दृष्यावरून गाणे ओळखा-५

Submitted by माझेमन on 17 March, 2025 - 10:10

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे. अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

विचित्र दृष्य देऊन जसे हिरॉईनच्या नाकपुड्या, हिरोचे पाय, पडलेली अंगठी इ कोडे खंगरी करण्याचा प्रयत्न करू शकता. शेंदूर फासूनही चित्र खंगरी करू शकता. आपल्या आजीच्या जन्माआधीची गाणी देवूनही खंगरी करू शकता. खंगरी नसलेले कोडे भलतेच क्ल्यू देऊन खंगरी करू शकता. उदा: हिरोच्या सावत्र बायकोचा आजी नवरा... Uhoh कधी कधी कुणी चकली इ बक्षीस देते. वाटून घ्यावे कारण उत्तर एकाला आले तरी दहाजणांनी विचारलेले प्रश्न उपयोगी पडलेले असतात. तीन-चार दिवस कोडे अडकले तरी दयाळू होण्याची गरज नाही. दिग्गज लोक आहेत. शोधतात बरोबर उत्तरे, पेशंस ठेवायचा.

आधीचा धागा

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मध/दनो, माशुको - लमहा...
कुणाल कपूर, बिपाशा, संजय दत्त.

सुपरस्टारचा लांबचा जावई इतके सोपे क्लु नसतात द्यायचे. Proud

अनुची आठवणही आली >>
मलाही. तिचे क्लू अचाट असतात.

नाही महिमा नाही. >>>
करिष्मा कपूर आहे का?

नाही करिष्मा नाही.

एक गाजलेला सिनेमा आहे
नायकाचे कोणीही चित्रपटसृष्टी मध्ये नाही.

नायकाचा एक पूर्वज महाभारतात अश्वदलात होता आणि त्याचा जावई हत्तीदलात असे क्लु दिले तरी लोक ओळखतील इथे.

मी कालपासून 'मी केव्हा लिहू?' म्हणून विचारेन म्हणतेय. Proud

रोजा जानेमन i e कादल रोजावे - रोजा. अरविंद स्वामी, मधू (ची मावशी हेमामालिनी आहे.)

कमाल आहे! मी चित्रात काय दिसतंय ते शोधतेय...! मला मुळात मुद्दलच दिसलं नाही, मधू चा चेहरा कसा दिसला?
आता बेसिक आणि अँडव्हान्स असे प्रकार सुरू करा.

मापृ Lol
तू कोडी घाल श्रद्धा, उत्तरं तर तुला सगळी येतातच. Proud

मला मुळात मुद्दलच दिसलं नाही, मधू चा चेहरा कसा दिसला?
<<<<< चेहरा नाही दिसला. ती फ्रेम अतिपरिचयाची आहे. सिनेमा, गाणे, अरविंद स्वामी.. ♥️ सगळेच! Proud

तू कोडी घाल श्रद्धा, उत्तरं तर तुला सगळी येतातच
<<<<<
कोडी डिझाइन करायला नाही जमत पण फारसं. आधी स्वप्ना राज, अनु, मामी (तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल?) हे लोक मस्त डिझाइन करायचे कोडी. मानव, माधव वगैरे पण.

मला तो पिवळा फ्रॉक वाटला म्हणून मी आपली करिष्मा-रविन्यांची गाणी शोधत होते. मधुची पिवळी साडी आठवलीच नाही Sad
अर्थात त्या पिक्चरमध्ये मधुकडे बघत कोण होतं Wink
त्यातून तो आयटीवाला होता पिक्चरमध्ये ♥️♥️

नायकाचा एक पूर्वज महाभारतात अश्वदलात होता आणि त्याचा जावई हत्तीदलात असे क्लु दिले तरी लोक ओळखतील इथे. >>> मानव Lol

आशिकी २ मधली फ्रेम वाटतेय. पण केसांवरून अनिल कपूर / दीपक तिजोरी वाटतो.
डिंपल किंवा सोनू वालिया असेल असं वाटतंय.

जांबाज - जाने जाना ?

Pages