मी गेली काही वर्षे विविध धातूंच्या तारांपासून दागिने बनवते. नी नावाचा माझा छोटासा ब्रॅण्ड आहे. हल्लीच या ब्रॅण्डला सात वर्षे पूर्ण झाली. दरवर्षी वर्षपूर्तीनिमित्त एक नवीन कलेक्शन मी करत असते.
सात वर्ष पूर्ण हे स्पेशल असते म्हणतात. तर त्या निमित्त मी थोडी नवी दिशा, नवी वाट धुंडाळते आहे.
या कलेक्शनमधे दागिने नाहीत. दागिन्यांच्या पलिकडे हे तारांचे माध्यम शोधायचा हा छोटासा प्रयत्न
MW 02
जाल्यात मासोली
स्टील व पितळ्याच्या तारांमधून बनवलेले आणि ओदिशामधल्या साड्यांच्या विणीत वापरल्या जाणार्या माश्याच्या रुपचिन्हावरून प्रेरणा घेऊन स्टील व पितळ्यांच्या तारांमधून बनवलेले मासे आणि तांब्याच्या तारांचे जाळे. अॅक्रिलिक ऑन कॅन्व्हास. व्यास १०.७ इंच
MW 03
हौदातले मासे
मधुबनी पेंटींग्जवरून प्रेरणा घेऊन बनवलेले पितळ व स्टीलचे मासे. आणि बाजूला तांब्याच्या तारांची वेलबुट्टी.
अॅक्रिलिक ऑन कॅन्व्हास. व्यास १०.७ इंच
MW 04
मोर बांगडी
महाराष्ट्राचा वारसा असलेल्या पैठणीमधे वापरल्या जाणार्या विविध रूपचिन्हांपैकी महत्वाचे आणि उंची रूपचिन्ह असते ते म्हणजे मोर बांगडी. नावाप्रमाणेच बांगडीमधे मोर असा त्याचा अर्थ होतो. तेच रूपचिन्ह तारांच्या माध्यमातून बनवायचा यामधे प्रयत्न केला आहे.
पितळ व जर्मन सिल्व्हरच्या तारांमधून मोर आणि फुले बनवली आहेत तर तांब्याच्या तारांचे अॅक्सेंटस आहेत.
अॅक्रिलिक ऑन कॅन्व्हास. व्यास १०.७ इंच
MW 05
Coexistence
झाडे एकत्र असू शकतात तर आपणही असू शकलो पाहिजे.
तांबे आणि स्टीलच्या तारा. अॅक्रिलिक ऑन कॅन्व्हास. व्यास १०.७ इंच
MW 06
A face awake at midnight
जर्मन सिल्व्हरची तार. अॅक्रिलिक ऑन कॅन्व्हास. आकार -
८.२ X १० इंच
mw2 खुप आवडले असे वाटत असताना
mw2 खुप आवडले असे वाटत असताना me3 ही आवडले, मग ४,५ ही आवडले. खरेच सगळी चित्रे खुप सुन्दर आहेत, आवडली.
तुझे अभिनन्दन आणि शुभेच्छा!!
खुप छान कलाकारी. मासे, मोर
खुप छान कलाकारी. मासे, मोर सगळच सुंदर.
झाडांची एकरूपता आवडली.
सर्वच तार माध्यम कलाकृती आवडल्या. खासकरून झाडांची एकरूपता आवडली.
पहिले तीन सगळ्यात जास्त आवडले
पहिले तीन सगळ्यात जास्त आवडले.
सुंदर आहेत नी! शुभेच्छा.
सुंदर आहेत नी! शुभेच्छा.
very creative !
very creative !
मोर, मासे, झाडे, फुले - सुंदर
मोर, मासे, झाडे, फुले, चेहरा - सुंदर!
पॅडी कोलम सर्च कर. मस्त रांगोळ्या सापडतील. अवघड आहेत पण किती सुंदर.
https://www.google.com/search?newwindow=1&sxsrf=APq-WBvCfQp3Smtk8rkywf4D...
काय सुरेख आहे!! पुढील
काय सुरेख आहे!! पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा!
वा मस्तच !
वा मस्तच ! very neat work !
सर्वांचे खूप आभार!
सर्वांचे खूप आभार!
वॉव खूप मस्त :डोळ्यात बदाम :
वॉव खूप मस्त :डोळ्यात बदाम : अनेक शुभेच्छा!
सुरेख आणि सफाईदार!
सुरेख आणि सफाईदार!
अतिशय सुंदर आणि नावीन्यपूर्ण!
अतिशय सुंदर आणि नावीन्यपूर्ण! अनेक शुभेच्छा!