कहाणी निळ्या डोळ्यांच्या रवीची!*
दहावी झाल्यावर शाळा सोडल्यानंतर २० वर्षांनी आम्ही सर्व मित्र आज भेटणार होतो. पस्तीशीला आलेले सगळे मित्र आता कसे दिसतात, हे पाहायची उत्सुकता मनात होती. Whatsapp वगैरेचा जमाना नसलेला तो काळ होता. त्यामुळे अगदी निवडक मित्र आता संपर्कात होते. नोकरी-व्यवसायासाठी पुण्याबाहेर किंवा पुण्यातच दूरवर गेलेले अनेक मित्र आज २० वर्षांनी भेटणार होते.
"मंदिराला कळस होता सोन्याचा, गाभाऱ्याला घमघमाट होता चंदनाचा, समईच्या वातीला तुप त्यात केशराची धुप, चोहीकडे पुण्य पुण्याचाच उत, कुणी सांगावे या सोगांड्यांना?
गर्भगृहाचा तो दगड सुखला होता दुधाशी, अन पायरीवर मात्र देव निजला होता उपाशी."
वाचायला किती भारी वाटतं ना?
सदरची चारोळी एका समाज माध्यमावर वाचनात आली.
ही चारोळी रसात्मक रूपाने उत्तम आहे. मात्रांचा मेळ ही जमला आहे, जो संदेश द्यायचा आहे तो देखील अत्यंत कल्पकतेने दिला आहे ,पण देण्यात आलेला संदेश मात्र चुकीचा आहे.
उत्तर.
द्वान ईव्हने समारंभपूर्वक सोन्याचे अंतिम कनेक्शन सोल्डर केले. डझनभर टेलिव्हिजन कॅमेऱ्यांच्या साक्षीने संपूर्ण विश्वात तो कार्यक्रम प्रसारित होत होता. त्याची दृश्ये दाखवली जात होती. द्वान ईव्हने समाधानाने मान डोलवली.
नंतर ती स्विचच्या बाजूला जाऊन उभी राहिली. विश्वातील मानवी संस्कृती असलेल्या सर्व ग्रहांच्या सर्व मॉन्स्टर कंप्युटिंग मशीनना एकाच वेळी कनेक्ट करेल असा तो स्विच होता. छप्पन अब्ज ग्रहांच्या -- सुपर सर्किटना एका सुपरकॅल्क्युलेटरमध्ये जोडेल, एक सायबरनेटिक्स मशीन जे सर्व आकाशगंगांचे सर्व ज्ञान एकत्र करेल अशी त्याची क्षमता होती.
कॉंग्रेसच्या बाजूनं कुणी व्होकल होत नव्हतं. कॉंग्रेसच्या काळात हगल्या पादल्याला चुरूचुरू बोलणारे आणि आता नंतर बिळात लपून बसलेले हे आमचे सेलिब्रिटी, कलावंत, क्रिकेटर्स..! अजून फार काय बिघडलं नाही, म्हणत वाळूत तोंड खुपसून बसलेले हे आमचे विचारवंत, लेखक..! भरपूर आणि प्रचंड स्वरूपाचे पराभव बघितले या काळात. खिल्ली उडवायचे लोक. ऐकून घेतलं. पण आता तशी काही गरज राहिली नाही, असं वाटतं. या जनादेशानं एक राक्षसी पकड ढिली केली आहे. विरोधी आवाजाला एक मुक्तिदायी अवकाश मोकळा करून दिला आहे. कॉंग्रेसमुक्त भारताच्या आरोळ्या ठोकणाऱ्यांना द्यायचं ते उत्तर दिलं आहे.
प्रतिबिंब
हातातलं वर्तमान पत्र डॉक्टरनी बाजूला भिरकावलं आणि त्यांनी जांभई दिली. आज सकाळीच ते आपल्या घरी पोचले होते . अमेरिका ते मुंबई, मुंबई ते पुणे आणि पुण्याहून आपल्या गावी हा इतका दूरचा प्रवास झाल्याने त्यांना खरं तर सारखी झोप येत होती. पण वर्षा सव्वा वर्षानं घरी आल्यामुळे आपल्या बायकोशी, सियाशी गप्पा सुद्धा त्यांना माराव्याशा वाटत होत्या. आपण गावात नसताना काय काय विशेष घडलं हे त्यांना जाणून घ्यायची उत्सुकता होती.
माबोकरांनो, कथा चालू करण्याआधी थोडं लिहीते.
कथा वाचायला लागल्यावर तुम्हाला कळेलंच की शिवाजी महाराजांच्या जीवनावर बेतलेली ही एक काल्पनिक कथा आहे. माझ्या मनातल्या एका केवळ कल्पनेचा केलेला हा विस्तार आहे. त्यामुळे यात खूप तर्क शोधायला जाण्यात फार अर्थ नाही. कदाचित ही कल्पना वेडगळ वाटू शकेल...नव्हे आहेच. पण माझ्या मनात ही कल्पना आल्यावर ती उतरवणे भाग होते...त्याचे फलित ही कथा आहे. एक कल्पनाविलास यापेक्षा जास्त याचे महत्व नाही!
तीन भागांची ही छोटेखानी कथा मी पुढल्या काही दिवसांत क्रमशः प्रसिद्ध करेन.
A Midsummer Night's Dream
संध्याकाळचे पाच वाजले कि माझी पाउलं शेट्टीच्या हॉटेलकडे वळतात. शेट्टीच्या हॉटेलमध्ये माझे एक खास टेबल आहे. शेट्टीला हे माहित आहे. मी येईपर्यंत तो त्या टेबलावर रिझर्वडची पट्टी लावून ठेवतो. त्या टेबलावरून मला रस्त्यावरची रहदारी पहायला आवडते. तसेच हॉटेलात बसलेल्या काही लोकांचेही दर्शन होते. त्यांना पाहून विचारांची गाडी स्वैर धावू लागते. किती शिकला असेल, कुठे नोकरी करत असेल, आपल्या आयुष्यात हा सुखी समाधानी असेल का?
ह्या विचारांना काही अंत नाही.