पुस्तक
इंग्रजी-मराठी पुस्तके उपलब्ध असणारी लायब्ररी.
इंग्रजी-मराठी पुस्तके उपलब्ध असणारी लायब्ररी पुण्यात कोठे आहे?माझ्या माहीतीतल्या लायब्रीत फक्त मराठी पुस्तके उपलब्ध आहेत म्हणून जाणकरांनी नक्की सांगा.
ठक्-ठक् मासिक खरेदी करायचे आहेत.
कुणी विकणार किंवा share करणार असेल ठकठक मासिके (जुनी-नवी) तर कृपया संपर्क करणे.
धन्यवाद.
स्वतंत्र भारताचा सामरिक इतिहास - १९४७ ते १९७१
India's Wars: A Military History, 1947-1971 एअर व्हाइस मार्शल अर्जुन सुब्रमण्यम
बघ्याची भूमिका
मित्रवर्य Mandar Anant Bharde याची बघ्याची भूमिका आता ‘एकगठ्ठा’ वाचायला मिळणार हे प्रत्यक्ष त्याच्याकडून आणि त्याच्या फेसबुकवरून कळले आणि पुस्तक हातोहात संपल्यामुळे येणारी निराशा टाळण्यासाठी लगेच आॅनलाईन खरेदीसाठी नंबर पक्का करून टाकला. (नंतर कधीतरी तो पार्टी देईल तेव्हा त्यावर त्याची सही घेणार आहे.) भारदे नावाचे हे ‘रसायन’ मला पहिल्यांदा जेव्हा भेटले तेव्हाच त्याची जबरदस्त ‘किक’ (लहान) मेंदूत बसली होती. या माणसाकडून ऐकणे हा एक विलक्षण अनुभव असल्याने त्यांच्यावर लिहिलेच पाहिजे असे मला वाटू लागले आणि लोकसत्ताच्या रविवारच्या ‘लोकरंग’ पुरवणीत ‘बावनकशी’ सदरात मी त्यांच्यावर लेख लिहिला.
इंग्रजी पुस्तकं, चित्रपट, मालिका शिफारस
लेखक, त्यांची पात्रे आणि One Liners
सिनेमातल्या पात्रांच्या तोंडी चटपटीत, टाळीबाज डायलॉग आपण नेहमीच ऐकतो पण पुस्तकातल्या पात्रांचे? सिनेमात संहितेपासून संवाद लिहिणारे वेगवेगळे तज्ञ लोक असतात पण पुस्तकाच्या/कादंबरीचा लेखक ईमानेईतबारे ह्या सगळ्या जबाबदार्या शब्दशः एक हाती पेलत असतो.
मार्लन ब्रँडो किंवा आपल्या राजकुमार सारख्यांनी रंगवलेली पात्रे डायलॉगबाजीतून जबरदस्त टाळ्या मिळवतात पण लेखकांची पात्रे? त्या बिचार्यांच्या नशीबी वाचकाच्या चेहर्यावर ऊमटलेल्या एखाद्या स्मिताशिवाय, डोळ्यातल्या पसंतीच्या पावतीशिवाय किंवा कपाळावर पडलेल्या वा ऊलगडलेल्या आठीशिवाय फार काही येत नाही.
पुस्तक परीक्षण - युगंधर
पुस्तक परीक्षण - युगंधर: शिवाजी सावंत (लेखक: निमिष सोनार, पुणे)
2018 साली युगंधर मी एक अतिशय महत्त्वाची कादंबरी वाचली. सलग नाही तरी थोडी थोडी रोज अशी वाचली. "युगंधर" ही शिवाजी सावंत यांची मी वाचलेली पहिलीच कादंबरी. महाभारत, कृष्ण, भगवदगीता आणि श्रीमदभागवत या विषयांवर मला अखंडपणे वाचायला, लिहायला, चर्चा करायला आणि अभ्यासपूर्ण चिंतन करायला आवडते. याच हेतूने युगंधरही वाचली.
ह्या पुस्तकाचे नाव व लेखक हवे आहेत
मी कॉलेज मधे असताना एक जुने मराठी पुस्तक वाचले होते. साधारण अशी कथा होती. कथेतल्या मुलीला एक मुलगा बघायला येतो. त्यचा मित्र खूप सभ्य असतो, पण मुलगा खूप बडबड करणारा,वव्चावचा खाणारा असा असतो. मुलीचा गैरसमज होतो की जो चांगला आहे तोच बघायला आला आहे. लग्नाच्या वेळी ते कळते, पण जुना काळ असल्यामुळे ती बोलत नाही. नंतर केव्हातरी शेतातले वानर मारताना चुकून त्या मित्राची गोळी या मुलीच्या नवर्याला लागते आणि तो मरतो. मित्राला शिक्षा होत नाही, पण तो मनाने उध्वस्त होतो आणि शेवटी नायिका त्याच्याकडे जाते असे काहीसे. कोणी सांगू शकेल का पुस्तकाचे नाव आणि लेखक? जु न्या कोकणातली गोष्ट आहे बहुधा.
प्रेम की आकर्षण...(भाग ३)
आता त्या दोघांना ही उत्सुकता होती ती भेटायची दोघांना ही झोप लागत नव्हती. प्रियाच्या ही मनात आल आपण ही अमोल ला पत्र द्यावं. अता तिने ठरवलं ती पण त्याला पत्र लहीणार पण मुली जरा ह्या बाबतीत सावधान असतात हे पत्र तिने घरी न लहीता कॉलेज मध्ये
लिहायचे ठरवले. सकाळ झाली प्रिया कॉलेज ला आली लेक्चरला न बसता ती थेट लायब्ररी मध्ये गेली सकाळची वेळ लायब्ररी मध्ये जास्त गर्दी नव्हती. प्रिया ने पत्र लिहायला सुरुवात केली.
Pages
