मभागौदि २०२५ - प्रकाशचित्रांचा झब्बू - माझी मराठी पुस्तके

Submitted by संयोजक-मभागौदि-2025 on 14 February, 2025 - 22:45

मराठी - आपली मातृभाषा, आपली मायमराठी!
ह्या भाषेशी आपली पहिली ओळख अर्थातच बोलण्याऐकण्यातून होते; पण ती खरी वृद्धिंगत होते वाचनातून.
मराठी साहित्याला सृजनशीलतेचा व विविधतेचा मोठा वारसा लाभलेला आहे. अनेक साहित्यिकांच्या पुस्तकांमधून तो जोपासला आहे.
आपल्या सर्वांच्या संग्रही मराठी भाषेतील पुस्तके असतीलच. चला, या मराठी भाषा गौरव दिना निमित्त त्यांची छायाचित्रे / प्रकाशचित्रे इथे आणू या.

तुमच्या संग्रहातील मराठी पुस्तकांची प्रकाशचित्रे या धाग्यावर द्या. पुस्तकांचा संग्रह, पुस्तकांसोबत तुमचे प्रकाशचित्र अथवा सेल्फी, तुमच्या बाळगोपळांचे मराठी वाचतानाचे प्रकाशचित्र तुम्ही या धाग्यावर टाकू शकता. ते करताना कृपया खालील नियम व अटी पाळाव्यात.

१. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
२. प्रकाशचित्र एडिट केलेले किंवा कोलाज नको.
३. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
४. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मराठी भाषा गौरव दिन २०२५' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
५. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.
६. झब्बूचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबियांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातील नसावे.
८. एक सदस्य एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
९. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावी.

मायबोलीचे प्रकाशचित्रांबद्दलचे धोरण इथे पाहा - http://www.maayboli.com/node/47635

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे पुस्तक नाही , " यशवंत " नावच मासिक येत असे आमच्या घरी, त्याचे अंक बाईंड करून ठेवले आहेत. बाकी अनेक मराठी पुस्तकं मध्यंतरी देऊन टाकली पण हे नीट जपून ठेवलं आहे . बघू किती दिवस टिकत ते. असो.
हा फोटो आहे तो जानेवारी १९२९ म्हणजे शहाण्णव वर्षा पूर्वीचा अंक आहे. बाजुला डोंगरे बालामृत ची जाहिरात ही आहे.
20250226_100529.jpg

डोंगरे यांचे बालमृत। किती वर्षांनी पाहिली ही जाहिरात.
याचे "तमृलाबा चेयां रेगडों" असे म्हणणे एकेकाळी प्रसिद्ध होते म्हणे, "नकादु चेण्यापका सके" सारखे.

» » »Submitted by छन्दिफन्दि on 26 February, 2025 - 08:06
माझा झब्बू.

मुखपृष्ठ
.

मलपृष्ठ

पुस्तकाबद्दल आणिक काय लिहिणे?
मलपृष्ठावरचा फोटो मात्र खूप काही सांगून जातो.

मस्त मस्त मस्त, एकसे एक सहीच.>>>+11111
मला छंदिफंदी, मनमोहन,सुनील यांनी टाकलेले प्रचि पाहून एकदम nostalgic वाटलं...लहाणपणी आमचं गाव छोटं असूनसुद्धा तिथे खूपच छान वाचनालय होत़े...उन्हाळ्यात 5 rs. महिना देऊन अगदी अधाशासारखे पुस्तक वाचन करत असू..बरेचदा त्याची आठवण येते...आणि विशेष म्हणजे नवीन कोर्या पुस्तकांपेक्षा अशी जुनी झालेली पुस्तके वाचायला जास्त आवडतात...त्यातही ती वाचनालयातील असतील तर अजूनच मजा कारण आपल्यासारख्याच असंख्य वाचनप्रेमींचा स्पर्श त्या पुस्तकाने अनुभवला असतो...असो...बरंच विषयांतर झालं...बरं इतके विषयांतर झालेच आहे तर अजून एक विचारते ,मी अकोल्याला एका चांगल्या वाचनालयाच्या शोधात आहे...इथे कोणी अकोल्याचे असतील, कोणाला माहित असेल तर कृपया सांगा...

आतापर्यंत आले ते फोटो छानच !
पण कमी का आले? मायबोलीकरांकडून हे अपेक्षित नाही Happy
मी मुंबईला असतो तर निदान बालपणीची फाफे टाइप्स पुस्तके शेअर केली असती.

नाही, पण इथे ती घेऊन आलो नाही. मुंबईमधील घराच्या पोटमाळ्यावर पडून आहेत. मुले अजून वाचत नाहीत मराठी पुस्तके.

आमच्याकडे सध्या असलेल्या मराठी पुस्तकांचा फोटो..

प्रत्येक पुस्तकाचा फोटो काढणं किचकट आहे.. म्हणून एकत्र... २५ पुस्तकांचा गड्डा झब्बू.. वर निलेश८१ ने ही तसच दिलाय..

PXL_20250301_070413790~2.jpg

मी ही सध्या गड्डा झब्बू देतो.
आमच्या शयनगृहात दोन्ही बेडसाईड टेबलच्या वर कमी डेप्थची पुस्तकांची दोन कपाटं आहेत.
त्यापैकी हे एक...


मोक्षू, त्या अकबर बिरबलाच्या पुस्तकावर जे चित्र आहे ते सहस्रबुद्धे म्हणून आहेत त्यांनीच काढलं आहे ना? त्यांची चित्रं ओळखू येतात आणि छान असतात.

पोस्ट नाही एक विशेषांक..
पण बऱ्याच लष्कराच्या भाकऱ्या भाजल्यात ह्याच्यापायी
त्यामुळे अजून एक झब्बू टाकते..
Screenshot_20250228-234333.png

मोक्षू, त्या अकबर बिरबलाच्या पुस्तकावर जे चित्र आहे ते सहस्रबुद्धे म्हणून आहेत त्यांनीच काढलं आहे ना? त्यांची चित्रं ओळखू येतात आणि छान असतात.>>>हो, गिरीश सहस्रबुद्धे

आणि हे ट्राँटो शहरातील मध्यवर्ती ग्रंथालय. आणि तिथे असलेल्या काही मराठी पुस्तकांतील एक पुस्तक.

toronto public library.jpgmarathi pustak toronto lib.jpg

Pages