प्रकाशचित्रांचा झब्बू

मभागौदि २०२५ - प्रकाशचित्रांचा झब्बू - १ पारंपरिक मराठी पोशाख आणि दागिने

Submitted by संयोजक-मभागौदि-2025 on 24 February, 2025 - 03:57

जागतिकीकरणामुळे ज्या अनेक बर्‍यावाईट गोष्टी झाल्या त्यातली एक म्हणजे पेहरावात आलेले साधर्म्य. आजमितीला Traaditional Day/ Ethnic Day वगळता चार वेगवेगळ्या प्रदेशांतील चार व्यक्ती जवळपास उभ्या असल्यं, तर त्या कोणकोणत्या प्रदेशांतील आहेत ते ओळखताही येणार नाही. प्रत्येक प्रदेशाच्या पोशाखांची काही वैशिष्ट्ये असतात. महाराष्ट्रात तर नुस्त्या पगड्यांचेसुद्धा अनेक प्रकार आहेत.

मभागौदि २०२५ - प्रकाशचित्रांचा झब्बू - माझी मराठी पुस्तके

Submitted by संयोजक-मभागौदि-2025 on 14 February, 2025 - 22:45

मराठी - आपली मातृभाषा, आपली मायमराठी!
ह्या भाषेशी आपली पहिली ओळख अर्थातच बोलण्याऐकण्यातून होते; पण ती खरी वृद्धिंगत होते वाचनातून.
मराठी साहित्याला सृजनशीलतेचा व विविधतेचा मोठा वारसा लाभलेला आहे. अनेक साहित्यिकांच्या पुस्तकांमधून तो जोपासला आहे.
आपल्या सर्वांच्या संग्रही मराठी भाषेतील पुस्तके असतीलच. चला, या मराठी भाषा गौरव दिना निमित्त त्यांची छायाचित्रे / प्रकाशचित्रे इथे आणू या.

विषय: 

मायबोली गणेशोत्सव २०१४ : उपक्रम "प्रकाशचित्रांचा झब्बू -पंचमहाभूते "

Submitted by संयोजक on 25 August, 2014 - 10:44

गणपती बाप्पा मोरया!

त्वं भूमिरापोऽनलोऽनिलो नभः |
भूमि(जमिन), आप(जल/ पाणी), अनल (अग्नी), अनिल (वारा) आणि नभ (आकाश) ही पंचमहाभूते म्हणजे तूच! अशी आपण गणेशाची प्रार्थना करतो. सृष्टीच्या निर्मितीमध्ये ज्यांचे अढळ स्थान आहे, इतकेच नाही तर रोजच्या आयुष्यातही ज्यांच्याशिवाय आपले पानही हालत नाही अशी ही पंचमहाभूते! सृष्टीच्या निर्मितीमध्ये सहभाग असणारी ही पंचमहाभूते सृष्टी उध्वस्त करण्याचीही ताकद बाळगतात. यांची रूपे जितकी सुंदर तितकीच रौद्रही!
चला तर मग, झब्बूच्या खेळानिमित्त ह्या पंचमहाभूतांची विविध रूपे पाहूया.

हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.

Subscribe to RSS - प्रकाशचित्रांचा झब्बू