लेखन

चित्रकला उपक्रम : माझी आवडती गाडी - VB - श्रीदत्त

Submitted by VB on 9 September, 2024 - 20:21

श्री ला रंगकाम खूप आवडते, नेहमीच काही न काही चालू असते. ड्रॉविंग बुक तर कितीतरी भरलेत. मी पण जमेल तसे प्रिंट आऊट आणून देते त्यात तो रंग भरत असतो. जेव्हा ह्या उपक्रमाबद्दल कळले तेव्हा दोन प्रिंट गाडीचे अन एक त्याच्या आवडत्या छोट्या भीमचे. तेच इकडे देत आहे. त्याने जमेल तसे त्याच्या वयानुसार (वय वर्षे पावणे चार) रंगवले आहेत.

IMG_20240909_233143__01.jpg

ही दुसरी

IMG_20240909_233131_0.jpg

विषय: 

केशर : गाथा आणि दंतकथा - २ (इराण)

Submitted by संजय भावे on 8 September, 2024 - 16:42
Iran- Cover Pic

"The Gift of Zarathustra" ह्या मूळच्या पर्शिअन दंतकथेचे मराठीत केलेले शब्दांकन:

कोणे एके काळी, प्राचीन पर्शियात खोरासान प्रांतातल्या दुर्गम पर्वतरांगामधील एका लहानशा खेडेगावात 'अरश' नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. एका वर्षी निसर्गाने पुकारलेला असहकार आणि कठोर हृदयी सूर्याने आपल्या किरणांची वाढवलेली प्रखरता ह्यांच्या एकत्रित परिणामातुन बिघडलेल्या हवामानामुळे अरश सहित त्याच्या सर्व शेजारी-पाजारी शेतकऱ्यांची पिके करपून त्यांच्या जमिनी उजाड झाल्या होत्या.

विषय: 
शब्दखुणा: 

मायबोली गणेशोत्सव २०२४ - उपक्रम व स्पर्धा

Submitted by संयोजक on 8 September, 2024 - 06:42

मायबोली गणेशोत्सव २०२४ - उपक्रम व स्पर्धा :

यावर्षीच्या सर्व उपक्रम आणि स्पर्धा एकत्र, एकाच ठिकाणी पाहण्यासाठी हा धागा.
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या उपक्रम व स्पर्धांच्या लिंकवर क्लिक करा.

मायबोली गणपती प्रतिष्ठापना
https://www.maayboli.com/node/85615

आमच्या घरचा बाप्पा
https://www.maayboli.com/node/85598

शशक लेखन स्पर्धा- अंत: अस्ति प्रारंभ: २: पाऊस

Submitted by संयोजक on 7 September, 2024 - 12:00

नमस्कार मायबोलीकर,

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गणेशोत्सवात शशक पूर्ण करा हा आवडता उपक्रम आहेच पण यावर्षी त्यात एक ट्विस्ट आहे.

अंतापासूनच एक नवी सुरुवात होतेच ना! तर यावर्षी एका गोष्टीचा शेवट आम्ही देणार आहोत आणि तुम्हाला त्या कथेचा पूर्वार्ध तुमच्या कल्पनाशक्तीने पूर्ण करायचा आहे, आणि तुमच्या कथेला साजेसे शीर्षक द्यायचे आहे. यावर्षी शशक हा उपक्रम नसून स्पर्धा आहे.

कथेचा शेवट खालीलप्रमाणे आहे.

"ते दोघे मुसळधार पावसात होते, पण कोरडेच"

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पुढील गोष्टी लक्षात घ्या :

विषय: 

माझे स्थित्यंतर- { रसिक मन हरवले आहे. कुठे पाहीले का? कृपया, येथे संपर्क साधा. } - सामो

Submitted by सामो on 7 September, 2024 - 09:00

एखादी एपिफनी मोमेन्ट असते जेव्हा आपल्याला कोणाच्या तरी डोळ्यात, पूर्वीचे, अगदी पूर्वीचे आपण गवसतो. अचानक आपल्याही विस्मृतीत गेलेले आपण कोणाच्या तरी शब्दांत, नजरेत आठवुन जातो. काय मस्त वाटतं तेव्हा. आणि ते कोणी म्हणजे अगदी नेहमी १००% नेहमी आपली लाडकी मैत्रिण असते जिला आपण भारतात गेल्यावरती आवर्जुन भेटत असतो. कारण मध्ये पूलाखालून कितीही पाणी गेलं असलं तरी तिच्या डोक्यात आपला तोच स्नॅपशॉट असतो. तेच कॅरेक्टर फ्रीझ झालेलं असतं मग ते पूर्वी लिहीलेली तोडकी मोडकी कविता असेल, पूर्वीच्या काही व्हल्नरेबिलिटीज असतील किंवा काही आवडीनिवडी असतील.

विषय: 

केशर : गाथा आणि दंतकथा - १ (विहंगावलोकन)

Submitted by संजय भावे on 7 September, 2024 - 05:33

आज गणेश चतुर्थी! गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरया..., पायी हळू हळू चाला... मुखाने गजानन बोला..., कपाळी 'केशरी' गंध... बाप्पा तुझा मला छंदच्या गजरात आपल्या घरी गणरायाचे आगमन झाले असेल, विधिवत पूजा-अर्चा, आरती झाल्यावर प्रसाद म्हणून खाल्लेल्या 'केशरी' पेढ्यांची चव जिभेवर रेंगाळत असतानाच नैवेद्द्यासाठी केलेले बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक आणि शिरा, खीर, पुरणपोळी, श्रीखंड अशा 'केशरयुक्त' पंचपक्वान्नांचा समावेश असलेल्या सुग्रास भोजनावर आडवा हातही मारून झाला असेल!

शब्दखुणा: 

प्रकाशचित्रांचा झब्बू ३ - श्रीमंती माझ्या नजरेतून

Submitted by संयोजक on 6 September, 2024 - 09:23

मायबोली गणेशोत्सव २०२४ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू.

आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी अगदी सापेक्ष असतात. प्रत्येक जण त्याच गोष्टीबद्दल सारखाच विचार करेल असे नाही. प्रत्येकाची फुटपट्टी वेगळी आणि मापदंडही. यश-अपयश असो किंवा श्रीमंती त्याच्या व्याख्या अगदी वैयक्तिक व सापेक्ष असतात. आजच्या या प्रकाशचित्रांच्या झब्बूतून पाहू या एकमेकांच्या श्रीमंतीच्या व्याख्या.

आजचा विषय आहे श्रीमंती माझ्या नजरेतून.

तुम्हाला तुमच्याकडे असलेली, या विषयाबद्दलची जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.

विषय: 

शशक लेखन स्पर्धा- अंत: अस्ति प्रारंभ: १: दृष्य

Submitted by संयोजक on 6 September, 2024 - 09:06

नमस्कार मायबोलीकर,

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गणेशोत्सवात शशक पूर्ण करा हा आवडता उपक्रम आहेच पण यावर्षी त्यात एक ट्विस्ट आहे.

अंतापासूनच एक नवी सुरुवात होतेच ना! तर यावर्षी एका गोष्टीचा शेवट आम्ही देणार आहोत आणि तुम्हाला त्या कथेचा पूर्वार्ध तुमच्या कल्पनाशक्तीने पूर्ण करायचा आहे, आणि तुमच्या कथेला साजेसे शीर्षक द्यायचे आहे. यावर्षी शशक हा उपक्रम नसून स्पर्धा आहे.

कथेचा शेवट खालीलप्रमाणे आहे.

"उंच डोंगरावरचे ते दृष्य पाहून त्याने रस्त्याकडे धाव घेतली."

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पुढील गोष्टी लक्षात घ्या :

विषय: 

वाडा ~ भय इथले संपत नाही..

Submitted by रुद्रदमन on 4 September, 2024 - 09:05

वाडा ~ भय इथले संपत नाही..

राजेशने आपल्या शिक्षणासाठी गावातून शहरात जाण्याचा निर्णय घेतला. त्याची शहरात जाण्याची ही पहिलीच वेळ होती. घरची परिस्थिती बेताचीच असल्यामुळे शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करणे त्याला शक्य नव्हते.. तो शहरात पोहोचला.. प्रथम कॉलेज मधील ऍडमिशन चे सोपस्कार उरकून घेतले.. दुपार नंतर तिथे राहण्यासाठी रूम च्या शोधात बाहेर पडला.. त्या दिवशी ऍडमिशन आणि रूम चा शोध पूर्ण करून त्याला सामान आणायला परत गावी जायचे होते.. पण रूम शोधणे म्हणजे त्याच्या साठी एक दिव्य च ठरत होते..आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्यामुळे कमी भाड्यात रूम मिळवने एक कठीण काम ठरत होते.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - लेखन