लेखन

हॅप्पी न्यु इयर!

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

खरं तर मायबोली सापडली आणि परदेशात माहेर सापडल्यागत झाले. बरेच दिवस फक्त वाचत होते, काही आवडले की दाद देत होते. हिंमत करून झुळूकेवर गेले त्या दिवशी गिर्‍याने ड्यु. आयडी असे घोषित करून मोठ्ठा दिवा दिला होता Happy शहरांच्या बीबीवर अम्मीने chinnu सगळीकडे फिरत आहे असा आरोपही केला होता. Happy सन्मीने मलम लावले म्हणून हिंमत करून लिहायला सुरूवात केली.

विषय: 
प्रकार: 

मायेची सय

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

बसले होते अशीच..
आभाळाचे पसरलेले असंख्य तुकडे गोळा करून,
प्रत्येक तुकडा वेगळा, अस्तित्वहीन..

गेल्या वर्षी श्रावणात वेचलेल्या पागोळ्या होत्या ओच्यात,
त्यांचं चांदणं ओवायचं होतं..

पण मनात होती अनामिक भीती..
पागोळ्या सांडल्या तर?
माझ्या आभाळाच्या विजोड चिंध्या झाल्या तर?

मग कुठून तरी आली मौनरवे हजारोंनी,
डोळ्यांत तरळली तुझी स्निग्ध नजर..
घेऊन आली माझी चिऊ-काऊची स्वप्ने..

आणि आई! क्षणाक्षणाला थरथरणारी पानं शांत झाली.
दरवळली जाई जुईची वेल..
क्षणात आभाळ चमकू लागलं,
चांदण्यांचा कशिदा खुलून आला,
मायेची सय मनाच्या डोहातून तरंगत गेली..

आई, तू जन्मोजन्मींची कुबेर..

विषय: 
प्रकार: 

डाव

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

दु:ख नवे नाव जुने
मन वेडे कुणकूणे!

ओळखीचे कोण ते
नजरेचे भाव उणे?

काल होते आज ना
हळहळते गाव सुने

साबण तो काय बरा?
जमले ना घाव धुणे!

सूनवे बघ जिंदगी
मांडियले डाव जुने!!

विषय: 
प्रकार: 

मृगजळ

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

shyamli_kavita.jpg

बरीच जुनी....गुलमोहोरात पुन्हा नको म्हणून इथे ....या प्रकाशचित्रासाठी अभिजीतचे मनःपूर्वक या आभार

विषय: 
प्रकार: 

आकाशासारखं.. आकाशाएव्हढं!

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

सर्वांनाच हवं असतं
हक्काचं आकाश..
उडायचा मोह नसला तरीही..

मलाही मिळालयं माझं आकाश-
क्षितीजाच्या रेषा रुंदावत उडतांना,
जमीनीची आठवण न येऊ देणारं-माझं गुणी आकाश;

त्या मऊ मऊ ढगांच्या हातांना धरून सांगावसं वाटतं-
तुझ्या मायेने पुष्ट पंख पसरून,
होईन मी आकाश..
नाही पडून देणार दु:खाचा टिप्पूसही जमीनीवर..
अगदी तुझ्याचसारखं!

विषय: 
प्रकार: 

एक ओळ

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

तुला एक ओळ लिहायची होती, राहून गेली
अल्लड स्वप्नं पापणीत येता येता राहून गेली

हाक देतच होत्या झुंजुमुंजु पाऊलवाटा
पानावरचे दवं का गं पापणी भिजवून गेली?

दाराआड लपल्या पावसाची थोडी गंमत करायची होती
तुझी छत्री नेमकी कुठेतरी राहून गेली!

तरारून आली होती जाणीव गेल्या श्रावणात
मनातून काढायची तेव्हढी राहूनच गेली

रात्रभर गुंतवले भावनेच्या गुंत्याने
नादावली पहाट, उगवायचेच विसरून गेली!

विषय: 
प्रकार: 

कळी

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

तशी ती भेट पहिलीच होती
पण ती 'जुनी ओळख' असावी तशी हसली.
हलकीशी खळी दोन्ही गालावर थबकली.
आपलेपणानं ती हवं-नको ते पहात होती.
मुलांना सांभाळणं, जेवण, वाढणं, आवरणं, अंथरूणं... वगैरे.
प्रत्येक कामात सराईतपणे वावरत होती.
बरचं काही बोलावसं वाटत होतं,
पण बोलणं असं जास्त झालच नाही.
न राहवून शेवटी तिला एक विचारलच,
"शिकतेस का ? "
नकारार्थी मान हलली. "सहावीत शाळा सोडली."
"शिकावसं वाटतं ?"
"हो..." पुन्हा गोड हसली आणि खरकट्याकडे वळली.
निघालो तेव्हा घरातल्यांसारखचं आपलेपणानं "पुन्हा या" बोलली.

.
..
.....

इथे स्थानकावर 'चाईल्ड लेबर'ची उद्घोषणा ऐकली.
तेव्हा का कुणास ठाऊक..

विषय: 
प्रकार: 

फुले

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

धुंद चांदणरात साजणा, शुभ्र भासती फुले
नयनात तुझ्या, हास्यात तुझ्या गोड हासती फुले

मम हृदयाचे पाणी पाणी, जीवघेणी ती खळी
ओठांवरच्या शब्दकळ्यांचे गीत माळती फुले

पुसटता स्पर्श तुझा, निसटते नजर खाली,
गुपित मनाचे तुला सांगता, लाजलाजती फुले

शीळ घाली खट्याळ वारा, गूज सांगते मखमाली
पदरात माझ्या भान हरपोनी डोलडोलती फुले

तू नसता सारे स्तब्ध, खिन्न सार्‍या दिशा
ये प्रिया, रास रचू या, तुझीच वाट पाहती फुले!

विषय: 
प्रकार: 

श्रीमती मेधा पाटकर - आस्था चळवळीची

Submitted by चिनूक्स on 14 December, 2009 - 13:44

तेंडुलकरांनी विविध आंदोलनांना वेळोवेळी दिलेला पाठींबा, सामाजिक चळवळीमध्ये घेतलेला सक्रीय सहभाग हा त्यांचा व्यक्तिमत्त्वाचा एक विलक्षण भाग होता. विवेक पंडितांची श्रमिक संघटना असो, श्रीमती मेधा पाटकरांची आंदोलनं असोत, किंवा खैरनारांची तडफदार कारकीर्द, तेंडुलकर या सार्‍यांच्या पाठी उभे राहिले. वेळोवेळी त्यांची बाजू घेतली, त्यांच्या वतीनं भांडलेही. असं करताना आपले हितसंबंध धोक्यात येतील, किंवा आपली लोकप्रियता कमी होईल, याचा तेंडुलकरांनी विचार केला नाही. इतर मराठी साहित्यिकांप्रमाणे लोकानुनय करणं त्यांच्या स्वभावातच नव्हतं.

पिसे

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

कविता हरवली
सापडेचना!

इथेच तर होती
उन्मनीचे भाव आलापत-
अजून उमलतच होती..

विचारून आल्ये-
कळीच्या उसाश्याला,
पेंगुळल्या पानातून ठिबकणार्‍या-
पागोळ्यांच्या माळेला...

नकळत उश्याशी शोधता शोधता
सापडली एक आर्त सुरावट,
आणि ती पांघरूनही थरथरणारी एक उत्कट रात्र!
एका कोपर्‍यात चिंब काही सुगंधीत श्वास...
झांजझांज न्यासनक्षीचे-
वेड्या पावसाचे ठसे..

-अन क्षणात उमगले मजला, हे कोणाचे पिसे!

विषय: 
प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - लेखन