नैसर्गिक संसाधनांमधून गणेश - {( सौ.) अतरंगी}
सृजनशीलता हा माझा प्रांत नाही.
मी फक्त कापाकापी व बायको सांगेल ते तिला आणून देणे एवढेच केले आहे.
सृजनशीलता हा माझा प्रांत नाही.
मी फक्त कापाकापी व बायको सांगेल ते तिला आणून देणे एवढेच केले आहे.
लागलेले साहित्य-
१ टोमॅटो डोक्यासाठी
१ सफरचंद पोटासाठी
२ गाजराच्या चकत्या कानांसाठी
१ गाजराचे डोके मुकूट म्हणून
२ लवंगा डोळ्यांसाठी
१ मिरची सोंडेसाठी
मला इथे खूप छान छान प्रवेशिका द्यायच्या होत्या पण अजिबात वेळ मिळत नाहीये. इतके पॅक दिवस असताना पण कशी का होईना एखादी तरी प्रवेशिका द्यावीच वाटावं इतके सुंदर आणि कल्पक उपक्रम यावेळेला आहेत. संयोजकांचं खूप कौतुक आणि मनापासून आभार.
गणपती बाप्पा मोरया!
पेन्सिलने बेसिक स्केच काढून घेतलं. (चित्र यूट्यूब वर बघून काढलं आहे. )
मग फेविकॉलने हळू हळू -- तूर डाळ, मूग डाळ, मूग, राई आणि जिरं चिकटवलं.
जिरं -- सोंड, भुवई, आणि खाली असलेल्या उंदीर मामांचे कान (वाटत असो वा नसो, तो उंदीर आहे!)
राई – डोळे, आणि सर्वात वर मुकुट आहे तिथे...
एक छोटीशी चवळी पण दिसेल.
पाल्याचे नाव - रिदीत गोडबोले (राघव)
वय - पाच वर्षे
पालकांची मदत- प्रिंटआऊट काढुन आणणे
लेकाला वयाच्या दुसर्या वर्षापासुनच अग्निशामक गाडीचं फार अप्रूप आहे. त्याने या प्रवेशिकेसाठी तीच त्याची लाडकी गाडी निवडली.
मला स्वतःला या उपक्रमाबद्दल कन्फ्युजन आहे की चित्रं काढुन रंगवायचं आहे की नुसतंच रंगवायचं आहे म्हणुन सध्या रंगवलेल्या चित्राची प्रवेशिका देते आहे. नियमात बसत नसेल तर त्याला चित्रं काढुन रंगवायला सांगेन.
पाल्याचे नाव - रिदीत गोडबोले (राघव)
वय - पाच वर्षे
पालकांची मदत- प्रिंटआऊट काढुन आणणे
आपण जरी 'मारियो' ला गेम मधे पाहिलं असलं तरी माझा लेक त्याचे विडिओ बघतो त्यामुळे हेच माझं आवडतं कार्टुन आहे म्हणाला.
मला स्वतःला या उपक्रमाबद्दल कन्फ्युजन आहे की चित्रं काढुन रंगवायचं आहे की नुसतंच रंगवायचं आहे म्हणुन सध्या रंगवलेल्या चित्राची प्रवेशिका देते आहे. नियमात बसत नसेल तर त्याला चित्रं काढुन रंगवायला सांगेन
टिप - अजॅक्सचीz एरर येत असल्याने शब्द्खुण दिलेली नाही. कविन ची आयडिया वर्क होतेय.
मुलाचे नाव - रिदीत गोडबोले (राघव)
वय - पाच वर्षे
पालकांची मदत - गणपतीचे चित्र काढुन देणे आणि सांगितलेली अक्षरे देवनागरीत लिहुन देणे (गणपती बाप्पा मोरया)
आतापर्यंतची चढण ही तीस अंश किंवा फार तर चाळीस पंचेचाळीस पर्यंत होती.
कमी चढणीवर धावणे, पाय ओढत पुढे झुकत चालत राहिल्याने शरीराचा जणू मल्लखांब होत चालला होता. आता पुढचे पाऊल टाकले तर हाडाचे लोह होईल असे वाटत होते.
आता मात्र साठ अंशाचा कोन सातत्याने लागत होता. हाताचा आधार घेऊन वर चढावे लागत होते. पुढे सुळका होता. सत्तर ते ऐंशी. पण पुढे पुढे जाणे आवश्यक होते.
न जाणो "ते "मागेच असतील तर ?
थकून तो थांबला. पाण्याचा घोट घेऊन त्याने डोळ्याला दुर्बीण लावली..
नमस्कार मंडळी,
गणपती बाप्पा ही १४ विद्या आणि ६४ कलांची देवता आहे. कला मनुष्याला जीवनातील उच्च दर्जाचा आनंद मिळवून देते. कलाहीन मनुष्याचे आयुष्य किती नीरस असेल नाही! प्रत्येकाला कोणती ना कोणती तरी कला अवगत असतेच.
अगदी पुरातन काळापासून विविध कला ह्या मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. कलेला कोणत्याही बंधनांची मर्यादा नसते. कला ही आपल्या भावना व्यक्त करण्याचे एक साधन आहे. आपल्या सर्वांमधे निसर्गाने कोणत्या ना कोणत्या रुपात कलेचा अंकुर रुजवलेला आहे. त्याचे स्वरुप वेगवेगळे असू शकेल, पण तो ओळखणे व त्याला मूर्त स्वरुपात आणणे, यातील आनंद अवर्णनीय आहे.