Submitted by ऋतुराज. on 23 February, 2025 - 10:34
साक्षात समुद्रमंथनातून निघालेल्या चौदा रत्नांपैकी एक - पारिजात वृक्ष. साहजिकच इंद्राने तो त्याच्या बागेत लावला. पुढे नारदमुनींनी त्याचे रसभरीत वर्णन केल्यावर रुक्मिणीला त्या फुलांचा मोह झाला. त्यावर कृष्णाने तिला ती फुले आणून दिली परंतु सवतीमत्सराने सत्यभामेला देखील त्या फुलांचा मोह झाला. मग सत्यभामेने "हा स्वर्गीय वृक्ष मला माझ्या बागेत हवाच" असा हट्ट धरला. आता झाली का पंचाईत? मोठा कठीण प्रश्न. शेवटी स्त्रीहट्टच तो, पण कृष्णाने एक युक्ती केली. पारिजातकाचे झाड त्याने सत्यभामेच्या अंगणात असे लावले की त्याच्या फांद्या रुक्मिणीच्या अंगणात वाकत होत्या. सडा पडायचा तो रुक्मिणीच्या अंगणात.
..........बहरला पारिजात दारी फुले का पडती शेजारी?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुरेख.
सुरेख.
(No subject)
मस्त
मस्त
सुंदर.
सुंदर.
खतरनाक
खतरनाक
असेले का हे नाट्य तयांचे
असेले का हे नाट्य तयांचे
मज वेडीला फसवायाचे
कपट का करिती चक्रधारी
सह्ही!!
फुले का पडती शेजारी? ❤
फुले का पडती शेजारी… ❤
मस्त! हे ऐकले वाचले नव्हते.
मस्त!
हे ऐकले वाचले नव्हते.
वाह! सुंदर जमलीय कथा!!
वाह! सुंदर जमलीय कथा!!
हे ऐकले वाचले नव्हते >>>
हे ऐकले वाचले नव्हते >>>
ऋतुराज, पौराणिक कथेतही बॉटनी!
ऋतुराज, पौराणिक कथेतही बॉटनीवाली निवडलीस! भारीच.
मस्त!
मस्त!
मस्त! ही कथा माहीत होती पण
मस्त! ही कथा माहीत होती पण इथे शंभर शब्दात चपखल जमली आहे.
पारिजात हा समुद्रमंथनातून आला हे माहीत नव्हते.
छान शशक.
छान शशक.
सुंदर!
सुंदर!
मस्त! ही कथा माहीत होती पण
मस्त! ही कथा माहीत होती पण इथे शंभर शब्दात चपखल जमली आहे.
पारिजात हा समुद्रमंथनातून आला हे माहीत नव्हते.>>+१
सुरेख जमली आहे कथा!
सुरेख जमली आहे कथा!
लक्ष्मी: कौस्तुभ-पारिजातक-सुरा-धन्वंतरीऽऽश्चंद्रमा ....
14 रत्नांची नावं असलेलं मंगलाष्टक आहे ना.
(सॉरी अगदीच रहावलं नाही. )
सुंदर !
सुंदर !
साजणवेळा कार्यक्रमात ग्रेस
साजणवेळा कार्यक्रमात ग्रेस यांच्या ललित लिखाणात आलेला याच कथेचा काही भाग चंद्रकांत काळे यांच्या आवाजात या इथे आहे, ही कथा वाचून ते अभिवाचन आठवले, शंभर शब्दात छान बसवले आहे तुम्ही
https://youtu.be/4DR_vp55oYw?si=r6-fPE6cRpcmnDQX&t=289
मस्त शशक
मस्त शशक
पारिजात हा समुद्रमंथनातून आला हे माहीत नव्हते.>>+१
छान!
छान!
आत्ता नक्की नाव आठवत नाही
आत्ता नक्की नाव आठवत नाही परंतु बहुदा "उघडले स्वर्गाचे दार" किंवा तत्सम नाटकात हा पारिजातकाचा प्रसंग पहिल्याच स्मरते.
सुंदर, सुंदर!!
सुंदर, सुंदर!!
पारिजात हा समुद्रमंथनातून आला हे माहीत नव्हते. >>> +१
सुंदर.
सुंदर.
कथा माहीत होती .
पारिजात हा समुद्रमंथनातून आला हे माहीत नव्हते. >> +1
(No subject)
अभिनंदन!!!
अभिनंदन!!!
अभिनंदन ऋतुराज!
अभिनंदन ऋतुराज!
हार्दिक अभिनंदन ऋतुराज.
हार्दिक अभिनंदन ऋतुराज.
अभिनंदन ऋतुराज.
अभिनंदन ऋतुराज.
अभिनंदन ऋतुराज ....
अभिनंदन ऋतुराज ....
Pages