वेल, दुसऱ्या भागात गोष्ट समाप्त व्हायला हवी होती.
आय मीन. तो तिथे पोहोचला, ती तिथे नव्हती...
तिला हवं ते सगळं त्याने केलं, तिला हवं तसाच तो बनला.
गोष्ट संपायला हवाय होती ना.
असं जर आयुष्यात घडलं असतं, तर किती छान झालं असतं.
१ नोव्हेंबर २०२४.
मी बराचसा रिकवर झालो आजारपणातून.
स्नॅपचाट वर तिला नवीन पिक्स पाठवले होते. (ती फ्रेंड म्हणून ऍड नव्हती तरीही) फेसबुकवर मेसेज टाकला (ती फ्रेंड म्हणून ऍड नव्हती तरीही.) Gmail वर मेल टाकला, आणि वाट बघत बसलो.
...हे विसरलो होतो, की तिच्या २ ऑक्टोबर क्या मेल ला रिप्लाय नव्हता, तर आता येईल का?
पुन्हा तीच धडधड, तिची अनावर ओढ वाढत गेली...
...मी हसत होतो, बोलत होतो. बॅक ऑफ द माईंड तीच होती.
थोडावेळ विसर. पुन्हा तेच...
सगळ्या जुन्या गोष्टी आठवत होत्या. अगदी सगळं सगळं. एक एक क्षण, एक एक शब्द...
...दोन गोष्टी आता करायच्या होत्या.
एकतर आता यापुढे कधीही तिला परत कॉन्टॅक्ट करायचा नाही...
...आणि दुसरं. घरच्यांना आता यापुढे कधीही कळू द्यायचं नाही, की असं काहीतरी चालू आहे असं.
इतके दिवस राग होता स्वतावर. की का मी असा झालो.
आता राग याचा होता, की का मी असा आहे...
२ नोव्हेंबरची सायकॉलॉजीस्टची अपॉइंटमंट घेतली...
...ऑफिसचा एक फोन येऊन गेला. गेल्या महिन्याभरापासून जो कामाचा बोजवारा उडाला होता, त्याची शिक्षा होती.
असो. काही शेवटच्या गोष्टी करायच्या होत्या, काही गोष्टी मनाला बजवायच्या होत्या, काही गोष्टी पुढे न्यायच्या होत्या, त्याची प्लॅनिंग करतोय.
२ नोव्हेंबर २०२४.
सायकोलोजिस्टकडे बसलो होतो.
"लुकिंग ग्रेट, बिलेटेड हॅपी बर्थडे..."
"थॅन्क्स, पण माझा बडे आणि दिवाळी मी रडण्यात घालवली."
एव्हाना ती मला चांगलं ओळखू लागली आहे.
"नो रिप्लाय आरती, नो रिप्लाय. मला फक्त तिला दाखवायचं होतं, की हे बघ, मी खोटारडा नव्हतो... बघ मी असाच होतो आधी."
"ओके मग आता पुढे? मी मेसेज करू तिला?"
माझ्याकडे उत्तर नव्हतं...
"...बस ना राजा. झालं आता. नकोय तिला तू... अरे तिला तू हवा असतास, तर तुझा नंबर ब्लॉक लिस्ट मधून काढून एक मेसेज नसता केला का?
होप होती. नाही झालं. इट्स फाईन. इट्स ओके. समटाइम्स लाईफ इज अनफेर...
...आता काय करतोस? त्याच आठवणीत पुन्हा रमतोस आणि आयुष्य बरबाद करतो की रियालिटी मध्ये येतोस?
ती तुझ्यासाठी मिडीयम होती, सगळं अचीव करण्यासाठी. आता झालं, आता डिफीकल्ट टास्क निवड...
...लोक फेसबुक आणि इंस्ता, आणि काय काय वापरतात म्हणून तू वापरावं असं नाही. तुला काय कंफर्टेबल वाटेल ते कर...
ओके?
आय होप लवकरच पुढचं सेशन तू जोडीने येशील..."
...मी हसलो.
तीही...
सेशन बराच वेळ चाललं.
तर अज्ञातवासीच्या खऱ्या कथेचा हा उपसंहार...
किंवा शॉर्ट प्लॅन, पुढच्या चार महिन्यांचा.
१. जितकं स्वतःला आनंदी ठेवता येईल, तितकं ठेवायचं. हो. डिसीप्लीन तोडायचा नाही. प्रोफेशनल आणि प्रायव्हेट लाईफ यांची गल्लत करायची नाही. पण खूप खुश रहायचं...
२. इतके दिवस कुणासाठी तरी वेड्यासारखं लिहिलं, तिच्यासाठीच लिहिणं देखील सोडलं. आता लिहीन. सगळ्या कथा एकाच कथेत पूर्ण करेन. लिखाण मर्यादित ठेवेन, दिवसाला एक तास. पण लिहीन. लिहिणं हा माझा छंद आहे, तो पाळेन.
३. चार महिन्यांनी नवीन पासपोर्ट बनवायचा आहे. सुरुवात होम ग्राउंड, म्हणजे दुबई पासून करेन. (जिथेच आधी मी प्रचंड वेळ घालवला होता.) आणि मग हवं तिथे फिरेन.
४. वेल, इतके दिवस एकटा राहिलोय. आता एक लाईफ पार्टनर शोधेन, आय विश, जी अजिबात लेखिका वा कवयित्री असणार नाही... जी जास्तीत जास्त प्रॅक्टीकल असेल. (This is not dating application btw.) कायम रियालिटी मध्ये राहील, आणि माझ्यावर मला हवं तसं प्रेम करेन, आणि मी तिच्यावर जीवापाड प्रेम करेन.
आय विश, की या नात्यात insecurity नसेल, आय विश की या नात्यात विश्वास असेल, आणि सगळ्यात महत्वाचं unconditional acceptance असेल. उद्या मी जाड झालो परत (जे आयुष्यात व्हायला नको यासाठी मी जिवाचं रान करेन.) तर तिने मला सोडून जायला नको, आणि ती कितीही जाड झाली, तर मी सोडून जाणार नाही.
५. मी ३२ केजी लूज केलं, आता वेध लागलेत सिक्स पॅकचे. ते मी लवकरात लवकर बनवेल. त्याचबरोबर अजून काही गोष्टी लाईन अप करायच्या आहेत, त्या करेन.
६. आता माझ्या आनंदासाठी कुणावर dependant राहणं बंद करेन. Self acceptance वर काम करेन, आणि मुख्य म्हणजे माझं spiritual वेल बिंग वाढवण्यावर फोकस करेन.
७. एम्पाथी - जर कुणालाही डिप्रेशन चा त्रास होत असेल, तर स्वतःच्या अनुभवातून त्या व्यक्तीला बाहेर काढेन. Infact मीच आता मानसशास्त्राचा अभ्यास करणार आहे,.फॉर सेल्फ.स्टडी अँड ओदर्स टू.
८. आयुष्यात सगळे हेच करतात, म्हणून मीदेखील हेच करायला हवं असं नाही. कधीकधी प्रवाहा विरुद्ध पोहण मनाला आवडत असेल तर ते सही.
हे सगळं अगदी सायकोलोजिस्टने देखील सांगितलं. तिच्याकडून अप्रूवल घेतल्यावरच शिक्कामोर्तब केलं.
बस एवढंच...
संपलं...
खूप शुभेच्छा.
खूप शुभेच्छा.
पुढे सगळं छानच होईल
मिळेल तुम्हाला हवी तशी life partner!
खूप छान. मनापासून शुभेच्छा!
खूप छान.
मनापासून शुभेच्छा!
@किल्ली - मनापासून धन्यवाद!
@किल्ली - मनापासून धन्यवाद! आय होप ही रोलर कोस्टर राईड थांबावी आता.
@देवकी - धन्यवाद!!!
खरी कथा असेल तर इतकंच
खरी कथा असेल तर इतकंच सांगावसं वाटतंय ,आयुष्य एकदाच मिळतं ते भरभरून जगा आणि जगताना पुढे पुढे जात राहा मागे बघायची गरजच उरणार नाही।
मी फार तुमच्या कथा वाचल्या नाहीत पण काही शशक वाचल्या आहेत छान आहेत .लिखाण सोडू नका. मानसशास्त्र शिकताय तर त्यावरही चांगल्या कथा लिहू शकता.
@कल्की - धन्यवाद! ट्राय करतोय
@कल्की - धन्यवाद! ट्राय करतोय.
जबरदस्त सेन्सिटिव्ह व्यक्ती
जबरदस्त सेन्सिटिव्ह व्यक्ती आहात बहुतेक.
बॅलन्स जमतोय तर असाच जमावा इथून पुढे ह्यासाठी शुभेच्छा
माझं वजन 118 किलो होते.
माझं वजन 118 किलो होते.
घरच्यांना पटवून ठरवलेला प्रेमविवाह, तिच्या आयुष्यात काही काळासाठी आलेल्या तिसऱ्या व्यक्तीमुळे आणि कदाचित वजनामुळेसुद्धा आमच्या साखरपुड्याच्या 15 दिवस आधी मोडला. सगळ्या नातेवाईकांच्यात झालेली बातमी, अरेरे बिचारा असं म्हणणाऱ्या नजरा, आणि त्याहून मोठं म्हणजे स्वतःच्याच नजरेत उतरलेला मी, दारूत दुःख बुडवून त्यासोबत मीही बुडालो.
मग covid आला आणि घरी जावं लागलं. दारू अर्थात त्याच क्षणी बंद झाली. आठवण यायची तरी लपवायचो. मराठी मध्यमवर्गीय पुरुषाला रडून भेकून चालत नाही. आपल्या जखमा आपणच बांधायच्या, इतरांना दाखवल्या तर मलम नाही पण मीठ जरूर चोळतील.. रडू आलंच तर ते कुणाला कळू द्यायचं नाही. आपलं दुखणं कुणाला सांगायचं नाही. एक एक तास, एक एक दिवस जिंकत जायचं..
मी अजून जिवंत आहे, माझं वजन 115 किलो आहे. माझ्यावर जिवापाड प्रेम करणारी बायको मला मिळाली, मी तिच्यावर प्रेम करण्याचा प्रयत्न करत करत, तिच्या प्रेमात पडून सुखी देखील झालो आहे.
सगळ्यात महत्वाचं, don't beg
सगळ्यात महत्वाचं, don't beg for love. more you beg, more you are laughing stock!
it all comes down to sex! A good long f**k can uplift almost everything! चांगला सेक्स तुम्हाला सगळं काही विसरायला लावू शकतो.
आणिक काही गोष्टी आहेत.. If you have broken her virginity it's impossible for her to forget you.. and if you were good at that, आज ना उद्या ती तुम्हाला पुन्हा भेटेल..
but,if you are not the one who broke her virginity, it's impossible that she will come back in your life for love alone!!
so, be a man, move on..
@ बबड्या कुल - प्रतिसादासाठी
@ बबड्या कुल - प्रतिसादासाठी धन्यवाद. काही गोष्टी पटल्या, काही नाही पटल्या.
खूप खूप शुभेच्छा
खूप खूप शुभेच्छा
@अज्ञातवासी काय नाही पटले
@अज्ञातवासी काय नाही पटले नेमके?
यातून बाहेर पडलात, अभिनंदन
यातून बाहेर पडलात, अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा!
>>आय विश, की या नात्यात insecurity नसेल, आय विश की या नात्यात विश्वास असेल, आणि सगळ्यात महत्वाचं unconditional acceptance असेल. >> नात्यात विश्वास, आदर हवाच. चांगल्या नात्यात एक प्रकारचे स्थैर्य आणि आश्वासक शांतता असते, बाहेरुन बघणार्याला कदाचित काहीसे बोअरिंग वाटू शकते. अनकंडिशनल अॅक्सेप्टन्स असे काही नसते. मात्र एकमेकांचा उणेपणा संभाळून घेत चांगल्या बदलासाठी आधाराची देवाणघेवाण करायची तयारी हवी.