मभागौदि २०२५ शशक _ धन वर्षाव _ अनन्त्_यात्री

Submitted by अनन्त्_यात्री on 23 February, 2025 - 04:42

सर्वपित्रीची रात्र

गावकुसाबाहेर तीन पिंपळामधल्या जागेत माझ्या तरस कातड्याच्या आसनासमोरचं धगधगतं, वखवखलेलं आहुतीकुंड.

शेवटच्या आहुतीच्यावेळी महामांत्रिकानं लालभडक पट्टीनं डोळे झाकलेयत माझे.

ही महाआहुती ..कारण ती अर्भकाची.

याचे आई बाप काय करतील बाळ बळी गेल्याचं कळल्यावर?

आता असल्या वांझोट्या विचारांना थारा नाही. अन्यथा गुप्तधनाची संधी कायमची जाईल.

महामांत्रिकानं दिलेली सुरी अर्भकदेहात भोसकली अन् तिचं ज्वालार्पण तर केलं एकदाचं..

आता फक्त एक महिना..पुढच्या अमावस्येला धनवर्षाव.....

पण अरे..हे सर्च लाईट?
ह्या शिट्ट्या?
हा महामंत्रिक कुठं पळतोय?
~~~~~~~~~~~~~
ब्रेकिंग न्यूज ..
फास्टट्रॅक कोर्टाचा निकाल:
फाशी ठोठावली...
गुप्तधनासाठी
.
.
कन्याबळी देणाऱ्या बापाला

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

भारी!