चित्र(वि)चित्र बकेट लिस्ट

Submitted by रानभुली on 16 March, 2025 - 01:02

डोळे मिटण्याआधी (जग बघून घ्यावंच्या चालीवर) आजूबाजूच्या लोकांकडून ऐकलेले, वाचलेले सिनेमे युट्यूब आणि ओटीटीच्या कृपेने बघून घ्यायचे आहेत. ( तो सर्वोत्कृष्ट किंवा कलात्मकच असला पाहीजे असं अजिबात नाही. )
आयुष्यात अमूक तमूक गाजलेला पिक्चर पाहिलाच नाही असं व्हायला नको. ( पुस्तकप्रेमी अशी यादी बनवत असतात).
त्या त्या वर्षी / दशकात गाजलेल्या सिनेमांची अशी यादी बनवायला घेऊयात. इथे काही नावे आठवतील तशी दिली आहेत. प्रतिसादात भर घालावी.
( लगेचच बघितले का अशी चौकशी करू नये. ही यादी आहे फक्त. आपण रेसिपी लिहून घेतो पण सगळ्या बनवत नाही तशी)
१. प्यासा
२. कागज के फूल
३. साहब बिबी और गुलाम
४. देवदास (जुना - दिलीपकुमारचा, त्या पेक्षा जुना नाही)
५. सौदागर (अमिताभ बच्चनचा)
६. जुगनू (धर्मेंद्रचा)
७. दुल्हन (हेमा मालिनी)
८. जख्मी ( सुनील दत्त)
९. डिस्को डान्सर ( मिथुन , पहिला १०० कोटीचा चित्रपट)
१०. प्रेमपुजारी (देवानंद)
११. हकीकत ( धर्मेंद्र , बलराज साहसा, जयंत )
१२. मधुमती
१३. महल ( अशोककुमार)
१४. शहीद ( दिलीप कुमार)
१५. हावरा ब्रिज ( अशोक कुमार)
१६. चायना टाऊन (शम्मी कपूर)
१७. सी आय डी ( देवानंद)
१८. आग ( आर के )
१९. बरसात ( आर के)
२० जिस देस मे गंगा बहती है (आर के)
२१. चोरी चोरी ( आर के)
२२. संगम ( आर के )
२३. गंगा जमना ( दिलीप कुमार)
२४. लैला मजनू ( ऋषी कपूर )
२५. आंधी ( संजीव कुमार)
२६. अनारकली (जुना)
२७. पारसमणी
२८. स्वर्ण सुंदरी
२९ आम्रपाली
३० चंद्रगुप्त ( शुअर नाही हा मूव्ही आहे का ते)

सध्या एव्हढेच आठवले आहेत. यादीत भर घालू शकता.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वरची यादी आवडली. यातले मेरा साया, लाल पथर नाही पाहिलेले. मेरा साया चा ओरिजिनल पाहिला आहे.
गाईड पुन्हा बघायला आवडेल.

शहीद - दिलीपकुमारचा माहित नाही. मनोजकुमारचा पहा.
ऋषीचा प्रेमरोग.
साधना व संजय खानचा इंतकाम
दिलीप कुमार, मधुबालाचा अमर
रमेश देवचा अपराध
मुंबईचा जावई
गुड्डी

शहीद दोन्ही नाही पाहिलेले.
ऋषीचा प्रेमरोग आणि रमेश देवचा अपराध हे वाचायला मजेशीर वाटलं. Happy
अमर बद्दल ऐकलेलं नाही.

अपवाद वगळता आपल्या लिस्टमधील बहुतांश चित्रपट पाहिले आहेत.. आणि कित्येक एकापेक्षा जास्त वेळा.
जे नाही पाहिले ते तसेच राहू देतो.. नाहीतर उगाच मरायला मोकळा व्हायचो Happy

९. डिस्को डान्सर ( मिथुन , पहिला १०० कोटीचा चित्रपट)
>>>
हे इंटरेस्टिंग आहे. बहुधा मागे मायबोलीवरच कुठेतरी वाचनात देखील आलेले. हा मी सुद्धा बरेच वेळा पाहिला आहे. लागोपाठच्या दिवशी पाहिला आहे. कारण मी मिथुनचा सर्वात मोठा फॅन होतो त्या काळात पाहिलेला चित्रपट आहे... डिस्को डान्सर, डान्स डान्स, सुरक्षा, वारदात, बॉक्सर, कसम पैदा करने वाले की, प्यार झुकता नही, प्यार हुआ चोरी चोरी, प्रेम प्रतिज्ञा.... हे सगळे माझे तेव्हाचे फेवरेट.. नंतर मग तो वेगळेच पिक्चर करू लागला.

यादीतील सगळे पाहिले आहेत. (चंद्रगुप्त सोडून)

रात और दिन (नर्गिस)
नमकीन (संजीव कुमार)
मजबूर (अमिताभ बच्चन)

वर सुचवलेल्या पैकी न पाहिलेले किंवा पुन्हा पाहता येण्यासारखे सिनेमे लिस्टीत टाकले आहेत.
सुचवत रहा.
कधी कधी आता काय पहावं असं होतं त्या वेळी या लिस्टीतला एखादा मूवी पहायचा मूड होत असेल तर अन्य कुणाला उपयोग होईल.

युट्यूब / फेसबुकवर काही मूव्हीज तुकड्या तुकड्यात पाहून झालेत पण पूर्ण पाहिलेले नव्हते.
त्यातला एक आता पाहिला.

इजाजत ,लिबास हे राहिलेत. लिबास अजिबात नाही पाहिला.
रूदाली सुद्धा राहिलाय.

अंगुर - देवेन वर्मा
दिल एक मंदिर - मीनाकुमारी राजेन्द्रकुमार, राजकुमार
साथी - वैजयंतीमाला राजेन्द्रकुमार
पाकिझा
आप कि कसम
दाग
सीमा,
सुजाता
बंदिनी,
तेरे घर के सामने,
पेईंग गेस्ट
अनाडी

माझा आवडता - आशिर्वाद ( अशोक कुमारचा) Happy

रानभुली बंदिनी पहा, मलापण पहायचाय .वडिलांनी पाहिलाय त्यांचा रेको .त्यांच्यामुळेच त्यातली गाणी पाहिलीत "मेरे साजन है उस पार" . "मोरा गोरा अंग लै ले "नूतनचा सुंदर अभिनय आहे .
सीमा पण चांगला आहे पण फार जुनी प्रिंट आहे. यातही नूतन आहे.त्यातलही" तू प्यार का सागर है" हे क्लासिक गाणं आहे.कधी कधी वडिलांना चेष्टेने विचारतेही हा चित्रपट आणि नूतनला पाहून तर माझं नाव नाही ना ठेवलं. Happy