लेखक, त्यांची पात्रे आणि One Liners
Submitted by हायझेनबर्ग on 1 October, 2018 - 16:47
सिनेमातल्या पात्रांच्या तोंडी चटपटीत, टाळीबाज डायलॉग आपण नेहमीच ऐकतो पण पुस्तकातल्या पात्रांचे? सिनेमात संहितेपासून संवाद लिहिणारे वेगवेगळे तज्ञ लोक असतात पण पुस्तकाच्या/कादंबरीचा लेखक ईमानेईतबारे ह्या सगळ्या जबाबदार्या शब्दशः एक हाती पेलत असतो.
मार्लन ब्रँडो किंवा आपल्या राजकुमार सारख्यांनी रंगवलेली पात्रे डायलॉगबाजीतून जबरदस्त टाळ्या मिळवतात पण लेखकांची पात्रे? त्या बिचार्यांच्या नशीबी वाचकाच्या चेहर्यावर ऊमटलेल्या एखाद्या स्मिताशिवाय, डोळ्यातल्या पसंतीच्या पावतीशिवाय किंवा कपाळावर पडलेल्या वा ऊलगडलेल्या आठीशिवाय फार काही येत नाही.
विषय: