लेखन

खऱ्या अज्ञातवासीची कथा! - भाग ३! - आता पुढे.

Submitted by अज्ञातवासी on 2 November, 2024 - 10:46

वेल, दुसऱ्या भागात गोष्ट समाप्त व्हायला हवी होती.
आय मीन. तो तिथे पोहोचला, ती तिथे नव्हती...
तिला हवं ते सगळं त्याने केलं, तिला हवं तसाच तो बनला.
गोष्ट संपायला हवाय होती ना.
असं जर आयुष्यात घडलं असतं, तर किती छान झालं असतं.

१ नोव्हेंबर २०२४.

विषय: 

खऱ्या अज्ञातवासीची कथा... - भाग १

Submitted by अज्ञातवासी on 30 October, 2024 - 14:14

आय अचीव इट स्नेहल, इट्स माय बर्थडे टुडे...
मी स्नेहलला मेसेज टाकला, एक फोटो टाकला, आणि खरच ढसाढसा रडलो.
गेल्या काही दिवसांपूर्वी तिनेच माझं स्टेटस ठेवलं होतं.
लॉस्ट ३२ केजी...
आणि हा प्रवास खरच सांगतो, अजिबात सोपा नव्हता.
कारण मी सुरुवातच अगदी अगदी वाईट अवस्थेत केली होती..
...माझी प्रोफाईल होती एक्सपोर्ट मॅनेजर म्हणून... वेगवेगळे देश फिरण्याची हौस...
पण कधीही फोटो काढला नाही. कधीही नाही. फोटोफोबिक नावाचा प्रकार मी कसोशीने पाळला...
अरे एवढा भारी दिसतोय, एक फोटो तरी काढ. आई नेहमी बजवायची...
...पण नाही.

विषय: 

दिवाळी अंकाबद्दल (माहिती व खरेदी संदर्भात मदत हवी आहे)

Submitted by ब्लू कोलंबसे on 30 October, 2024 - 07:26

दिवाळी अंकांबद्दल चर्चा करण्यासाठी आणि त्याच बरोबर जुने दिवाळी अंक कुठे वाचायला मिळतील याची माहिती करून घेण्यासाठी हा धागा आहे.

माझे आणि दिवाळी अंकाचे नाते
मला दिवाळी अंक वाचायला आवडतात. कित्येक लेखांनी माझे विचार आणि आयुष्याची दिशा बदलली. ( उदा. स्लो लिव्हिंग लेख, लोकमत दीपोत्सव दिवाळी अंक, 2020)

साधारण 2020 नंतर फेसबुक वर काही लोक आवर्जून वाचावे असे दिवाळी अंक, लेख याबद्दल लिहीत. लोकसत्ता वृत्तपत्र सुद्धा साधारण दिवाळी जवळ आली की, बाजारातील निवडक अंकांचे ट्रेलर स्वरूपात छोटे लेख अंकाच्या फोटो सह दुसऱ्या तिसऱ्या पानावर छापते.

स्वप्नं हे जुलमी गडे !

Submitted by देवू१५ on 28 October, 2024 - 17:50

दिवस-रात्र मेंदूचा कितीही वापर केला तरी मेंदू थकत नसतो. मेंदूला आराम मिळावा म्हणून आपण झोप घेतो, खरं तर तेव्हाही मेंदू आराम घेत नसतो, आपल्याला स्वप्नं. दाखवायचे काम करत असतो. आपली इच्छा असो वा
नसो झोपेतही मेंदू आपली करमणूक करत असतो. कुठलीही वर्गणी न भरता रात्रभरात त्याच्या ओटीटी
व्यासपीठावरून तुमची इच्छा असो वा नसो , पाच ते सहा
स्वप्नमालीका दाखवतोच दाखवतो. त्यातही विविधता असते. दुःखी, आनंदी, रोमँटिक, बिभित्स , गोड अशी अनेक
प्रकारची स्वप्ने दाखवायचे काम तो करत असतो.

विषय: 
शब्दखुणा: 

साकव

Submitted by मनीमोहोर on 22 October, 2024 - 01:30

साकव

पाणी म्हणजे साक्षात् जीवन … म्हणून मानवी वस्ती अगदी पूर्वीपासून नदीच्या, ओढ्याच्या काठावर वसली, तिथेच संस्कृती फुलली. सिंधू काठी बहरलेली मोहंजदरो आणि हडप्पा संस्कृती, नाईल नदीच्या सान्निध्यात विकसित झालेली इजिप्शियन संस्कृती, गंगा तीरावर वसलेलं आपला अभिमान आणि श्रद्धास्थान असलेलं वाराणशी शहर ही त्याची काही प्रसिद्ध उदाहरणं.

विषय: 
शब्दखुणा: 

सी, हू इज द बॉस

Submitted by SharmilaR on 18 October, 2024 - 01:43

सी, हू इज द बॉस

समजायला लागल्यापासूनच, मेघा स्पर्धेत उतरली होती. कुठे पोहोचायचे ते तिला माहीत नव्हतं, पण आपल्या समोर जो असेल, त्याच्या पुढे तिला जायचं होतं. बरोबर असणार्‍याला मागे टाकायचं होतं. त्याकरिता काय वाट्टेल ते करायची मेघाची तयारी होती. बरोबर किंवा समोर, कोण आहे ते महत्त्वाचं नव्हतंच, तर महत्त्वाचं होतं ते फक्त तिचं सगळ्यांपुढे असणं.

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - लेखन