सिनेमातल्या पात्रांच्या तोंडी चटपटीत, टाळीबाज डायलॉग आपण नेहमीच ऐकतो पण पुस्तकातल्या पात्रांचे? सिनेमात संहितेपासून संवाद लिहिणारे वेगवेगळे तज्ञ लोक असतात पण पुस्तकाच्या/कादंबरीचा लेखक ईमानेईतबारे ह्या सगळ्या जबाबदार्या शब्दशः एक हाती पेलत असतो.
मार्लन ब्रँडो किंवा आपल्या राजकुमार सारख्यांनी रंगवलेली पात्रे डायलॉगबाजीतून जबरदस्त टाळ्या मिळवतात पण लेखकांची पात्रे? त्या बिचार्यांच्या नशीबी वाचकाच्या चेहर्यावर ऊमटलेल्या एखाद्या स्मिताशिवाय, डोळ्यातल्या पसंतीच्या पावतीशिवाय किंवा कपाळावर पडलेल्या वा ऊलगडलेल्या आठीशिवाय फार काही येत नाही.
अशा डोक्यात घर करून राहिलेल्या पुस्तकातल्या पात्रांच्या तोंडची प्रसिद्ध किंवा तुम्हाला आवडलेली लहान मोठी वाक्ये लिहिण्यासाठी हा धागा.
तुम्ही वपूंचा पार्टनर वाचा किंवा जेके रोलिंगचा डंबलडोर ... एका ओळीत तत्वज्ञान सांगून जाणारे एखादे तरी वाक्य पुस्तकात सापडणार नाही असे शक्यतो होत नाही... चांगला लेखक एक चांगला विचारवंतही असतोच...
ईंग्रजी, मराठी, हिंदी भाषा चालेल... अनुवाद लिहिणार असाल तर फ्रेंच, जर्मन, बंगाली वगैरेही चालेल.
पण पुस्तकाचे, लेखकाचे आणि पात्राचे नाव जरूर लिहावे(च).
तीनेक वर्षांपूर्वी Midnight's Children वाचून डोके फिरवून घेतले (अर्थात 'भारावलो' ह्या चांगल्या अर्थाने ) तेव्हापासून रश्दींची काही वाक्ये कायमची डोक्यात घर करून बसली आहेत. अजूनही लख्खं आठवतंय Midnight's Children वाचतांना किमान चार ते पाच वेळा ते पुस्तक समोरच्या भिंतीवर फेकून मारण्याची आलेली तिडिक आणि त्या तिडिकेला बळी न पडता नेटाने वाचत राहून... ते पुस्तक संपवल्यावर अनेक महिने जे काय वाटत राहिले ते..... ते वाटणे शब्दात पकडता येण्यासारखे नाही. पण त्याच पुस्तकातली रश्दीची ही काही 'जेम' वाक्ये...
Midnight's Children - सलमान रश्दी
पात्र - सलीम सिनाई.
- We all owe death a life.
- Most of what happens in our life happens in our absence.
- What's real and what's true aren't necessarily the same.
- Children are the vessels into which adults pour their poison.
- I am the sum total of everything that went before me, of all I have been seen done, of everything done-to-me. I am everyone everything whose being-in-the world affected was affected by mine. I am everything that happens after I am gone which would not have happened if I had not come.
ही पहिली दोन माझी अतिशय आवडती आहेत.
शेवटचे तर गीतेतला श्लोक असावा असे काहीतरी
Catch 22 मधली पीळ वाक्ये लिहायचा मोह होतोय पण सध्या थांबतो.. सगळ्यांची त्यांच्या आवडत्या पात्रांची वाक्ये वाचायला आवडतील.
(टीप- सिनेमातले टाळीबाज One liners नको, कवितेच्या ओळी, शेर, लेखकाची पण पुस्तकात नसलेली वाक्ये, संत महात्म्यातले सुविचारही नकोत... फक्त पुस्तकातल्या पात्रांच्या तोंडची वाक्ये
एका प्रतिसादात शक्यतो एकाच पुस्तकातली वाक्ये लिहलीत तर बरेच.)
कैसा पान बनाऊ महाराज? पानवाला
कैसा पान बनाऊ महाराज?
पानवाला
टॉक्क !
टॉक्क !
फास्टर फेणे - भा. रा. भागवत
खरं तर सगळे कागद सारखेच…
<
ए मिस्टर फॅदरवेट, कम आऊटसाईड
ए मिस्टर फॅदरवेट, कम आऊटसाईड
शेठ मंगलदास, बेनसन जॉनसन अँड मंगलदास इंडिया लिमिटेड कंपनीचे मालक
असा मी असामी
कुठल्याच चपलेचे तळवे इतके
कुठल्याच चपलेचे तळवे इतके झिजलेले नव्हते ....
पु लं , चितळे मास्तर.
आपल्या लाईनकडे बघणे पण एक कला
आपल्या लाईनकडे बघणे पण एक कला आहे...लाईन ला नाही कळला पाहिजे की आपण तिच्या कडे बघतोय
समोर मॅडम किंवा सर आले न तरी पण बघता आला पाहिजे एकदम सुममध्ये...
शाळा
मिलिंद बोकील
प्रयास हा प्रतिभेचा प्राणवायू
प्रयास हा प्रतिभेचा प्राणवायू आहे - स. आ. कुडचेडकर
प्रयास हा प्रतिभेचा प्राणवायू
प्रयास हा प्रतिभेचा प्राणवायू आहे - स. आ. कुडचेडकर
>>
'केतकी पिवळी पडली' वाले का? प्रसिद्ध आहेत हो ते!
स त कुडचेडकर
स त कुडचेडकर
जीवन हा बगीचा आहे. तो फुलवाल
जीवन हा बगीचा आहे. तो फुलवाल तितका फुलतो.
प्रेम हे केळफूला सारखे असते
प्रेम हे केळफूला सारखे असते
सॉरी, पण पुलंची ही वाक्यं
सॉरी, पण पुलंची ही वाक्यं संदर्भासहित वाचली तरच मजा आहे.
पूर्वरंग मध्ये पु. ल. म्हणतात
पूर्वरंग मध्ये पु. ल. म्हणतात "पण भीतीप्रमाणे अज्ञानाची लाजदेखील यथेच्छ विभागली गेली की तिचा त्रास होत नाही." किंवा
सौंदर्याला कुठलेतरी अपेक्षा वाढवणारे अवगुंठन हवे. "
हा धागा एक अफाट दिसतोय. याची
हा धागा एक अफाट दिसतोय. याची वाचनखूण साठवली आहे.
Pages