दृष्यावरून गाणे ओळखा-५

Submitted by माझेमन on 17 March, 2025 - 10:10

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे. अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

विचित्र दृष्य देऊन जसे हिरॉईनच्या नाकपुड्या, हिरोचे पाय, पडलेली अंगठी इ कोडे खंगरी करण्याचा प्रयत्न करू शकता. शेंदूर फासूनही चित्र खंगरी करू शकता. आपल्या आजीच्या जन्माआधीची गाणी देवूनही खंगरी करू शकता. खंगरी नसलेले कोडे भलतेच क्ल्यू देऊन खंगरी करू शकता. उदा: हिरोच्या सावत्र बायकोचा आजी नवरा... Uhoh कधी कधी कुणी चकली इ बक्षीस देते. वाटून घ्यावे कारण उत्तर एकाला आले तरी दहाजणांनी विचारलेले प्रश्न उपयोगी पडलेले असतात. तीन-चार दिवस कोडे अडकले तरी दयाळू होण्याची गरज नाही. दिग्गज लोक आहेत. शोधतात बरोबर उत्तरे, पेशंस ठेवायचा.

आधीचा धागा

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुला पण पैठणी पाहिजे का? >> Lol

अरे पण तू हिंट दिल्यात की! अनिल कपूरच्या सिल्हूएवरून तो जांबाज ते जोशिले टाईमस्पॅनमधला अनिल कपूर दिसतो आहे. त्या काळात त्याचे समुद्राकाठचे हे एकच गाणे आहे (चूभूद्याघ्या). डिंपलसारखी भासणारी रिचा शर्मा रेड हेरिंग कारण डिंपलचे अशा सिल्हूएचे जे गाणे आहे त्यात ती स्विमिंग पूलमध्ये आहे. म्हणून इरादा करो तो पूरा करो.

म्हणून इरादा करो तो पूरा करो >> याच्या पुढे तू "Elementary, my dear Watson" असे म्हणशील वाटले Lol

पण काय लॉजिक लावले आहे. अनिल कपूर चे समुद्रावरचे पिक्चर्स Lol

Pages