मरणात खरोखर जग जगते
तुम्हाला एखाद्या निवांत वेळी कालकुपीत जायचय का? नसेल जायचं तरी जाउन पहा.तारा भवाळकरांच मरणात खरोखर जग जगते हे पुस्तक वाचताना मला तो अनुभव आला. तस मी ललित कथा कादंबर्या या गोष्टीत फारसा रमत नाही. पण परवा सकाळी फिरायला गेल्यावर जवळ दामलेकाकांच्या रस्त्याच्या कडेला असलेल्या मोफत खुल्या लायब्ररीत मात्र डोकावतो. तिथे मला हे पुस्तक दिसलं. डोक्यात जरा गोंधळ झाला. कारण या नावाचं बाळ सामंत यांचे एक पुस्तक आहे. मला ते पुस्तक हवं होतं.तारा भवाळकर माझ्या फेसबुक फ्रेंड आहेत म्हणून मी अधून मधून शायनिंग ही मारत असतो. लोकसंस्कृती स्त्री साहित्य हा त्यांचा प्रांत .