Submitted by अतरंगी on 11 September, 2024 - 11:57
नेहमीप्रमाणे तो गावातल्या मुलांसोबत म्हशी चरायला डोंगरावर घेऊन गेला होता. म्हशी चरायला सोडून तो असाच काही दिवसांपुर्वी डोंगराच्या वाटेवर सापडलेल्या दुर्बिणीशी खेळत त्यातून काय काय दिसतंय बघत होता. आजकाल त्याचा तो छंदच झाला होता.
दुर्बिणीमुळं लांबवरच्या गोष्टी पण कशा स्वतःच्या पुढ्यात असल्यासारख्या दिसायच्या…..
दुर्बिणीतून बघताना त्याला डोंगरावर अचानक काहीतरी हालल्यासारखं वाटलं. त्यानं दुर्बीण अजून झूम करून पाहिल्यावर त्याचे डोळेच विस्फारले. त्याने झटकन दुर्बीण दुसरीकडे वळवली.
त्याचवेळेस आज बायको घरी एकटीच आहे हे आठवल्यावर तो पोरांना लांबनंच ओरडून म्हणाला “ए पोरांनू म्या आलूच, जरा म्हसरावर ध्यान ठिवा….”
आणि परत एकदा उंच डोंगरावरचे ते दृष्य पाहून त्याने रस्त्याकडे धाव घेतली.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
येड लागलं र येड लागलं र! ...
येड लागलं र येड लागलं र! ...
??
??
व्वा.. खरा रसिक..
व्वा.. खरा रसिक..
(No subject)
(No subject)
छान जमलेय
(No subject)
(No subject)
?? कनफ्युज्ड.
?? कनफ्युज्ड.
मुद्दाम तशीच ठेवली आहे.
मुद्दाम तशीच ठेवली आहे.
त्याला नक्की जंगली श्वापद दिसलं की मेक आऊट करणारं कपल की चोर वगैरे….
ज्यांना कळली नाही त्यांना-
ज्यांना कळली नाही त्यांना- जव्हेरगंज यांची 'म्हसरांवर ध्यान ठेवा' ही कथा शोधून वाचा . अर्थात अतरंगींनी सगळ्याच शक्यता ओपन ठेवलेल्या दिसतायत.
कथेच्या शीर्षकात घोळ झालाय का
कथेच्या शीर्षकात घोळ झालाय का?
>>>>>>>>>>त्याला नक्की जंगली
>>>>>>>>>>त्याला नक्की जंगली श्वापद दिसलं की मेक आऊट करणारं कपल की चोर वगैरे….
ओह वॉव अनेक अंत निघतायत की.
तुमचे नाव अतरंगी नको अंतरंगी हवे.
मस्त. दूरदृष्टीचा फायदा
मस्त. दूरदृष्टीचा फायदा
कथेच्या शीर्षकात घोळ झालाय का
कथेच्या शीर्षकात घोळ झालाय का?>>>>
धन्यवाद. केला बदल.
हे हे ओपन ended शशक भारी
हे हे ओपन ended शशक भारी
काही ओपन ended चोर वगैरे
काही ओपन ended चोर वगैरे नव्हते.. नाहीतर पोरांना एकटे सोडून गेला नसता.. हा त्या चोरीचा मामला आहे ज्यासाठी मामा थांबला आहे
भारी
भारी
त्याला नक्की जंगली श्वापद दिसलं की मेक आऊट करणारं कपल की चोर वगैरे…>> किंवा बँकेत कमी गर्दी वगैरे,
लाडकी बहीण योजनेचे पैसे आणायला पाठवायचे असेल बायकोला.
वीरू किती सालस!
वीरू
किती सालस!
अतरंगी, नवविवाहित जोडपे आहे
अतरंगी, नवविवाहित जोडपे आहे वाटतं
नाही झकास, "ए पोरांनू म्या
नाही झकास, "ए पोरांनू म्या आलूच" हे मिसलं का?
हाहा..
हाहा..
मस्त !!
मस्त !!
आशू , ती गावातली मुले आहेत .
अंतरंगी दुर्बिणीतून पाहिजे ते
अंतरंगी दुर्बिणीतून पाहिजे ते दिसू शकत.
कळली. मस्त..
कळली. मस्त..