माझी कलाकारी

Submitted by संयोजक on 6 September, 2024 - 11:50

नमस्कार मंडळी,

गणपती बाप्पा ही १४ विद्या आणि ६४ कलांची देवता आहे. कला मनुष्याला जीवनातील उच्च दर्जाचा आनंद मिळवून देते. कलाहीन मनुष्याचे आयुष्य किती नीरस असेल नाही! प्रत्येकाला कोणती ना कोणती तरी कला अवगत असतेच.

तर आपल्याला ह्या कलेचे प्रदर्शन दृकश्राव्य माध्यमातून करायचे आहे. मग ते गाणं असो, वादन असो किंवा कथावाचन/कथाकथन/कवितावाचन /गझलवाचन . तुम्ही मांडलेली एखाद्या विषयावरची मते तुमचे वक्तृत्वगुण दाखवतील, किंवा तुम्ही सांगितलेले विनोद सर्वांना स्टॅंड-अप कॉमेडीच्या माध्यमातून पोट धरून हसवतील. एखादे फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफीचे चित्रण असू दे किंवा नृत्याविष्कार. यापेक्षा वेगळे काही कलाविष्कार असतील की जे तुम्ही दृकश्राव्य माध्यमातून मांडू शकता. जसे की सावल्यांचा खेळ, अभिनय, नकला, अभिवाचन इत्यादी.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपल्या मायबोलीच्या यूट्यूब चॅनेलवर हे व्हिडिओ प्रसारित करण्यात येतील. तसेच या उपक्रमाला वयाचे बंधन नाही लहान व मोठा गट दोघांसाठी हा उपक्रम आहे. चला तर मग येऊ द्यात भरभरून कलाविष्काराच्या प्रवेशिका!

नियम :
१. व्हिडिओ मध्ये वापरले गेलेले संगीत / गाणे / content प्रताधिकार सांभाळून वापरलेला असावा.
२. आपली प्रवेशिका mp4 स्वरूपा मध्ये sanyojak@maayboli.com ई-मेल पत्त्यावर पाठवावी. फाईल साईझ २० mb पेक्षा जास्त असेल तर drive/Dropbox/weshare सारख्या माध्यमातून पाठवावी.
३. ई-मेल मध्ये आपले नाव, मायबोली आयडी आणि काय सादर केले आहे ह्याचे शीर्षक नमूद करावे.
४. पूर्वप्रकाशित व्हिडिओ असेल तरी चालेल. त्याची link न देता दिलेल्या फॉरमॅट मधली फाईल पाठवावी.
५.छोटे व्हिडिओ / रील्स चालतील

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फाईल साईझ २० mb पेक्षा जास्त असेल तर ....
>>>>>>>
विडिओ फाईल मोबाईलवर आहे. संयोजकांना व्हॉट्सअप केले तर चालेल का? एका संयोजकांचा नंबर आहे माझ्याकडे.
ईतर शेअरींग पर्याय मी आजवर कधी वापरले नाहीत. त्यामुळे हा पर्याय माझ्यासाठी सुटसुटीत आहे.

केला मेल
Droobox लिंक send केली
WhatsApp वर केलेल्या चौकशीला प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद Happy

उत्तम उपक्रम.
आता लक्ष गेले. प्रवेशिकांची वाट पाहत आहे.