मराठी - आपली मातृभाषा, आपली मायमराठी!
ह्या भाषेशी आपली पहिली ओळख अर्थातच बोलण्याऐकण्यातून होते; पण ती खरी वृद्धिंगत होते वाचनातून.
मराठी साहित्याला सृजनशीलतेचा व विविधतेचा मोठा वारसा लाभलेला आहे. अनेक साहित्यिकांच्या पुस्तकांमधून तो जोपासला आहे.
आपल्या सर्वांच्या संग्रही मराठी भाषेतील पुस्तके असतीलच. चला, या मराठी भाषा गौरव दिना निमित्त त्यांची छायाचित्रे / प्रकाशचित्रे इथे आणू या.
तुमच्या संग्रहातील मराठी पुस्तकांची प्रकाशचित्रे या धाग्यावर द्या. पुस्तकांचा संग्रह, पुस्तकांसोबत तुमचे प्रकाशचित्र अथवा सेल्फी, तुमच्या बाळगोपळांचे मराठी वाचतानाचे प्रकाशचित्र तुम्ही या धाग्यावर टाकू शकता. ते करताना कृपया खालील नियम व अटी पाळाव्यात.
१. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
२. प्रकाशचित्र एडिट केलेले किंवा कोलाज नको.
३. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
४. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मराठी भाषा गौरव दिन २०२५' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
५. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.
६. झब्बूचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबियांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातील नसावे.
८. एक सदस्य एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
९. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावी.
मायबोलीचे प्रकाशचित्रांबद्दलचे धोरण इथे पाहा - http://www.maayboli.com/node/47635
पॅांडेचरीला एका दक्षिणात्य
पॅांडेचरीला एका दक्षिणात्य मैत्रिणीकडे गेले होते तिच्याकडे एक जुने पाककृतीचे पुस्तक त्यातील काही पाने


तामीळ, इंग्रजी व मराठी तीन भाषेत आहे.
मस्तच की टण्या!
मस्तच की टण्या!
जॉब मिळण्यापूर्वी अनेकदा उगाच घरात कुठे बसायचं म्हणून स्ट्रीटकार-सबवेने इथे बसुन उगाच पुस्तकं ढुंडाळली आहेत. 
टोरांटो पब्लिक लायब्ररी यंग आणि ब्लोरची सुरेख आहे.
हा माझ्याकडचा खजिना
हा माझ्याकडचा खजिना

(No subject)
Pages