Submitted by therising on 16 January, 2023 - 00:16
नमस्कार,
परवाच सुहास शिरवळकर यांची'जाई' ही कादंबरी वाचण्यात आली. जाईच्या कथानकात आणि तरल प्रेमकथेत अक्षरशः न्हाऊन निघाल्याची भावना झाली.
या कथेनंतर मराठी साहित्यातील इतर अजरामर आणि कमी माहिती असलेल्या (अंडररेटेड) प्रेमकथा वाचण्याचा मोह आवरला गेला नाही, या कादंबरीनंतर शिरवळकर यांच्या तलखी, कोवळीक, मुक्ती या कादंबऱ्या वाचावयास घेतल्या आहेत पण तरीही असे राहून राहून वाटले की जाईची सर इतर कथांना नाही.
कृपया आपणास माहिती असलेले मराठीतील इतर प्रेमकथा साहित्य सुचवावे.
धन्यवाद.
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
अनंत तिबिल्यांच मादी ही वाचुन
अनंत तिबिल्यांच मादी ही वाचुन बघा. आवडेल तुम्हाला.
माझ्या वैयक्तिक दोन तीन
माझ्या वैयक्तिक दोन तीन अंडररेटेड प्रेमकथा आहेत. सेन्सॉर बोर्डाने अडवणूक केली नाही तर छापून झाल्यावर लगेच कळवतो.
जाई वाचली,
जाई वाचली,
बरसात चांदण्यांची वाचा सुशिंची.नक्की आवडेल.
जरा मिल्स अँड बून चे मराठी व्हर्जन वाचायचे असेल तर कुमुदिनी रांगणेकरांच्या नयनांची निरंजने.
माझ्या वैयक्तिक दोन तीन
माझ्या वैयक्तिक दोन तीन अंडररेटेड प्रेमकथा आहेत. ..... आने दो बिन्धास्त