पंचतत्व
अनंत आकाश पाहता
मन माझे मोठे झाले
तेच आकाश मनात कोंबले
क्षणात सुक्ष्म अती लघू झाले ||१||
विस्तीर्ण जलाशय तो सागर
त्यापुढती मी यकश्चित केवळ
नाव घडवली फळकुट घेवून
लिलया पार कराया मिळे बळ ||२||
डोंगरांचे पर्वत जाहले
लंघून जाण्या उर धपापले
विमानात मात्र बसता
गिरिशिखर भव्य भासले ||३||
संकटांची धग आली पेटून
शत्रूसमान खिंडीत गाठून
वारामागून वार करून
पराजीत केले त्यांना जिंकून ||४||
गणपती बाप्पा मोरया!
त्वं भूमिरापोऽनलोऽनिलो नभः |
भूमि(जमिन), आप(जल/ पाणी), अनल (अग्नी), अनिल (वारा) आणि नभ (आकाश) ही पंचमहाभूते म्हणजे तूच! अशी आपण गणेशाची प्रार्थना करतो. सृष्टीच्या निर्मितीमध्ये ज्यांचे अढळ स्थान आहे, इतकेच नाही तर रोजच्या आयुष्यातही ज्यांच्याशिवाय आपले पानही हालत नाही अशी ही पंचमहाभूते! सृष्टीच्या निर्मितीमध्ये सहभाग असणारी ही पंचमहाभूते सृष्टी उध्वस्त करण्याचीही ताकद बाळगतात. यांची रूपे जितकी सुंदर तितकीच रौद्रही!
चला तर मग, झब्बूच्या खेळानिमित्त ह्या पंचमहाभूतांची विविध रूपे पाहूया.
हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.