पुस्तक

'धग’ - कादंबरी - पुस्तक परिचय

Submitted by मुग्धमानसी on 4 May, 2023 - 03:44

पुस्तक: ’धग’
लेखक: उध्दव ज. शेळके

’धग’ बद्दल आजवर खूप काही बोलले सांगितले लिहिले गेलेले आहे हे खरंच. उद्धव शेळकेंना ’कादंबरीकार’ म्हणून उदंड किर्ती मिळवून देणारी ही एक अत्यंत उत्कृष्ट कादंबरी आहे हे सिद्ध झालेलेच आहे. मी अजून वेगळे काय सांगणार? तरिही हे पुस्तक वाचायला सुरूवात केल्यापासून वाचून संपल्यानंतरही काही काळ ज्या अनुभूतीतून मी विलक्षण प्रवास केला त्यावर लिहिल्यावाचून राहवत नाही. किमान माझा वाचन अनुभव आणि माझ्या या कादंबरीबद्दलच्या तिच्या प्रभावाखाली मी अजूनही असतानाच्या ताज्या भावना कुठेतरी नोंदलेल्या रहाव्यात म्हणून हा लेखन प्रपंच!

द मिल हाऊस मर्डर्स (सुइशाकान नो सात्सुजिन): अयात्सुजी युकितो

Submitted by पायस on 20 April, 2023 - 06:45

"माझ्यापुरते सांगायचे तर डिटेक्टिव्ह कथा एकप्रकारचा बौद्धिक खेळ आहे. कादंबरीच्या स्वरुपात वाचक-डिटेक्टिव्ह, वाचक-लेखक अशा पातळ्यांवरील तर्काधिष्ठित खेळ. बस्स! त्यामुळे "शाकाई-हा" प्रवाहातल्या लेखकांच्या वास्तववादी कथा, ज्या जपानमध्ये कधीकाळी खूप लोकप्रिय होत्या, या कथाप्रकाराच्या मागण्या बिलकुल पुर्‍या करत नाहीत. कोणा ऑफिस लेडीचा स्टुडिओ अपार्टमेंटमध्ये खून होतो आणि टाचा झिजवून पोलिस तिच्या बॉसला अटक करतात. खुनाचे कारण काय तर - अफेअरमधून झालेले ब्लॅकमेल! भ्रष्टाचार, अंतर्गत राजकारण, आधुनिक समाजव्यवस्थेचे दुष्परिणाम इ. इ. मधून घडणारे ठोकळेबाज गुन्हे - आता ही कथानके पुरे!

विषय: 
शब्दखुणा: 

पुस्तक परिचय : The Far Field (Madhuri Vijay)

Submitted by ललिता-प्रीति on 4 April, 2023 - 02:58

बंगलोरमध्ये राहणारी तरुण नायिका. दक्षिण भारतीय. तिचं कुटुंब आधुनिक विचारांचं आहे. कुटुंब म्हणजे आता फक्त वडील. आईने सहा वर्षांपूर्वी आत्महत्या केलेली. आई मानसिक रुग्ण असते. त्यापायी अधूनमधून तिचं वागणं कधी अति मनस्वी, तर कधी पार तर्‍हेवाईक होत असतं. एरवी हे इतर चारचौघांसारखंच कुटुंब. सुट्ट्यांमध्ये ट्रिपला जाणारं, घरी पार्ट्या आयोजित करणारं, मित्रमंडळींना जेवायला बोलावणारं. सगळ्यात आईचाच पुढाकार. पण या पार्ट्या, ट्रिप्स सुरळीतपणे पूर्ण होतीलच याची शाश्वती नाही, त्याला कारणही आईचा आजार. वडील आणि मुलीला त्याची कल्पना असते. दोघं शक्यतो आईला सांभाळून घेण्याचा प्रयत्न करत असतात.

विषय: 

पुस्तक परीक्षण: महानायक

Submitted by निमिष_सोनार on 16 March, 2023 - 04:45

राजहंस प्रकाशनचे "विश्वास पाटील" लिखित नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या संपूर्ण जीवन गाथेवर आधारित "महानायक" पुस्तक नुकतेच वाचून संपवले. पुस्तकाबद्दल आणि लेखकाबद्दल सांगायला शब्द अपुरे पडत आहेत. महत्त्वाचं म्हणजे ज्या नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्यावर हे पुस्तक आधारित आहे त्यांचे व्यक्तिमत्व लिहिण्यासाठी मुळात कितीही शब्द लिहिले तरी अपुरे पडतील. नेताजींचे आयुष्य खूपच वेगळे होते. आपण कल्पनाही करू शकत नाही अशा गोष्टी त्यांनी शक्य करून दाखवल्या होत्या. केवळ आपली मातृभूमी स्वतंत्र करण्याच्या एकाच ध्यासापोटी!

विषय: 

माझी अमेरिका डायरी - ५ - वाचनालये आणि वाचन संस्कृती

Submitted by छन्दिफन्दि on 12 March, 2023 - 01:28

अमेरिकेतील अतिशय कौतुकास्पद वाटणारी एक गोष्ट म्हणजे इकडची सार्वजनिक वाचनालये! जाणून घेऊ या थोडंसं त्याविषयी …
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

समाधान

Submitted by सामो on 10 February, 2023 - 10:30

खरे तर हा लेख आहे पुस्तकाची ओळख जी की मी 'सध्या काय वाचताय' धाग्यावर देउ शकले असते. पण हे पुस्तक वाचल्यापासून माझ्या लक्षात एक आले आहे आणि ते म्हणजे आपल्याला हे पुस्तक नि-तां-त आवडले आहे. इट सिम्प्ली रेझोनेटस विथ माय फिलॉसॉफी ऑफ लाइफ. 'Embrace your inner sloth.' आजूबाजूची धावपळ, उरस्फोड, चिंधीभर तुकडे मिळवण्याकरता जीवघेणी स्पर्धा आणि एकंदरच असंतुष्टता आहे, ती माझ्या आकलनाबाहेर आहे. अंहं माझ्या अयुष्याचा ती हिस्सा आहे पण नेहमीच मला परका वाटत आलेला हिस्सा आहे.

तर हे पुस्तक आहे - Jamie Varon या लेखिकेचे Radically Content: Being Satisfied in an Endlessly Dissatisfied World

विषय: 

मराठी साहित्यातील प्रेम कथा सुचवाव्यात

Submitted by therising on 16 January, 2023 - 00:16

नमस्कार,
परवाच सुहास शिरवळकर यांची'जाई' ही कादंबरी वाचण्यात आली. जाईच्या कथानकात आणि तरल प्रेमकथेत अक्षरशः न्हाऊन निघाल्याची भावना झाली.
या कथेनंतर मराठी साहित्यातील इतर अजरामर आणि कमी माहिती असलेल्या (अंडररेटेड) प्रेमकथा वाचण्याचा मोह आवरला गेला नाही, या कादंबरीनंतर शिरवळकर यांच्या तलखी, कोवळीक, मुक्ती या कादंबऱ्या वाचावयास घेतल्या आहेत पण तरीही असे राहून राहून वाटले की जाईची सर इतर कथांना नाही.
कृपया आपणास माहिती असलेले मराठीतील इतर प्रेमकथा साहित्य सुचवावे.
धन्यवाद.

पुस्तक परिचय : Are You Posture Perfect?

Submitted by शैलपुत्री on 6 January, 2023 - 05:50

खरं तर गेली वर्षभर, मी दुखण्यामुळे घरातच नैराश्याच्या गर्तेत अडकून पडले होते. ज्या डॉक्टरांनी (डॉ. विनायक देंडगे, पुणे) मला या सगळ्यातून बाहेर काढले, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच त्यांनी आणि डॉ. राजश्री लाड यांनी लिहिलेल्या अतिशय महत्त्वाच्या पुस्तकाची ओळख करून देण्यासाठी हा लेखनप्रपंच.

या धाग्याच्या सुरुवातीच्या अर्ध्या भागात मी माझा स्वानुभव आणि उरलेल्या अर्ध्या भागात पुस्तक परिचय मांडलेला आहे. कारण त्याशिवाय माझी हा धागा लिहिण्यामागे असलेली कळकळ तुम्हांपर्यंत पोचू शकणार नाही असे मला खात्रीने वाटते. असो.

ही काही गोष्ट असू शकत नाही...

Submitted by संप्रति१ on 25 December, 2022 - 02:18

त्याचं झालं असं की कालपरवाकडे एकीने 'एक्सक्युज मी अंकल' म्हणून माझा अपमान केला. मी पण 'बोला मावशी' म्हणून परतफेड केली. त्यावेळी मी चेहऱ्यावर नेहमीचंच भंपक हाफ-स्माईल धारण केलेलं. त्यामुळे ती हसायला लागली. अपमान परिणामकारक झाला नसावा, असं मला वाटलं.
पत्ता शोधत होती बाय द वे.

"एफसी रोडला कुठून जायचं काका ?" तिनं पुन्हा एकदा
अपमान केला.. ह्यावेळी ठरवून. आणि मातृभाषेतून..!

"आता ह्या वयात एफसी रोडला जाऊन काय करणार मावशी तुम्ही??" मी जवाबी हमला केला.

Pages

Subscribe to RSS - पुस्तक