ताराचित्रे

'नी' ची ताराचित्रे - गणपती

Submitted by नीधप on 26 February, 2023 - 01:25

मी तांब्यापितळेच्या तारा वळवून त्यातून कलाकृती निर्माण करते हे इथे अनेकांना माहिती आहेच. आजवर भरपूर दागिने आणि काही ताराचित्रे तर काही मिक्स मिडिया ताराचित्रे केलेली आहेत. त्यातलेच हे नवीन पाऊल.

आधी बनवलेल्या 7-8 इंची गणपती आणि फुले-दुर्वा असा ताराचित्राचा फोटो बघून मैत्रिणीने त्याच धर्तीवर मोठे चित्र करून देशील का? असे विचारले. तिला कुठल्याही बोर्ड वा कॅनव्हासवर लावलेले तारचित्र नको होते. डायरेक्ट भिंतीवर लावता येईल आणि भिंतीचीच पार्श्वभूमी वापरता येईल असे हवे होते.

'नी' चे नवीन पाऊल - मिक्स मिडिया वॉल आर्ट

Submitted by नीधप on 12 April, 2022 - 03:17

मी गेली काही वर्षे विविध धातूंच्या तारांपासून दागिने बनवते. नी नावाचा माझा छोटासा ब्रॅण्ड आहे. हल्लीच या ब्रॅण्डला सात वर्षे पूर्ण झाली. दरवर्षी वर्षपूर्तीनिमित्त एक नवीन कलेक्शन मी करत असते.
सात वर्ष पूर्ण हे स्पेशल असते म्हणतात. तर त्या निमित्त मी थोडी नवी दिशा, नवी वाट धुंडाळते आहे.
या कलेक्शनमधे दागिने नाहीत. दागिन्यांच्या पलिकडे हे तारांचे माध्यम शोधायचा हा छोटासा प्रयत्न

विषय: 
Subscribe to RSS - ताराचित्रे