सिनेमातल्या पात्रांच्या तोंडी चटपटीत, टाळीबाज डायलॉग आपण नेहमीच ऐकतो पण पुस्तकातल्या पात्रांचे? सिनेमात संहितेपासून संवाद लिहिणारे वेगवेगळे तज्ञ लोक असतात पण पुस्तकाच्या/कादंबरीचा लेखक ईमानेईतबारे ह्या सगळ्या जबाबदार्या शब्दशः एक हाती पेलत असतो.
मार्लन ब्रँडो किंवा आपल्या राजकुमार सारख्यांनी रंगवलेली पात्रे डायलॉगबाजीतून जबरदस्त टाळ्या मिळवतात पण लेखकांची पात्रे? त्या बिचार्यांच्या नशीबी वाचकाच्या चेहर्यावर ऊमटलेल्या एखाद्या स्मिताशिवाय, डोळ्यातल्या पसंतीच्या पावतीशिवाय किंवा कपाळावर पडलेल्या वा ऊलगडलेल्या आठीशिवाय फार काही येत नाही.
अशा डोक्यात घर करून राहिलेल्या पुस्तकातल्या पात्रांच्या तोंडची प्रसिद्ध किंवा तुम्हाला आवडलेली लहान मोठी वाक्ये लिहिण्यासाठी हा धागा.
तुम्ही वपूंचा पार्टनर वाचा किंवा जेके रोलिंगचा डंबलडोर ... एका ओळीत तत्वज्ञान सांगून जाणारे एखादे तरी वाक्य पुस्तकात सापडणार नाही असे शक्यतो होत नाही... चांगला लेखक एक चांगला विचारवंतही असतोच...
ईंग्रजी, मराठी, हिंदी भाषा चालेल... अनुवाद लिहिणार असाल तर फ्रेंच, जर्मन, बंगाली वगैरेही चालेल.
पण पुस्तकाचे, लेखकाचे आणि पात्राचे नाव जरूर लिहावे(च).
तीनेक वर्षांपूर्वी Midnight's Children वाचून डोके फिरवून घेतले (अर्थात 'भारावलो' ह्या चांगल्या अर्थाने ) तेव्हापासून रश्दींची काही वाक्ये कायमची डोक्यात घर करून बसली आहेत. अजूनही लख्खं आठवतंय Midnight's Children वाचतांना किमान चार ते पाच वेळा ते पुस्तक समोरच्या भिंतीवर फेकून मारण्याची आलेली तिडिक आणि त्या तिडिकेला बळी न पडता नेटाने वाचत राहून... ते पुस्तक संपवल्यावर अनेक महिने जे काय वाटत राहिले ते..... ते वाटणे शब्दात पकडता येण्यासारखे नाही. पण त्याच पुस्तकातली रश्दीची ही काही 'जेम' वाक्ये...
Midnight's Children - सलमान रश्दी
पात्र - सलीम सिनाई.
- We all owe death a life.
- Most of what happens in our life happens in our absence.
- What's real and what's true aren't necessarily the same.
- Children are the vessels into which adults pour their poison.
- I am the sum total of everything that went before me, of all I have been seen done, of everything done-to-me. I am everyone everything whose being-in-the world affected was affected by mine. I am everything that happens after I am gone which would not have happened if I had not come.
ही पहिली दोन माझी अतिशय आवडती आहेत.
शेवटचे तर गीतेतला श्लोक असावा असे काहीतरी
Catch 22 मधली पीळ वाक्ये लिहायचा मोह होतोय पण सध्या थांबतो.. सगळ्यांची त्यांच्या आवडत्या पात्रांची वाक्ये वाचायला आवडतील.
(टीप- सिनेमातले टाळीबाज One liners नको, कवितेच्या ओळी, शेर, लेखकाची पण पुस्तकात नसलेली वाक्ये, संत महात्म्यातले सुविचारही नकोत... फक्त पुस्तकातल्या पात्रांच्या तोंडची वाक्ये
एका प्रतिसादात शक्यतो एकाच पुस्तकातली वाक्ये लिहलीत तर बरेच.)
मस्त धागा, मी इथे पडिक असेन
मस्त धागा, मी इथे पडिक असेन
वरची वाक्य आवडली
उदाहरणार्थ
उदाहरणार्थ
Catch 22 मधली पीळ वाक्ये
Catch 22 मधली पीळ वाक्ये लिहायचा मोह होतोय पण सध्या थांबतो >>> हे सर्कास्टिकली लिहिले आहे, मजेने लिहिले आहे की कसे? Catch 22 तर आपले ऑल टाइम फेवरिट. मेजर मेजर मेजर हे पात्राचे नाव लिहू शकणार्या लेखकाला सलामच केला पाहिजे.
तुंबाडचे खोत - खंड २ वाचत होतो. नुकताच दिल से सिनेमातली गाणी लोकप्रिय झाली होती. घालिब वगैरे ऐकून पण माहिती नव्हते. चल ग बये आता कसं गुबुगुबु वाजतय वगैरे लिहिनारे गीतकार प्रिय असणारे आमचे मित्रवर्य आजुबाजुला.
इष्क पर जोर नही है ये वो आतिश गालिब हे तुंबाडमध्ये वाचून पेंडश्यांच्या कादंबरीतले वाक्य गुलझारने गाण्यात वापरले हे पाहून आनंदाने टणकन उडी मारली. आजही तो दिवस लख्ख आठवतो.
नेहमी खरे बोलावे - पुस्तक
नेहमी खरे बोलावे - पुस्तक शामची आई. लेखक साने गुरूजी
रच्याकने , ही सलमान रश्दी,
रच्याकने , ही सलमान रश्दी, मिडनाईट चिल्ड्रेन या पुस्तकाची जाहीरात आहे का ?
पुस्तक - The Picture of
पुस्तक - The Picture of Dorian Gray
लेखक - Oscar Wilde
पात्र - Harry आणि इतर
संवाद - https://en.m.wikiquote.org/wiki/The_Picture_of_Dorian_Gray
No one's happiness but my own
.
"Who is John Galt?"
"Who is John Galt?"
From Ayn Rand's novel Atlas Shrugged
"Real beauty, ends where an
"Real beauty, ends where an intellectual expression begins. "
"The only excuse for making a useless thing is that one admires it intensely.
All art is quite useless."
Oscar Wilde , Picture of Dorian Gray
"Faithfulness to the emotional life what consistency is to the life of intellect - simply confession of failures"
Oscar Wilde
गम्मत आहे. "मायबोली मराठी" वर
गम्मत आहे. "मायबोली मराठी" वर सगळी इंग्रजी पुस्तके आणि कोटस बद्दल लिहितोय आपण ....
इश्क़ पर ज़ोर नहीं है ये वो
इश्क़ पर ज़ोर नहीं है ये वो आतिश 'ग़ालिब'
गालिब चा शेर आहे तो.
"पायाला घाण लागू नये म्हणून
"पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस तसे मनालाही जप हो श्याम"
असं काहीसं वाक्य आहे ना 'श्यामच्या आई' मधे
Science and religion are not
Science and religion are not at odds. Science is simply too young to understand.
– Dan Brown, Angels & Demons
Men go to far greater lengths to avoid what they fear than to obtain what they desire.
– Dan Brown, The Da Vinci Code
Open your minds, my friends. We all fear what we do not understand.
– Dan Brown, The Lost Symbol
I'm a fan of the truth... even if it's painfully hard to accept.
– Dan Brown, Inferno
My friends, I am not saying I know for a fact that there is no God. All I am saying is that if there is a divine force behind the universe, it is laughing hysterically at the religions we’ve created in an attempt to define it.
– Dan Brown, Origin
Well, science and religion are not competitors, they’re two different languages trying to tell the same story. There’s room in this world for both.
– Dan Brown, Origin
हे सर्कास्टिकली लिहिले आहे,
हे सर्कास्टिकली लिहिले आहे, मजेने लिहिले आहे की कसे? Catch 22 तर आपले ऑल टाइम फेवरिट. मेजर मेजर मेजर हे पात्राचे नाव लिहू शकणार्या लेखकाला सलामच केला पाहिजे. Happy >
तुला काय वाटते?
सटायर संपून जिथे सर्काझम चालू होतो त्या सीमारेषेच्या जरा वीतभर आलीकडे थांबत हेलर ने जे लिहिलं आहे तेवढ्या ईफेक्टिवली सटायर लिहिणे ते ही वॉर सारख्या धीरगंभीर विषयावर ज्यावर विनोदी अंगाने सटायर लिहिणे कल्पनातीत आहे आणि तेही सलग साडेचारशे पानं... हेलरला सलाम, कुर्निसात, मुजरा वगैरे सर्वकाही.
माझेही ऑटाफे आहे रे.... 'पीळ' हृदयाला पीळ अर्थाने नाही तर... जनरली अॅक्सेप्टेड नॉर्म्स, समज, भाषा, सायकॉलॉजी वगैरे सगळ्यांना पीळ घालत (ट्विस्ट करत) तेच तेच वर्तुळाकार कोनातून लिहिणे हेच तर कॅच २२ चे व्यवच्छेदक लक्षण आहे.
ऊदा.
(मला योसेरियन सोडून बाकी पात्रांची नावं खास आठवत नाहीत आता.. पण सगळीच बहूतेक योसेरियनच्या तोंडी असावीत)
He was going to live forever, or die in the attempt.
Anything worth dying for ... is certainly worth living for
The enemy is anybody who's going to get you killed, no matter which side he is on
They agreed that it was neither possible nor necessary to educate people who never questioned anything.
(My favorite)
Insanity is contagious
The Texan turned out to be good-natured, generous and likable. In three days no one could stand him.
He was a self-made man who owed his lack of success to nobody.
'कॅच २२' - जोसेफ हेलर
ही सलमान रश्दी, मिडनाईट
ही सलमान रश्दी, मिडनाईट चिल्ड्रेन या पुस्तकाची जाहीरात आहे का ? >>
असे का वाटावे बुवा.
तीन वेळा बुकर मिळालेले जगातले एकमेव पुस्तक आणि नाईटहूड मिळालेला लेखक आता पंचवीस एक वर्षानंतर माझ्या जाहिरातीचा मोहताज असावा ही कल्पना पाव सेकंद सुखावून गेली
गम्मत आहे. "मायबोली मराठी" वर
गम्मत आहे. "मायबोली मराठी" वर सगळी इंग्रजी पुस्तके आणि कोटस बद्दल लिहितोय आपण .... >> खरच गम्मत आहे.
मला तर वाटले व पू आणि पु लं च्या Quotes नी वाहत जाईल हा धागा
स्ट्रेन्जर, थिंक लॉन्ग बिफोर
स्ट्रेन्जर, थिंक लॉन्ग बिफोर यू एन्टर... - जीए.
'The journey continued as though everything had happened!'
'If they killed him today, at least he would die alive!'
- दोन्ही 'द बुक थीफ'मधली.
पंचवीस एक वर्षानंतर माझ्या
पंचवीस एक वर्षानंतर माझ्या जाहिरातीचा मोहताज असावा ही कल्पना पाव सेकंद सुखावून गेली >>> का हो ? डॉक्टर दीक्षितांना भागवतांच्या जाहीरातीची गरज नाही पडली का ? रिसर्च पेपर पब्लिश झालेला प्रोफेसर मनुष्य आहे की तो ही
असो. इथे थांबतो.
जीएंचा तो परिच्छेद तुझ्या या
जीएंचा तो परिच्छेद तुझ्या या धाग्याच्या व्याख्येत बसत नाही बहुधा. पण माझा फार्फार आवडता आहे, त्यामुळे असू दे.
कॅच २२ चे सगळेच कोट्स मस्त.
कॅच २२ चे सगळेच कोट्स मस्त.
अच्छा! तुमचे ते हे तिथे
अच्छा! तुमचे ते हे तिथे अडकलंय होय...
तुम्ही माझ्या लेखी मायबोलीचे एक ऊत्तम वाचक असल्याने तुमच्या लिखाणातली खोच लगेच लक्षात आली नाही... माबुदोस 
असो. इथे थांबतो. >> ईथे तिथे न थांबता सरळ पुढे गेलात तर चालेल..
थोडक्यात move on my friend.
"आमाला पावर नाय"
"आमाला पावर नाय"
गम्मत आहे. "मायबोली मराठी" वर
गम्मत आहे. "मायबोली मराठी" वर सगळी इंग्रजी पुस्तके आणि कोटस बद्दल लिहितोय आपण ....
>>>
इंग्रजी पुस्तकातली अवतरणे गूगलवर पटकन सापडतात. मराठीतली कुठून आणायची?
"अहाहा, हीच ती खोली. हाच तो पलंग. अहाहा हीच ती खिडकी. मग कपाट उघडून आत बघत 'अहाहा, हीच ती नागडी बाई"
(अवतरण श्ब्दश: आठवत नाही पण जिस्ट हाच!)
सर पुस्तकांची नावं लिहा हो...
सर पुस्तकांची नावं लिहा हो.... कोणाची ऊत्सुकता चाळवल्याने
ईथून क्लू घेऊन शोधायचे म्हंटले तर थोडा तरी काडीचा आधार हवा ना...
आम्हाला माहित आहे.. पण सगळ्यांनाच थोडी माहित आहे तुम्ही कशाने ईन्स्पायर्ड आहात..
थोडक्यात move on my friend >>
थोडक्यात move on my friend >>> कोण सांगतंय

मला सात पाने चालवायचे नव्हते म्हणून थांबलो. एव्हढी चिकाटी नाही माझ्याकडे
कोकणातल्या फणसासारखीच तिथली
कोकणातल्या फणसासारखीच तिथली माणसे. खुप पिकल्याशिवाय गोडवा यायचा नाही.
-- अंतू बर्वा (पु. ल. देशपांडे)
इंग्रजी पुस्तकातली अवतरणे
इंग्रजी पुस्तकातली अवतरणे गूगलवर पटकन सापडतात. मराठीतली कुठून आणायची?>>>
या वरून स्फूर्ती घेऊन शोध घेतला तर हे सापडले:
https://www.maayboli.com/node/23822
There is only one thing that
There is only one thing that makes a dream impossible to achieve, the fear of failure !!!
इंग्रजी पुस्तकातली अवतरणे
इंग्रजी पुस्तकातली अवतरणे गूगलवर पटकन सापडतात. मराठीतली कुठून आणायची? >> टण्या थेट लोकांच्या धोतरालाच हात घालतो
अरूण, फाउल. अंतू बर्व्याचे
अरूण, फाउल. अंतू बर्व्याचे कोट नाही ते. नॅरेटर चे आहे
पुलंचे हे घ्या: "काकूचे मोतीबिंदूचे ऑपरेशन आहे. मास्तराच्या बायकोच्या गळ्यात मोत्ये नाही पडली. डोळ्यात पडली" - चितळे मास्तर.
किंवा: "तो वागळ्यांचा विन्या का नाही रे आला आज? बसा खाली. उठले सगळे. मर्तिकाला निघाल्यासारखे" - दामले मास्तर.
बाकी तो खुर्च्या मधला "... याचा विचार तुला मुक्तिदिनाच्या दिवशी करावा लागेल" वाला भाषांतरित कोट लिहाच कोणीतरी. इथे पुस्तक आत्ता नाही माझ्याकडे. मी तो कधीही एका फटक्यात वाचू शकत नाही न हसता.
Pages