा चौथा खून आहे. इथून जेव्हाही एखादी नवी दुल्हन जात असते, ती अशीच मरते. पुढच्याच सीनला अरूणा इराणीचं लग्न. लगेच गाणं सुरू होतं - चलो रे डोली उठाओ कहाऽर. हे वैतागवाडी गाणं इथून पुढे पिक्चरभर सग्गळ्या शादीयोंमें वाजत राहतं. अरूणा इराणीच्या वडीलांचा शत्रू असलेला डाकू तिची डोली पळवायचा प्लॅन करतो. त्या गावातून जायचा एकच रस्ता असतो आणि त्या रस्त्यावर एक मंदिर असतं. प्रत्येक डोली तिथे नमस्कारासाठी थांबते अशी महत्त्वाची माहिती डाकू आपल्याला देतो. पुजारी असतो प्रेमनाथ. तो सारखा घाम पुसत असतो. पहा, आलं ना पछाड लक्षण क्र. १ समोर? गुंड डोली लुटायला येतात तर दुल्हन गायब! कसं फसवलं? दुल्हन असते कुठल्याश्या कवट्या वगैरे असलेल्या गुहेत. तिच्यासमोर तेच आपलं अस्वल भूत. आता अस्वल पुरी मेल्यावर हे नवीन अस्वल कसं आलं? याचं उत्तर न देताच दुल्हनचा खेळ आणि सीन एकदम खल्लास!
दुल्हन गायब झाल्याची चर्चा गावकरी करत असताना तिथे छोटे ठाकूर शत्रुघ्न सिन्हा ओठ चावत (पछाड लक्षण क्र. २) घोड्यावर बसून येतो आणि म्हणतो दुल्हन काही सापडणार नाही आता. तेवढ्यात त्याला एक घोडा खोगीर वगैरे चढवून एकटाच पळत जाताना दिसतो. आवडला म्हणून शत्रू घोड्याचा पाठलाग करून त्याच्या गळ्यात फास टाकून त्याला पकडतो. तेवढ्यात कुठुनसा उडत येत त्यावर - म्हणजे घोड्यावर - सुनील दत्त बसतो. तो घोडा त्याचा असतो. शत्रू म्हणतो घोडा मला पाहिजे, हे पैसे घे. सुनील बाणेदारपणे नाकारतो. शत्रू मारामारी सुरू करणार इतक्यात मधोमध भांग पाडलेल्या पांढर्या केसांचा टोप घालून मोठा ठाकूर म्हणजेच संजीव कुमार मधे पडतो. शत्रूला तो हाकलून लावतो आणि सुनीलची माफी मागतो. या सगळ्यात आपल्याला समजतं की ठाकूर गावासाठी देवाचा अवतार आहे आणि शत्रू ठाकूरच्या लाडांमुळे वाया गेलाय.
आता आपल्यासमोर पाणवठ्यावर असलेल्या गावातल्या इतर प्रॉस्पेक्टिव्ह दुल्हन्या येतात. त्यातली एक असते नितू सिंग जी सुनीलची बहिण आहे. एक बिंदीया गोस्वामी जी शत्रूची बहिण आहे. तिसरी सारिका आहे जिचा जितू मूँ बोला भाई आहे. त्यांच्या फालतू बडबडीतून आपल्याला असं समजतं की सारिकाचं लग्न होऊ घातलंय म्हणून ती नागमोडी चालायला लागली आहे, बिंदीया सुनीलच्या प्रेमात आहे आणि नितू जितूची प्रेमिका आहे. अशी सगळी इक्वेशन्स नीट मांडल्यावर नितू तात्काळ पाणवठ्यावरून गायब होऊन जितू बरोबर गाणं गायला लागते. त्यांना तसं नाचताना सुनील पाहतो. पण सुनील इज अ प्रेमळ भैया! तो नंतर नितूवर खोटंखोटं रागवून प्रेमाने तिचं जितूशी लग्न करून देण्याचं मान्य करतो.
मग येते रेखा. ती असते अनाथ. हिच्या दुल्हन स्टेटस वर अजूनही प्रश्नचिन्ह असतं. तिचं शत्रूवर प्रेम असतं कारण त्याने तिला अतिप्रसंग होण्यापासून वाचवलेलं असतं आणि तिचा हात पकडलेला असतो. पण शत्रू म्हणे तो काही आयुष्यभरासाठी नव्हता पकडलेला. तरी ती दिलमें जगह चाही वगैरे यूपी स्टाईलमधे बोलत राहते.
सारिकाच्या लग्नासाठी गावकर्यांनी जमवाजमव केलेला दहेज आणि शादी का जोडा घेऊन जितू ठाकूर कडे त्याचा आशीर्वाद घ्यायला येतो. पण लाल रंगाचा जोडा पाहताच ठाकूरचे डोळे, डोकं, मान, ओठ सगळं थरथरायला लागतं. तेवढ्यात तिथे ठकुराईन येते आणि जोडा झाकते. ती सांगते की लाल जोडा पाहून हे असेच येडे होतात. तेव्हा ठाकूर शाल सावरत ( आणि शालीखाली हात आहेत हे दाखवत ) सांगतो की त्याच्या बहिणीचा होणारा नवरा वरातीतल्या घोड्याच्या टापांखाली चिरडून मेलेला असतो आणि ते ऐकून बहिण लाल जोड्यासहित आत्महत्या करते. त्या दिवसापासून त्याला हा त्रास होत असतो म्हणे. फ्लॅशबॅक संपवून ठाकूर सारिकाच्या लग्नाचा खर्च उचलण्याचं वचन देतो कारण तिला वडील नसतात.
या सगळ्या माहितीचा आपल्याला ओव्हरलोड आणि स्ट्रेस होईल असं वाटून कॉमिक रिलिफ करता सोनार असलेला जगदीप, न्हाव्याची मुलगी जयश्री टी आणि पेंटल हा प्रेम त्रिकोण मधेच टाईमपास करून जातात. ते काही फार महत्त्वाचं नाही.
मग सारिकाचं लग्न. कहार वालं कहर गाणं सुरू. तिथे आशीर्वाद द्यायला येतो ठाकूर. लाल जोडा पाहून त्याचे हात थरथरायला लागतात (पछाड लक्षण क्र. ३). ठाकूर थरथरत निघून जातो. मग आलास कशाला बाबा? डोली निघते. झाडीतून डोळे पाहतात. चॉकलेटी सुरवार घातलेले पाय अस्वलाच्या पायात बदलतात. पहिली दोन पावलं टाकताना अस्वलाची नखं नीट कापलेली असतात ती पुढच्या पावलात लांब होतात. डोली देवळाशी पोचते. तुफान येतं. प्रेमनाथ पुजारी म्हणतो डोली खाली ठेवा. तुफान संपल्यावर व्हायचं तेच होतं - दुल्हन गायब! दुल्हन कवट्यांच्या गुहेत. तिच्यासमोर डोकं फिरवून दाखवणारं अस्वल भूत. खूप पळापळ झाल्यानंतर दुल्हन कंटाळून मरते एकदाची.
आता येतो विनोद मेहरा. यात नक्की अजून किती माणसं येणारेत? कोहलींच्याच राजतिलकमधे माणसं निदान 'आ गये आ गये' म्हणत तरी येतात, इथे अशीच येतायत. तर विनोद ढिसाळ टोप, गचाळ दाढी आणि गलिच्छ कपड्यांसहित अवतरतो. त्याच्या दाढीला काहीतरी खाऊन सांडल्यागत कसलीशी पांढरी पेस्ट लागलेली असते. तो वेड्याची अॅक्टिंग करत अतिशहाण्यांचे डायलॉग म्हणत असतो. तो सापडतो शत्रूला. शत्रू म्हणतो नन्हे मुन्हे विनोद, तेरे मुठ्ठी में क्या है? तर मुठ्ठीत निघते सारिकाची बाली. शत्रू त्याला ठाकूरच्या समोर नेतो. ठाकूर न्यायनिवाडा करणार एवढ्यात जगदीप येऊन सांगतो की मी सगळ्याच बाल्या सेम डिझाईनच्या बनवतो. ही बाली याने माझ्या दुकानातून चोरली आहे. तेवढ्यात जितू सारिकाची ओढणी दाखवत येतो आणि म्हणतो ही मला मंदिराच्या मागे सापडली आणि कुठल्यातरी जनावराचे पैरोंके निशान पण मिळाले. यानंतर मंडळी जाऊन शोधतील असं मला वाटलं तर एकदम धावणारा कुत्रा दिसतो.
कुत्रा एका तरूणाच्या मागे धावतो आहे. पण आपल्याला समजतं ही मिशी लावलेली रीना रॉय आहे. 'आ गये' कंटिन्यूज. ती धावताना एका विहिरीत पडते आणि एका झाडाच्या मुळाला धरून विहिरीत लटकते. तर भिंतीवरून एक नाग येतो. रीना असली म्हणून काय इतक्या सगळ्यांनी मागे लागायचं का? ती खाली पडते. आता तिच्या समोर एकदम दोन नाग येतात. मागे लागणार्यांच्यात भर म्हणून नेमका तेव्हाच तिथून सुनील जात असतो. फ्रेंडली नेबरहुड स्पायडरमॅन असल्यागत तो उडी मारून थेट विहीरीच्या तळात पोचतो. रीना सांगते माझा बाप आंधळा वैद्य आहे, मी जडीबुटी शोधायला आलेला त्याचा मुलगा. रीनाचे आयलायनरवाले डोळे दिसूनही त्याची खात्री पटते की तो मुलगाच आहे. तो रीनाला मिठी मारून दोघांच्या कमरेभोवती दोरीचं एक टोक बांधतो (तरीही त्याला ती मुलगी असल्याचं समजत नाही हे पाहून मी हरले!) आणि दुसर्या टोकाचा फास बनवून बरोब्बर वरती उभ्या असलेल्या घोड्याच्या गळ्यात टाकतो. काय अंदाज! मग घोड्याला शिट्टी मारून इशारा करतो. घोडा दोघांना बाहेर काढतो. लगेच दोघं एकमेकांचे जिगरी वगैरे दोस्त बनतात.
आता आपण या सिनेमातल्या एका जनतेच्या मनोरंजनार्थ असलेल्या मुकाबल्याकडे येतो. दुल्हन्या गायब झाल्यात तर काय झालं? माणसांना काही मनोरंजन हवं की नको? या मुकाबल्याच्या आधी कोहलीकाका शत्रू आणि सुनीलच्या तोंडून मर्दोंकी लक्षणे वदवतात. पूर्ण पिक्चरच कुठल्यातरी अभ्यासक्रमात टाकायच्या लायकीचा आहे. वेगवेगळ्या लक्षणांच्या लिस्टी येतात यात. कदाचित या सीनच्या आधी असं काहीसं झालं असावं -
कोहलीकाका टाईम ट्रॅव्हल करून रामदास स्वामींकडे जातात आणि त्यांना विनंती करतात की त्यांनी मर्दोंकी लक्षणे सांगावीत. रामदास स्वामी क्रुद्ध होऊन कोहलीकाकांना घालवून देतात. त्यानंतर भीतभीत स्वामींचा शिष्य विचारतो, "स्वामी ती मर्दोंकी लक्षणे लिहायला घ्यायची आहेत का?". स्वामी शिष्याकडे रोखून पाहतात आणि म्हणतात, "तो आत्ता इथून गेलेला माणूस पाहिलास का? त्याला नीट आठव आणि ताबडतोब मूर्खांची लक्षणे लिहायला घे". पुढचा इतिहास जगजाहीर आहे.
तर मर्दोंकी लक्षणं पुढीलप्रमाणे -
१. जो मर्द होतें है वो मुकाबला अपने हिंमत और ताकतसे जिततें है, फिजूलकी मन्नतोंसे नहीं.
२. मर्द तैयारी नहीं करते, हमेशा तैयार रहतें है ( हे मुकाबल्याच्या संदर्भात वाचावे ;-))
३. जो मर्द होतें है, वो अपनी छाती पे वार तो सह सकते है, लेकिन दुसरोंकी पीठ पे छुपकर वार नहीं कर सकते.
---------------------------------------------------------------------------------------
आता मुकाबल्याचा दिवस. स्टेजवर ठाकूर आणि मंडळींच्या सोबतच मुलाच्या वेषातली रीना आणि तिचा अंधा बाबा मदनपुरी बसलेला आहे. म्हणजे ती मुलगी आहे हे गावात कोणालाच माहिती नाही? मैदानाच्या मध्यभागी टोकदार असणं अपेक्षित असलेले कोन लावलेला एक अर्धगोल ठेवलेला आहे. नेमकं काय अपेक्षित आहे? ते भोसकून माणसं मरावीत? मुकाबल्यात ठाकूर म्हणतो पाच माणसं व्हर्सेस पाच माणसं लाठीयुद्ध होईल. आगाऊ सुनील लगेच मी एकटाच या दहांशी लढणार ते ही बगैर लाठी के असं सांगून सुरू होतो. हिरो असल्याने सुनीलला जिंकावंच लागतं. आता येतो शत्रू आणि म्हणतो आता माझ्याशी सुनीलचा मुकाबला होऊन जाऊदे. या मुकाबल्याचे काही सेट रुल्स नसावेत. पुढची लेव्हल म्हणून थेट तीन बायका डोक्यावर माठ आणि माठावर अननस घेऊन अंतराअंतरावर उभ्या राहतात. शत्रू बरोब्बर एका दिशेने जात हे अननस उडवतो. सुनील दोन अननस उडवतो आणि मागे फिरून तिसरा अननस उडवतो. आता इथे शत्रू सुपिरीअर ठरला ना? पण ठाकूरला तसं वाटत नाही. मग येतो आखरी मुकाबला. रस्सीच्या मधोमध विष लावलेला खंजीर बांधलेला असतो, ती रस्सी घेऊन त्या अर्धगोलाच्या इथेच रस्सीखेच - ज्याला खंजीर मिळेल, तो जिंकला. इथे नुसता खंजीर चालला नसता का? जीवावर कशाला उठायचं?
रस्सीखेच सुरू होते. खंजीर शत्रूच्या हातात ऑलमोस्ट आलेलाच असतो तरीही रीना धावत येऊन तलवारीने रस्सी सुनीलच्या बाजूला तोडते आणि शत्रूला जिंकवते. निदान सुनीलला तरी जिंकवायचं की बये! तिला कदाचित सुनीलमधल्या मर्दोंकी लक्षणे बद्दल डाऊट असावा. त्यावर सुनीलची प्रतिक्रिया - राजा, आज तुमने सारा खेल खराब कर दिया! म्हणजे? तो त्या राजाला ढकलून देतो आणि डोक्यावरचा टोप पडेपर्यंत कोलांट्या उड्या मारून राजाच्या जागी राणी - सॉरी, रीना - प्रकटते. ती मुलगी आहे हे कळताच सुनील रागारागाने तिथून निघून जातो ( डाऊटफुल मर्दांचं लक्षण? ) तर शत्रूचा न्याहाळकुमार होतो. आता सुनील आणि शत्रूच्या भांडणाचा पुढचा मुद्दा रीना असणार हे नक्की होतं.
सुनील रीनाला रागवायला बोलावून घेतो. मग मात्र ती अवखळ वगैरे तरूणी बनून येते आणि त्याच्याकडे प्यार का इजहार करते. त्यासाठी ती गाणं म्हणत त्याच्या मागेही फिरते. सीन कट्! अचानक रीना पाण्यात अंघोळच करायला लागते. ती बाहेर येते तर समोर शत्रू. तो 'सामने नदी - प्यासा' वगैरे पकवायला लागतो. याबद्दल त्याला नदीत ढकलण्याऐवजी तीच उडी मारते. तो तिच्या पाठोपाठ पाण्यात जातो. आणि त्याच्या हाती लागते? - रेखा! रीनापासून शत्रूला वाचवायला ती तिच्यासारखे डिट्टो कपडे घालून तिथे आलेली असते म्हणे. लगेच पुढच्या सीनमधे ठाकूर बेट्याचा रिश्ता आणि कंगन घेऊन आंधळ्या मदनपुरीकडे हजर होतो. मदनपुरीचा आनंद गगनात माईना. शत्रू लगेच सुनीलला आणि रेखाला लाडू खायला घालून जळवतो. आता रेखासाठी मंदिरातला सीन हवाच. म्हणून रेखा लगेच देवाला इमोशनल ब्लॅकमेल करायला देवळात पोचते. इकडे सुनील रीनाच्या अंगावर शत्रूने दिलेला लाडू फेकायला जातो. ती म्हणते अरे, मलाच माहिती नाही माझी मंगनी ठरलीये हे! झालं, इमोशनल ब्लॅकमेलिंगचं वर्तुळ पूर्ण करायला रीना बाबांकडे जाऊन 'कंगन माझ्या लाशला घाला' सांगते. बाबाला होतो साक्षात्कार. कंगनवापसी होते आणि सुनील शत्रूला लाडू देऊन लाडूवर्तुळही पूर्ण करून घेतो. याला म्हणतात सर्कल ऑफ लाइफ!
अचानक कोहलीकाकांना आठवतं की नितू-जितूची स्टोरी आपण विसरूनच गेलो. इतकी लोकं सिनेमात घेतली की असं व्हायचंच. नितू जितूला सांगते आपल्या लग्नाबद्दल माझ्या भावाशी बोल. जितू बोलतो. सुनील म्हणतो मला रिश्ता मंजूर आहे. मग अचानक कुठूनशी सुनील-नितूची आई - सुलोचना - उपटते आणि म्हणते रिश्ता कॅन्सल! ही कुठून आली? आणि ही होती तर सुनीलने परस्पर रिश्ता कसा मंजूर केला? तर ती म्हणे हीचं लग्न लहानपणीच हिच्या बाबांनी ठरवलंय. त्यांचं वचन मी नाही मोडू देणार. नितू धावत जितूकडे जाऊन त्याला टाटाबायबाय करून येते आणि कहर गाणं ऐकायला सज्ज होते. यावेळी मात्र डोलीच्या सिक्युरिटी साठी लोक फुल्ल प्लॅनिंग करतात. सुनील आणि शत्रू आपापले सिक्युरिटीवाले तयार ठेवतात. व्यूहरचना होते. डोली मंदिराजवळ येते. व्यूहातली माणसं नुसतीच एकमेकांच्या तोंडाकडे बघतात. सुनील म्हणतो डोली खाली नाही ठेवायची. तेवढ्यात मंदिरामागच्या डोंगरावरून एक मोठ्ठा दगड स्ट्रॅटेजिकली खाली पडतो. तो कसा पडतोय ते बघायला कहार तत्परतेनी डोली खाली ठेवतात आणि नितू गायब! कसं शक्य आहे? त्या डोलीच्या सगळ्या बाजूने माणसं उभी असतात तरी? पण आपण असे प्रश्न नाही विचारायचे. दुरून एक किंकाळी ऐकू येते. सुनील पहायला जातो तर शक्ती कपूर दुल्हनला घेऊन पळत असतो. त्याला पकडल्यावर कळतं की शक्ती डिकॉय आहे आणि तो त्याच्याच प्रेमिकेला घेऊन पळतोय. गावात एकूण खूप सार्या लग्नाळू मुली असाव्यात. आता सुनीलला वाटतं की जितूनेच नितूला पळवलं. सुनील त्याला कन्फ्रंट करतो तेव्हा हा येडा काहीतरी गोल गोल उत्तरं देत बसतो. अरे सांग ना सरळ नितू तुझ्याकडे आहे का ते. तर त्याऐवजी जितू विष खाऊन मरूनच जातो. अगदीच अँटीक्लायमॅक्स! इकडे जितूसारखीच 'जहर' (POISON असं बाटलीवर लिहीलं तर यांना कळणार नाही असं वाटलं असावं) लिहीलेली बाटली हातात घेऊन नितू कवट्यांच्या गुहेत मरते. अस्वल भूताचे तिच्या लाशला घाबरवायचे प्रयत्न वाया जातात. यानंतर दुडक्या चालीत मदनपुरी एक पहार घेऊन जाताना दिसतो ज्याचा काहीही संदर्भ लागत नाही.
अंधा मदनपुरी प्रेम(नाथ)पुजार्याकडे जाऊन त्याला विचारतो 'पाप क्या होता है?'. काय पण माणूस शोधलाय हे विचारायला! उत्तरादाखल प्रेपु म्हणतो पकडला जातो तो पापी, नाही जात तो पुण्यवान. अजून काय एक्स्पेक्ट करणार याच्याकडून? हे ऐकून पेस्टहादड्या विनोद कॅमेर्यात बघून असंबद्ध काहीतरी बोलतो. इतक्या गमती असताना यांना जगदीप आणि मंडळींची गरज का भासली असावी?
बिंदीया मटकत खाऊची शिदोरी घेऊन शेतात सुनीलला द्यायला जाते. ही ठाकूरची मुलगी आहे ना? घरचे विचारत नाहीत का? सुनीलला भास होतो नितूच आली म्हणून तो तिला मिठी मारतो. नेमक्या ह्याच्च वेळी ठाकूर यांना पाहतो. एका मिनिटानंतर बिंदीया तोंड उघडते आणि सुनील दचकून तिला सोडतो, ते नाही बघत. लब्बाड! पण या सीनचं इथे पुढे काहीच करायचं नाही आपल्याला. लगेच सुनीलचा घोडा रीनाच्या घरावर टकटक करतो ( कोहलीकाकांनी घोडोंकी लक्षणे लिहीली नाहीत का? ). इथे तर रीनाने चक्क कोळी लोक बांधतात तसा जरीवाला चौकोनी रूमाल बांधला आहे स्कर्ट ऐवजी. हे कुठलं गाव आहे जिथे या लग्नाळू मुली आखूड, तंग आणि वेगवेगळ्या कट्सचे घागरे(?) घालतात आणि बाकी सगळ्या मुली पूर्ण उंचीचे घागरे! रीना घोड्यावर बसून निघते तर वाटेत शत्रू कंगन घेऊन हजर. तो वेगवेगळ्या प्रकारचे डायलॉग्ज मारून बघतो, पण ती बधत नाही. तर मग चक्क दोरीचा फास टाकून तिला घोड्यावरून पाडतोच! ( इथे अजून एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे या गावात लोक - निदान सुनील आणि शत्रू तरी - लांबलचक दोर्या घेऊन हिंडतात. सुनीलकडे स्काऊटटाईपचा दोर आहे तर शत्रूकडे चक्क नायलॉनची दोरी ). घोडा रीना नाही तर रीनाची ओढणी या न्यायाने ती सुनीलला आणून देतो. सुनील तात्काळ रीना लोकेशनला पोचतो. मारामारी सुरू व्हायच्या आधीच ठाकूर येतो आणि रीना सांगणार की याने मला जबरदस्तीने हे कंगन हातात घालायचा प्रयत्न केला, त्यातला जबरदस्ती हा शब्द न आवडून पुढचं काहीच न ऐकता शत्रूला हातातल्या चाबकाने फटके देतो. तो चाबूक इतका महान असतो की तो तुटतो तरी ठाकूर तसेच सटासट आवाज करत अदृष्य चाबकाने फटके देत राहतो आणि शत्रूला हाकलतो.
या पुढचा सीन इतका रिअलिस्टिकली सुरू होतो की ठाकूरच्या हवेलीचा सेट आहे हे आपल्याला नीट दिसतं - म्हणजे वरचे लाकडी बीम, लाईट्स, हवेलीची खोटी भिंत वगैरे. बाबा ठाकूर ठकुराईनशी शिळोप्याच्या गप्पा मारताना बिंदीया आणि सुनीलच्या लग्नाचा प्रस्ताव ठेवतात. दुसरीकडे एक चोर काहीतरी घेऊन पळत असतो, तो मचाणावर पहुडलेल्या शत्रूच्या हाती लागतो. तो चोर असतो अंधा वैद्य मदनपुरी. तो आंधळा नसतोच. अर्थात मदनपुरीला आंधळा करून कसं चालेल? शत्रू म्हणतो मी तुझ्याबद्दल कोणाला खरं सांगणार नाही, त्याबदल्यात तू माझं लग्न रीनाशी लावून द्यायचं. वैद्य हो म्हणतो. शेतात बुजगावण्याचं सोंग घेतलेला, पेस्टहादड्या विनोद मान डोलावतो.
मदनपुरीला डिटेल्ड स्वप्न पडतं की रीनाचं शत्रूशी लग्न होणार आहे. इतकं डिटेल्ड की त्याला दाराआडून डोकावणारी दु:खी रेखा पण दिसते त्यात आणि दिसतं की रीनाने आत्महत्या केली आहे. मदनपुरी गावकर्यांना बोलावतो आणि सांगतो मी आंधळा नाहीये, मी चोर हत्यारा वगैरे आहे. हत्यारा कोणाचा असल्या निरूपयोगी चौकश्या न करता ठाकूर त्याचा पश्चात्ताप पाहून त्याला माफ करतो. आणि अश्यारीतीने मदनपुरी शत्रू डीलमधली हवा काढून घेतो. वेळ न दवडता मदनपुरी रीनाचं प्रपोजल तिथल्यातिथे सुनीलला देतो. बिंदीया हार्टब्रोकन. ठाकूर दिल, धर्म, बलिदान वगैरे कायकाय ऐकवतो. पोरगी म्हणते ओक्के, लावा माझं लग्न तुम्हाला हवं तिथे, पण पकवू नका.
कुठल्याश्या डोंगरावर सुनील रीना (घोड्याशिवायच) उधळलेले असतात. रीनाला पायाखाली बिंदी मिळते. ती म्हणे नितूची असते. मग अजून शोधल्यावर त्यांना एक चप्पल पण सापडते. सुनील म्हणतो ज्याची ही चप्पल त्यानेच पळवलं नितूला. काय लॉजिक! चप्पल असते प्रेम(नाथ)पुजार्याची. सुनील प्रेपुला कन्फ्रंट करतो ( इथे मागे एक एक्स्ट्रा अॅक्टर कमालीची अॅक्टिंग करतो आहे चिडल्याची. कुणी पिक्चर पाहिलाच तर हे विसरू नका ) प्रेपुला मारत मारत गाभार्यात नेतात. प्रेपु म्हणतो मी निर्दोष आहे. प्रेपु एका बाजूला कललेल्या शंकराच्या पिंडीला अजून गदागदा हलवतो आणि म्हणतो मी निर्दोष आहे हे आता तूच सिद्ध कर. हे असं इन्स्टंटली लोकांची कामं करून देणारं देऊळ शोधलं पाहिजे. शंकर म्हणतो - भक्ती नको, प्रेपु आवर! तिथे लगेच एक नाग प्रकटतो. झालं, प्रेपु सुटतो!
इकडे बिंदीयाच्या लग्नाला शत्रू नकार देतो. कारण त्याला बिंदीया पण गायब होईल अशी भीती वाटत असते. ठाकूर म्हणतो हे लग्न होणार पण बिंदीया लाल जोडा नाही घालणार. लग्न पक्कं होतं. शत्रूला काही किंमतच नाहीये असं दिसतंय. सुनील ठाकूरला म्हणतो बिंदीयासोबत डोलीतून मी बसून जाणार म्हणजे कोण डोल्या लुटतंय ते समजेल. आणि हे असलं प्रपोजल ठाकूर चक्क मान्य करतो. काय प्रोग्रेसिव्ह ठाकूर आहे! हे सगळं पेस्टहादड्या विनोद लपून ऐकत असतो तेवढ्यात त्याच्या इथे मशाली घेऊन माणसं येतात आणि तो घाबरतो ( पछाड लक्षण क्र. ५. कोहलीकाका विसरले नाहीयेत ते अजून ). पेस्टहादड्या आता त्याच्या अड्ड्यावर जातो. त्याला त्याची माणसं विचारतात की या नव्या डोलीबद्दलचं प्लॅनिंग काय आहे? तो सांगतो यावेळी काहीतरी वेगळं करायला लागेल. लगेच कहार तेच ते आपलं गाणं म्हणत पिवळ्या जोड्यातल्या बिंदीयाला न्यायला लागतात. डोलीत सुनीलला पाहून बिंदीया आणि दोन माणसांचं ओझं न्यायला लागल्याने बाहेर कहार उद्विग्न होतात. पेस्टहादड्याची माणसं काहीच करत नाहीत. डोली चक्क सेफली मार्गस्थ होते. पता लगाओ दया, बिंदीया बची तो बची कैसे?
---------------------------------------------------------------------------------------
काहीही गरज नसताना अचानक गावातली माणसं नाचगाणं करायला लागतात. सुनील परत आल्यावर हे सेलेब्रेशन पाहून चिडतो. म्हणतो सांगा ही डोली का नाही लुटली गेली? म्हणजे डोलीचा लुटेरा ठाकूर तरी आहे किंवा मी तरी. तो मी नव्हेच, तर सांग बा ठाकूरा तू डोलियाँ का लुटतोस. ठाकूर म्हणे आता माझी सटकली, तर मी आत्महत्या करतो. ठकुराईन म्हणते, सुनील डोलीत होता हे मी शत्रूला सांगितलं होतं ( आधी ठकुराईनला हे कसं कळलं ते सांगा ). शत्रू म्हणतो सुनीलच खुनी आहे - अगदी स्वतःच्या बहिणीचाही. ठाकूर हे नाकारतो. मग तेच लॉजिक पुढे लावून सुनील म्हणतो म्हणूनच शत्रू खुनी कारण त्याची बहिण वाचली. ठाकूर शत्रूवर बंदूक रोखतो. ठकुराईन मधे पडते. शत्रू उडत उडत जाऊन घोड्यावर बसून पळतो. सुनीलला तर आधीपासूनच उडता येत असतं त्यामुळे तो ही आपल्या घोड्यावर पाठलागाला लागतो. मधेच कधीतरी शत्रू सुनीलच्या घोड्याला गोळी मारतो. सुनील घोड्यासहित दरीत पडतो.
वेताळ पुन्हा जाऊन झाडाला लटकला पण विक्रमाने आपला हट्ट सोडला नाही. शत्रू हा ओरिजिनल विक्रम असावा त्यामुळे तो रीनारूपी वेताळाला न्यायला लालचुटूक जॅकेट आणि मॅचिंग बूट्स घालून पुन्हा एकदा मदनपुरीकडे दाखल होतो. सौम्य ढकलाढकलीत रीना हळूवारपणे डोकं आपटून घेते आणि बेशुद्ध पडते. रीनाला खांद्यावर टाकून शत्रू निघतो. मधे रेखासारखे किरकोळ अडथळे येतात पण शत्रू ढकलाढकल एक्स्पर्ट असल्याने तो रेखाला पण ढकलून देतो. शत्रू कुठल्याश्या सजवलेल्या केबिनला नेईपर्यंत रीना शहाण्या मुलीसारखी बेशुद्धच असते. मग ती जागी होते. लगेच शत्रू खिशातून कंगन बाहेर काढतो. हे कंगन प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या जाडीचे दिसतात. ती लगेच हात पुढे करून कंगन हातात घालून घेते. डोक्यावर परिणाम झाला बहुतेक. शत्रूलाही तसंच वाटतं. मग तो 'जानी दुश्मन' शब्द घालून एक डायलॉग मारतो. निदान आता पिक्चरचं नाव जानी दुश्मन का हा प्रश्न नको पडायला. रीना एकदम नाचायला गायला लागते. तिचा प्लॅन शत्रूला बेसावध करून त्याच्या तावडीतून पळायचा असतो. वेळ पाहून ती त्याचं पिस्तूल पळवून गोळ्या झाडते. शत्रू म्हणतो हवे तेवढे इशारे कर, सुनील येणार नाही, तो मेला! ताबडतोब सुनील 'दत्त' म्हणून तिथे हजर होतो. मग मारामारी ओघाने आलीच. इकडे मदनपुरी ठाकूरकडे शत्रूचं नाव सांगायला जातो. तोपर्यंत शत्रूच्या केबिनला लागते आग. रीना कंगन त्याच्या अंगावर फेकून सुनीलच्या खांद्यावर निघून जाते. यालाच खांदेपालट म्हणत असावेत. ठाकूर बंदूक घेऊन येईपर्यंत केबिन खाक होते. दुसर्या दिवशी ठाकूर राख सावडताना त्याला साधारण अस्वलाच्या हातात बसेल इतकं मोठं जळलेलं कंगन सापडतं. ते वितळत का नाही हा प्रश्न त्याला पडला नाही, आपण पण तो सोडून देऊ.
सुनील रीनाला म्हणतो की आता डोलियोंका लुटेरा जळून गेला तर आपण लग्न करूया. पण ढँडॅढँ! शत्रूला रेखा वाचवते म्हणे. पण आता येतं कहर गाणं. वास्तविक हे लग्न तर गावातल्या गावातच होतं किनई? मग त्या देवळाच्या रस्त्याने जायची गरजच काय? पण डोल्यांना तिकडूनच जायची सवय असल्याने ही डोली पण तिकडूनच जाते. मंदिराशी आल्यावर सुनील पुजार्याला प्रसाद द्यायला सांगतो. और इसी मौकेपर मंदिराच्या जिन्याच्या खालच्या भागात एक सिक्रेट दार उघडतं आणि अस्वलाचे प्लेक्झिबल हात रीनाला ओढून नेतात. पण रीनाची ओढणी चतुर असल्याने ती अर्धवट बाहेर अडकते आणि सुनील ते दार उघडून त्या कवट्यांच्या गुहेत शिरतो. गंमत म्हणजे जी गुहा आजवर इतकी सिक्रेट असते ती शत्रूला सहज सापडलेली असते. सुनील आणि शत्रू आमनेसामने येतात. मात्र यावेळी त्यांचा अॅक्चुअल सामना वगैरे होण्याआधी रीनाची किंकाळी ऐकू येते. हे दोघं रीनाला शोधत जातात तर त्यांना पेस्ट न खाता आलेला विनोद सापडतो. काही कारण नसताना सुनील आणि शत्रू त्याचं वस्त्रहरण करतात, तर त्या चिंध्यावाल्या चादरीच्या आतून द्रौपदीऐवजी इन्स्पेक्टरचे कपडे घातलेला विनोद दिसतो. आता तिघे मिळून रीनाला शोधायला लागतात.
पलिकडे अस्वल भूत आणि रीना खांबखांबखांबोळी खेळत असतात. मधेच एका पॉईंटला रीना सुनीलच्या हातात लागते. तो खुश होईपर्यंत अस्वल त्याला ढकलून देते आणि रीनाच्या मागे जाते. शत्रू आणि विनोद वेगवेगळ्या वेळी अस्वलाशी दोन हात करायचा प्रयत्न करतात. मात्र अस्वल खेळकर असल्याने ते कधी शत्रूला सूरपारंब्या खेळायला लावतं, कधी विनोदशी कुस्ती करतं. विनोद अस्वलाला गोळ्या मारतो. अस्वल 'हा काय फालतूपणा आहे?' असा चेहरा करून आपल्या फरवरून गोळ्या झटकत राहतं. इथे आपल्याला तो संजीवकुमारच आहे हे नीट लक्षात येतं. गोळ्या संपल्यावर विनोदच्या (कचकड्याच्या) पिस्तुलाचा चोळामोळा करून अर्जुनाला पोपटाचा डोळा दिसावा तसं अस्वल पुन्हा रीनाच्या मागे जातं. पुन्हा एकदा दोरखंड विशेष उपस्थिती लावतात आणि तिघे मिळून अस्वलाला पकडायचा प्रयत्न करतात. पण अस्वल सहज एकेका हाताने विनोद आणि शत्रूला उचलतं आणि पलिकडे दगड म्हणून दाखवलेल्या खोक्यांच्या वर टाकलेल्या जुन्या गाद्यांवर भिरकावतं. पुन्हा एकदा पोपटाचा डोळा मोड ऑन. हम छोडेगा नै जी! सुनीलला कुठूनतरी एक त्रिशूळ सापडतो ( याचा संजीवकुमारशी संबंध नाही ) आणि बाकी दोघांना भाले. पण अस्वल ते डॉज करतं. अस्वलाने आपल्याला विसरू नये म्हणून रीना मधे मधे येऊन किंचाळते. तेवढ्यात जादूचे प्रयोग झाल्यागत अस्वल पांढरा पायजमा घालून येतं. आता तिघे हिरो साखळदंड घेऊन येतात ( मोठी रिसोर्सफुल गुहा आहे ). जादूच्या प्रयोगांतर्गत पायजमा गायब होऊन आता पांढर्या चपला येतात. तिघेजण अस्वलाला खांबाला बांधतात. अस्वल साखळदंड तोडून पुन्हा रीनाच्या मागे जातं आणि चपला गायब होतात. आता अस्वल एक खांब उपटून आणतं आणि हल्लाबोल करतं. त्याच्या तावडीत सापडतो शत्रू. शत्रूला वाचवायला सुनील शांतपणे रीनाला अस्वलापुढे ढकलतो. आता वास्तविक अस्वलाला तोच खांब तिच्या टाळक्यात घालता आला असता की नै? पण त्याचा बहुतेक चापट मारूनच दुल्हन्यांना मारायचा नवस असावा.
फायनली रीना अस्वलभुताच्या हातात सापडते. तो तिला उचलून फेकून देणार तोच त्रिशूळ रिटर्न्स विथ सुनील. सुनील त्रिशूळ अस्वलाच्या छातीत खुपसतो. अस्वल रीनाला फेकतं आणि शत्रू तिचा अचूक कॅच घेतो. अस्वल विचारतं कौन हो तुम? आणि त्याच्या चेहर्याच्या जागी रजा मुरादचा चेहरा दिसायला लागतो. तो अस्वलाला कुठल्यातरी तुफानी रातची आठवण करून देतो. फ्लॅशबॅक मधे विजेचा फ्लॅश. तीच गुहा, तरूण संजीवकुमार विथ त्याची तरूण योगिता बाली दुल्हन. आणि तिथे येतो...?? कोण कोण? अस्वल अमरीश पुरी!!!! कसं शक्य आहे? तो तर सुरूवातीला ट्रेनमध्ये मेला किनई? तर स्पायडरमॅन मल्टिव्हर्स वगैरेच्याही आधी कोहलीकाकांनी हे पॅरलल युनिव्हर्स साकार केलं होतं. दोन्हीकडे अमरीश रजा मुळेच झपाटला गेलेला असतो. त्यातल्या एकात अमरीश ट्रेनमधे मरतो तर दुसर्यात तो नेमका या गावातल्या कवट्यांच्या गुहेत येतो. इथे त्याला संजीवकुमारच्या दुल्हनला मारायचं असतं तर संजीवकुमार त्यालाच खंजीर मारतो. रजा मुरादचा आत्मा शांतपणे चालत संजीवकुमारच्या शरीरात शिरतो. आता संजीव होतो अस्वल (अरे पण अस्वल का व्हायचं???) आणि अमरीश पुन्हा एकदा मरतो. युनिव्हर्स कुठलंही असलं तरी अमरीशचं मरण अटळ आहे यू सी! संजीव स्वतःच स्वतःच्या दुल्हनला मारून टाकतो. फ्लॅशबॅक समाप्त! या रजा मुरादचं काही समजत नाही. दुल्हन सहज दिसली आणि राग येऊन मारलं हे एकवेळ पटण्यासारखं आहे पण शोधून पळवून दुल्हन्या कशाला मारायच्या असतात?
आता अचानक सगळ्या गावकर्यांना ही गुहा सापडते आणि ते तिथे येतात. रजा मुराद म्हणतो मला रजा द्या. ठाकूर म्हणतो कायमची घेणार असशील तरच देतो. तुझ्या जाण्याचा सबूत काय? तर म्हणे सगळ्यांसमोर समोरची भिंत तोडून निघून जाईन. काय पण सबूत! मग ठाकूर त्रिशूळ उपसून काढतो. अस्वल गायब होऊन ओरिजिनल ठाकूर गळ्यातल्या माळेसकट दिसायला लागतो. रजा मुराद समोरची भिंत मानवाकृतीत तोडून निघून जातो. इतकं झाल्यावर आपल्याला दिसतं की मगाचचा पायजमा ठाकूरचा नव्हताच कारण त्याने ब्राऊन सलवार घातली आहे. ठाकूर मरतो. कंगन जळून गेल्याने विक्रम वेताळाचा नाद सोडतो म्हणजेच शत्रू आता रेखाला आपली म्हणतो. सुनील रीनाशी लग्न करतो. आणि अमरीश दोनदा कसा मेला याचं उत्तर न देताच पिक्चर संपतो.
तळटीप : पछाड लक्षण क्र. ४ मला कुठेही सापडलं नाही. कोणाला सापडलं तर प्लीज सांगा
भारी लिहिलंय रमड! बघायला
जबरदस्त लिहिल आहे rmd
जबरदस्त लिहिल आहे rmd





हसून हसून मेलो
खालच्या वाक्यांना तर फुटलोच मी
खुलभर दुधात विष कालवून देते.>>>>
बायको सांगते की मी आता तुझा पैसा घेणार आणि मला आवडणार्या माणसासोबत सुहागरात मनवणार. अशी क्लॅरिटी हवी! >>>>
प्रॉस्पेक्टिव्ह दुल्हन्या>>>
सारिकाचं लग्न होऊ घातलंय म्हणून ती नागमोडी चालायला लागली आहे>>
रीना असली म्हणून काय इतक्या सगळ्यांनी मागे लागायचं का?>>>
फ्रेंडली नेबरहुड स्पायडरमॅन असल्यागत तो उडी मारून थेट विहीरीच्या तळात पोचतो.>>>
पछाड लक्षणे भारीच....
आता परत पाहणे आले..
पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत
धमाल लिहिले आहे बऱ्याच
धमाल लिहिले आहे
बऱ्याच पंचेसवर फुटलो.
माबोवरील एखाद्या क्रमशः कथेवरून काही नटनट्या घेऊन चित्रपटाचं शुटींग सुरू केलं, पण लेखक/लेखिका पुढचे भाग लिहीच ना. मग कथा पूर्ण करा स्पर्धा काढली त्यात पन्नासेक शशक आल्या. मग आणखी नट नट्यांना तू ये, तू पण ये करत एकेक शशक धरून पुढचे शुटींग सुरू, असला प्रकार दिसतोय.
पुभाप्र.
<<<स्वामी शिष्याकडे रोखून
<<<स्वामी शिष्याकडे रोखून पाहतात आणि म्हणतात, "तो आत्ता इथून गेलेला माणूस पाहिलास का? त्याला नीट आठव आणि ताबडतोब मूर्खांची लक्षणे लिहायला घे". पुढचा इतिहास जगजाहीर आहे.>>>
प्रतिभा म्हणतात ती हीच. दंडवत स्वीकारा ताई _/\_
पिक्चर फार म्हणजे फारच भारी प्रकार दिसतोय. पुढील भागाच्या प्रतिक्षेत!
(No subject)
भारी लिहिलंय.
एक दुल्हन वाचते ना यलो जोडा घालायची आयडिया करून ते याच्यातच ना..
खतरनाक चालू आहे. नागमोडी
खतरनाक चालू आहे.
नागमोडी चालणारी सारिका...
बाकी अनेकांनी हा महान, क्लासिक, कालातीत सिनेमा न पाहिल्याचं वाचून सखेद आश्चर्य वाटलं.
रीना असली म्हणून काय इतक्या सगळ्यांनी मागे लागायचं का
<<<< हे थोडे नागिनव्हर्स सुद्धा असावे. तो नागरूपातला इच्छाधारी जितू असेल. (मनुष्यरूपातला ऑलरेडी आहेच) सुनील दत्त, विनोद मेहरा, रेखा वगैरे 'नागिन' पब्लिक आलेली पाहून तोसुद्धा आला बापडा...
#तेरेसंगप्यारमैनहीतोडना
मस्त लिहिलंय.
मस्त लिहिलंय.
जबरी लिहिलं आहे.
जबरी लिहिलं आहे.
खुलभर दुधात विष कालवून >> शुक्रवार कहाणीचा रेफ्रन्स भारीच.
धमाल
धमाल

नेहमीप्रमाणे
मला एकदा तो सिनेमा परत पाहावं लागेल आता
टॉप टू बॉटम धमाल लिहिले आहे
टॉप टू बॉटम धमाल लिहिले आहे

हरपा खुलभर दूध सोमवारची कहाणी
हरपा
खुलभर दूध सोमवारची कहाणी
सॉरी ऋतुराज.
सॉरी ऋतुराज.
रमड, कसलं जबरी लिहिलयं !
हा सिनेमा आला तेव्हा मी १२-१३ वर्षांची असेन. आम्हा मित्र-मैत्रीणींना बघायचा होता पण घरच्यांनी ठाम 'नाही' सांगितले होते. आपल्याला बघायला मिळाला नाही यापेक्षा मोठी मुलं बघून आली ते जास्त झोंबले होते.
धन्यवाद वावे , ऋतुराज, मापृ,
धन्यवाद वावे , ऋतुराज, मापृ, पर्णीका, लप्री, सिमरन, श्र , शर्मिला, हर्पा , किल्ली, ऋ , स्वाती२
त्याच्यासमोर ती ते विष
त्याच्यासमोर ती ते विष ग्लासात ओतते तरी त्याला दिसत नाही. यालाच वासनांध म्हणत असावेत.>>>
"तो आत्ता इथून गेलेला माणूस पाहिलास का? त्याला नीट आठव आणि ताबडतोब मूर्खांची लक्षणे लिहायला घे" >>> rmd तुफान लिहिलंय......
भारी लिहिले आहे . पुढील
भारी लिहिले आहे . पुढील भागाची वाट बघत आहे !!!
जबरदस्त लिहिले आहेस.
जबरदस्त लिहिले आहेस.

वासनांध, फ्रेंडली नेबरहूड स्पायडरमॅन, आमरस पुरी, अचानक वाढलेली नखं, रीना रॉयला मिठीत घेऊनही येडा बनके पेढा खाणं, मूर्खांची लक्षणं (नंबर दोन तर फारच भारी) , नागमोडी सारिका, खुलभर दूध, वेड्याची अॅक्टिंग करत अतिशहाण्यांचे डायलॉग. हे सगळंच फार आवडलं.
धन्यवाद फाविदडि, अश्विनी११
धन्यवाद फाविदडि, अश्विनी११
@मापृ
टोटली! तरीही बराच सुसंगत पिक्चर आहे. त्या वेळी पाहणार्या लोकांना मनोरंजक आणि भीतीदायकही वाटलेला असू शकतो. शिवाय इतक्या अॅक्टर्सना पडद्यावर पाहणं म्हणजे पर्वणी वगैरे असेल.
मग आणखी नट नट्यांना तू ये, तू पण ये करत एकेक शशक धरून पुढचे शुटींग सुरू >>>
या चित्रपटात गूफ्स पण आहेत. पण ते उलगडतील हळुहळू. वाचत रहा
@स्वाती२
घरच्यांनी ठाम 'नाही' सांगितले होते >>> त्या वेळी भाबडे हॉरर पण टेरर वाटत असतील गं. माणसं निर्ढावलेली नव्हती
थँक्यू अस्मिता
थँक्यू अस्मिता
@श्र
असू शकतं. पॅरलल युनिव्हर्स आहेत त्यामुळे जितू एकाच वेळी मनुष्यरूपात आणि नागरूपातही असू शकतो. तू आणि पायस मिळून प्लीज या नागिनव्हर्स, रीछाव्हर्स वरती सेपरेट लेख लिहा अशी लापि आहे
नागिनव्हर्स >>>
ध मा ल
ध मा ल
लिहितांना भूक लागली होती का ? आमरस पुरी 😂
मोस्टली आज संध्याकाळी पुढचा
मोस्टली आज संध्याकाळी पुढचा भाग टाकेन. अजून दोन भाग होतील असं वाटतंय इतका मालमसाला आहे
अनिंद्य
अनिंद्य
फार भारी लिहिलंय
फार भारी लिहिलंय
हा सिनेमा दुरदर्शन वर पाहिलाय।
त्यांनी अस्वल भूत बघून।प्रेक्षक घाबरू नयेत म्हणून बरेच सिन कट केलेले.
त्यामुळे शेवटी हा का मेला, त्याचं काय झालं वै बरेच प्रश्न पडलेले.
काही वर्षांनंतर झी सिनेमाला लागला तेव्हा परत पाहिला होता उत्सुकतेने.
जी वाचते ती ठाकुरच्या घरातली मुलगी.
त्याला लाल रंग त्रास होतो म्हणून वेगळे कपडे.।
मला प्रश्न पडलेला हे लाल जोडा युनिफॉर्म आहे का लग्नाचा असा.
थँक्यू झकास!
थँक्यू झकास!
प्रेक्षक घाबरू नयेत म्हणून बरेच सिन कट केलेले >>> अर्र!
शेवटाकडे तर पिक्चर कहर झाला आहे अजून. जाम एन्जॉय केलाय मी
त्या वेळी पाहणार्या लोकांना
त्या वेळी पाहणार्या लोकांना मनोरंजक आणि भीतीदायकही वाटलेला असू शकतो.>>
गाजला होता तेव्हा. तेरे हातो मे पहना के चुडीया प्रचंड हिट झालं होतं. त्यावर नाच बसवत, गणेशोत्सव, शाळेचे गॅदरिंग वगैरे मध्ये. मला आधी वाटलं हाच तो भूत असो, मला वाटलं तो असतो, डोली जाण्याचे वर्णन ही पण गेली ती पण गेली, अस्वलाचे वर्णन वगैरे गप्पा रंगत.
पण आम्हाला पाहण्यास मनाई असल्याने नाही बघितला तेव्हा. नंतर केव्हातरी एकदा व्हिडिओ कोच बस मध्ये लावला होता तेव्हा थोडा बघितला.
तेरे हातो मे पहना के चुडीया
तेरे हातो मे पहना के चुडीया प्रचंड हिट झालं होतं >>> हो हो.
मात्र ते कहार वालं गाणं इतक्या वेळा येतं की कंटाळा येतो शेवटी. मला तर ते काहीसं हआहैकौ मधलं बिदाईचं गाणं आहे तश्याच चालीचं वाटलं.
हो, भुतापेक्षा जास्त भीती
गोपालाअस्वला' करायचं उगाच.येऊ दे अजून, तू इतकं धमाल लिहिलेयस की माझा पाय वाकडा पडून मी बघेन की काय वाटतेय.
आयडेंटिटी क्राईसिस >>> गुड
आयडेंटिटी क्राईसिस >>>
गुड पॉईंट!
ॲक्टिवेट

'उठी उठी
गोपालाअस्वला'>>>
रजा मुरादने बदला घेतला का फोटोतून महाभारतातील 'मै समय हुं' टाईप गप्पा मारत बसला? त्याच्या बायकोने मित्रासोबत सुहागरात मनवली का ? >>> नाही ना कळलं! दाखवलंच नाही त्यांनी. मी पाहिला तो पिक्चर अडीच तासांचा होता. सर्पतिकीटावर १८ रीळं दाखवली आहेत. म्हणजे मूळ चित्रपट बहुधा ३ तासांचा तरी असावा असा माझा अंदाज आहे. जवळपास अर्ध्या तासाच्या गमती कापल्यात. त्यात कायकाय होतं देव जाणे!
अस्मिता... पाहूनच टाक बै आता
अस्मिता...
पाहूनच टाक बै आता सिनेमा. 'बंदिवान...' पाहिलास अख्खा आणि जानी दुश्मन ला इग्नोरतेस हे काही योग्य नव्हे!
आता मंदिराजवळ लाल जोड्यातल्या (हिंदी!) दूल्हन्या गायब होतात तर लग्न नवरदेवाच्या गावी करू, जाताना पोरीला साधी साडी नेसवून नेऊ, उगा गाणेबजावण्याचा 'कहार' करून भुताला जागे करायची काहीएक गरज नाही, वगैरे काहीही विचार / उपाययोजना न करता चालले आपले डोली घेऊन डौलात!
बाकी ज्वालाप्रसादचा हनिमून राहिल्याने त्याचा आत्मा बदला घेत बसला होता, त्याला ऍमेझॉन प्राईमवर 'भुताचा हनिमून' नावाचा सिनेमा दाखवला. 'एकवेळ खंजीर मारा पण हे आवरा' म्हणत चट सरळ झाला आणि डायरेक्ट मुक्ती!
Pages