कला उपक्रम: नैसर्गिक संसाधनांमधून गणेश - {sanjana25}

Submitted by sanjana25 on 11 September, 2024 - 06:43

गणपती बाप्पा मोरया!

पेन्सिलने बेसिक स्केच काढून घेतलं. (चित्र यूट्यूब वर बघून काढलं आहे. )
मग फेविकॉलने हळू हळू -- तूर डाळ, मूग डाळ, मूग, राई आणि जिरं चिकटवलं.
जिरं -- सोंड, भुवई, आणि खाली असलेल्या उंदीर मामांचे कान (वाटत असो वा नसो, तो उंदीर आहे!)
राई – डोळे, आणि सर्वात वर मुकुट आहे तिथे...
एक छोटीशी चवळी पण दिसेल.

img 3.jpegimg 1.jpeg

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

anjali_kool, अनिंद्य, मनीमोहोर, स्वरुप, कविन, केया, आर्च, स्वाती_आंबोळे, ऋन्मेऽऽष.... सर्वांना धन्यवाद!

अनाउन्स झाल्यावर हे कागदावर डाळी चिकटवायचेच डोक्यात आले होते . आम्ही तिसरीत हे चिक ट चित्र व सातवीत पोत चित्र म्हणून बनवलेले. पण मेहनत करायची आणि मग तुमचा एक मस्त मास्टर पीस येतो. बक्शिस काय मिळणार नाही म्हणून सर्व मेहनत रद्द केली. छान बन्वले आहे.
बक्शिसा साठी हार्दिक शुभेच्छा. अजून जास्त फिलिन्ग बनवता आले असते म्ह णा जे संपूर्ण बॉडी ग्रेन्स नी भरवुन टाकता आली असती वेग वेगळ्या.

साधना, Bhakti Salunke, अश्विनीमामी, केया, अमितव, सामो, धनुडी, mi_anu, SharmilaR, झकासराव..... सर्वांना धन्यवाद!!

अजून जास्त फिलिन्ग बनवता आले असते म्ह णा जे संपूर्ण बॉडी ग्रेन्स नी भरवुन टाकता आली असती वेग वेगळ्या. >>> हो अमा बरोबर, पण वेळ आणि इतर resources बघता माझ्यासाठी हाच बेस्ट ऑप्शन! तुम्ही पण ह्या उपक्रमात नक्की भाग घ्या, मागच्या वर्षी काचेच्या बॉटल पासून तुम्ही बनवलेली बाहुली माझ्या अजूनही लक्षात आहे. मस्त unique आयडिया होती.

सुंदर ..!