The Internet can be a dangerous place!
काही दिवसांपूर्वी माझा संगणक दारू प्यालेल्या माणसासारखा वागायला लागला. यावर खरा इलाज असा होता कि माझ्या एका तज्ज्ञ मित्राकडे जाऊन त्याच्याकडे संगणक पटकून द्यायचा. त्याऐवजी मी माझे डोके चालवायचा प्रयत्न केला. माझ्या मनाने असे ठरवले कि माझ्या RAM मध्ये काही तरी लोच्या झालेला आहे. RAM कमी पडतो आहे. त्यामुळे साधी .docx फाईल लोड करायलाही संगणकाची दमछाक होतेय. मग शोध सुरु झाला अशा चाळणीचा कि ज्याच्या साठी अत्यंत कमी RAMची आवश्यकता लागेल. ह्या शोधात माझ्या हाती काय काय रत्ने घावली हा स्वतंत्र धाग्याचा विषय आहे. पण ह्या भटकंतीत मला एका नवीन अनोख्या विश्वाचा शोध लागला. हा लेख त्या विश्वाची ओळख आपल्याला करून देण्यासाठी लिहिला आहे.
आपल्या नेहमीच्या वापरातील म्हणजे क्रोम, फायरफॉक्स, ऑपेरा, एज, सफारी इत्यादी चाळणीयंत्रांच्या पल्याड एक लपलेली दुनिया आहे याची आपल्याला जाणीव नसते. त्या दुनियेचे नाव आहे खोलजाल(Deep Web), किंवा अदृश्यजाल(Hidden Web).
सर्व साधारणपणे लोक जेव्हा आंतरजालाबद्दल बोलतात तेव्हा ते खरतर जालाच्या पृष्ठाभागाबद्दल बोलत असतात. नेहमीच्या वापरातील चाळणतंत्रे आपल्याला जालाच्या केवळ पृष्ठाभागावर फिरवतात. ह्याला म्हणतात पृष्ठजाल(Surface Web). ह्या पृष्ठाभागावर देखील अक्षरशः कोट्यावधी महितीपत्रे आहेत. हिमनगाचे ज्याप्रमाणे आपल्याला केवळ टिप दिसते, उरलेला भागा पाण्याखाली अदृश्य असतो, त्याचप्रमाणे आंतरजालाचा बहुतांश भाग आपल्यासाठी अदृश्य असतो. जालाच्या ह्या अदृश्य भागाला “खोलजाल”(Deep Web) असे नाव आहे. ज्या संस्थळी परवलीच्या शब्दाशिवाय प्रवेश मिळत नाही अशा सर्व जागा खोल-जाल मध्ये गणल्या जातात. अशा जागी फक्त सदस्यांना प्रवेश मिळू शकतो. उदा. खाजगी डेटाबेसेस, बँकेची पोर्टल्स, पेशंटची रेकॉर्डस, इ-मेल एकाउंटस इत्यादि. एकदा प्रवेश मिळाल्यानंतर ही संस्थळे चाळण्यासाठी आपल्याला खास सॉफ्टवेअरची गरज नसते. खोल-जालाचा हा भाग संपूर्णतः कायदेशीर आहे. जोपर्यंत इरादा प्रामाणिक आहे तो पर्यंत आपली ओळख लपवण्याची देखील गरज नाही. हे सखोल-जाल किती “खोल” आहे? तर्क करणेही कठीण आहे. अगदी साधे उदाहरण. आपला
“आधार” चा डेटाबेस. ह्यात किमान शंबर कोटी नागरिकांची माहिती साठवून ठेवली असणार. असे जवळ जवळ प्रत्येक देशाचे डेटाबेस आहेत. किंवा आपल्या सर्वांच्या आवडीचे स्थळ “फेसबुक!” इथे केवळ सभासदच प्रवेश करू शकतात. ही माहिती आपल्या नेहमीच्या चाळणतंत्राच्या कक्षेबाहेर आहे.
ह्याच सखोल-जालाचा एक अत्यंत रहस्यमय भाग आहे गर्द-जाल (Dark Web). एक ध्यानात ठेवणे महत्वाचे आहे कि गर्द-जाल हे बहुतांशी बेकायदेशीर कृत्ये करणाऱ्या गुन्हेगारांचा अड्डा आहे. आणि त्यामुळेच देशोदेशीच्या गुप्तचरांचा वावरही येथे असणार व आहेच. त्यामुळे कोण गुन्हेगार आणि कोण पोलीस हे ओळखणेही अवघड! म्हणून मी म्हणतो कि ह्या जागी प्रवेश न करणे श्रेयस्कर!
ह्या ठिकाणी वावरणारे आपली खरी ओळख लपवून वावरतात. व्यवहार करणारे दोनी पक्ष अनामिक होऊन वावरतात. आपली “ओळख” म्हणजे जालावरील आपला पत्ता IP ADRESS. ह्या पत्त्यावरून तुम्ही कुठल्या संगणकावर आहात त्याचा छडा लागू शकतो. हा पत्ता लपवण्यासाठी आपल्याला खास चाळणतंत्राचा उपयोग करावा लागतो. त्याबद्दलची माहिती पुढे येईलच. पण त्या आधी ह्या गर्द-जालावर कशा प्रकारच्या “सेवा” उपलब्ध आहेत, इथे ग्राहक काय विकत घेऊ शकतो त्याची थोडक्यात जंत्री देतो.
ड्रीमलँडमध्ये स्वप्नं रहातात तर गर्द-जालामध्ये नको नको त्या गोष्टी रहातात.. हे पहा गर्द-जालाचे “नागरिक!”
हॅकर्स= तुम्ही पैसे सोडलेत तर तुम्ही सांगाल ते हॅक करून देऊ. हा ह्यांचा बाणा.
भाडोत्री खुनी= फक्त पैसे द्या नि टार्गेट दाखवा काम होणार. पुरावा म्हणून खुनाचा विडिओ पण मिळेल. एक्स्ट्रा चार्जेस अप्लाय.
मादक पदार्थ= मागणीनुसार पुरवठा!
पोर्नोग्राफी= विशेषतः चाईल्ड पोर्नोग्राफी. जास्त लिहित नाही.
राजकारण= राजकारणी,पत्रकार, खबरी, स्टिंग ऑपरेट इ.चा वावर.
आर्थिक- चोरलेली क्रेडीट कार्ड्स.
शिवाय टेररिस्ट, क्रांतिकारक, अनार्किस्ट, जुगारी, भाडोत्री सैनिक ह्यांची दुकाने, अड्डे, गाळे ते वायले.
जे लोक तिकडे जाये करतात त्यांच्या मते आपले “अंतरजाल” म्हणजे -आपण ज्या जालात वावरतो ते- ह्या अदृश्य जालाच्या तुलनेत नगण्य आहे. महासागरात जसे थरावर थर असतात आणि पृष्ठभागाचा तळाशी काही संबंध असतोच असे नाही. तसेच आहे हे. शास्त्रज्ञ सांगतात कि समुद्राच्या तळाशी खनिजांचे साठे आहेत! सागरात बुडालेल्या स्पॅनिश जहाजांच्या बरोबर बुडालेले सोन्याचे डब्ळून आहेत! आपल्याला पृथ्वीवरच्या जीवसृष्टीची संपूर्ण माहिती नाही. मग खोल समुद्राच्या तळाशी असणारे कूट प्राणीमात्र आपल्या विरुद्ध काय कट कारस्थाने रचित असतील काय सांगावे?
ह्या खोल जगात ये जा करणाऱ्या लोकांपैकी नव्वद टक्के लोक तर एफबीआय, एमआय6 (हा तेच ते 007 वाले) सीआयए, एसवीआर आरएफ, मोसाद, रॉ इत्यादि-इत्यादि चे एजंट असतात. पण एव्हढे आपटून ह्यांच्या हाताशी एखादाच मासा घावतो. कारण? इथे क्वांटमक्रिप्टो भाषेत व्यवहार चालतात. ही भाषा फक्त बोलणाऱ्या आणि ऐकणाऱ्यालाच समजते. इथले चलनही क्रिप्टो आहे. क्रिप्टो कहासे आता है और कहा जाता है? उपरवालाही जाने. तुमच्या माहितीसाठी, इथे सगळे मुखवटे घालून वावरतात. त्यामुळे एक एफबीआयवाला दुसऱ्या एफबीआय वाल्यावर पाळत ठेवतो. अगदी स्वतःच्या नकळत!
तर कधी काळी ह्या गर्द-जालात सहल करण्याची इच्छा झालीच तर आपल्याला सुरक्षा कवच घेऊनच जावे लागेल. त्या सुरक्षा कवचाची माहिती पुढील भागात.
मला वाटतं कि तुम्ही नेहमीच्या आंतर जालावर ओळखीच्या जागीही जा ये करत असाल तरी सुरक्षा कवच वापरावे कारण.
The Internet can be a dangerous place.
तुम्हाला कदाचित असं वाटणार नाही, पण हे सत्य आहे. आपल्या घरात आपल्या बायका मुलांच्या सहवासात आपण एक गोष्ट सहज विसरून जातो कि आंतरजालाच्या जंगलात आपण एकटे असतो, आपले रक्षण करण्यासाठी आपल्या जवळ काहीही शस्त्र, कवचकुंडले नसतात, सगळ्यात भयावह हे आहे कि ह्याची आपल्याला जाणीव नसते.
बकऱ्यांच्या शोधात फिरणारे हॅकर्स, आपल्याच नागरिकांवर लक्ष ठेवणारी काही सरकारी खाती, तुमच्या सवयी, आवडी निवडी, गरजा जाणून घेण्यास उत्सुख असणारे हे प्रामुख्याने तुमच्यावर लक्ष ठेवून असतात. सर्वसाधारण लोकांना आपल्या खाजगीपणाची पायमल्ली होत आहे ह्याची जाणीव नसते.
ठीक आहे. जैसी जिसकी सोच!
आंतरजालीय थरार.! भाग १
Submitted by केशवकूल on 1 November, 2024 - 12:45
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कुणी प्रतिसाद देईल कि नाही
कुणी प्रतिसाद देईल कि नाही कुणास ठाऊक. एकही प्रतिसाद आला नाहीतर वाईट दिसते. म्हणून मी गालबोट म्हणून हा प्रतिसाद लिहित आहे.
ह्या विषयावर लिहायचे होते पण जमत नव्हते. आज प्रयत्न पूर्वक लिहित आहे. ह्याचा दुसरा भागही लिहायचा आहे. जेव्हा जमेल तस.
छान, माहितीपूर्ण लेख आहे.
छान, माहितीपूर्ण लेख आहे. सगळे अनुवादित शब्द चपखल वाटले.
चाईल्ड पॉर्नॉग्राफीची तेरा बिलियन डॉलर्सची इंडस्ट्री आंतरजालावर कार्यरत आहे, असे मी अनेक वर्षांपूर्वी वाचले होते. अत्यंत धक्कादायक वाटले होते, अस्वस्थ होते दोन दिवस. आता त्यात अजून वाढ झाली असेल.
ह्या धाग्यावर प्रतिसाद दिला
ह्या धाग्यावर प्रतिसाद दिला म्हणून गर्द-जालातील गर्दुल्यांच्या रडार वर तर नाही येणार ना?
चामुंडराय
चामुंडराय
तुम्ही माझं लेग पुलिंग करतायना? करा करा.
माहितीपूर्ण लेख.
माहितीपूर्ण लेख.
पु भा प्र
Intersting वाटतो आहे
माहितीपूर्ण लेख.
माहितीपूर्ण लेख.
त्यामुळे एक एफबीआयवाला
त्यामुळे एक एफबीआयवाला दुसऱ्या एफबीआय वाल्यावर पाळत ठेवतो. अगदी स्वतःच्या नकळत! >>>> हे खरे असेल तर एफबीआय विनोदी आणि अकार्यक्षम आहे असे म्हणावयास हवे. (FBI वाले हा प्रतिसाद वाचत असतील तर - FBI मध्ये Dark Web वर काम करणाऱ्यांचा स्वतंत्र विभाग असावा. त्यात कोण काय करतय हे त्या विभागातील सर्वांना माहित असायला हवे. नाहीतर दोन एजन्ट एकमेकांशी गुप्त भेट आयोजित करून एकमेकांनाच ठार करायचे. )
मला बरेच दिवस डार्क वेब म्हणजे डार्क मोड ऑन करून केलेले ब्राऊजिंग असे वाटायचे.
छान लेख..
छान लेख..
आतंजालाचे नियमन करणाऱ्या वेगवेगळ्या संस्था ( आतंरराष्ट्रीय/राष्ट्रीय), वेगवेगळ्या देशात एखाद्या गुन्हयाचे वेगवेगळे परिमापन उदा. आपल्याला जे अश्लील ते इतरांना तसं वाटेलच असे नाही . मुळात आंतरजालाची जटिलता आणि राष्ट्रीय सीमा यामुळे बरेचदा एखादे सरकार देखील काही करू शकत नाही. बरेचदा एखाद्या कृतीसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम वगैरे दाद देतीलच असे नाही.
माहितीचे अफाट संक्रमण, संचय तुमची कुठली बाब वैयक्तिक ठेवेल?
दसा
दसा
तुम्ही हे जे लिहिले आहे ते सर्व पृष्ठ -जाला साठी योग्य आहे. पण जेव्हा आपण गर्द जाला बद्दल बोलतो, तेव्हा ह्या गोष्टी काही कामाच्या नाहीत.
आता मी इथे लिहिले आहे ते पण चूक आहे.
Deep Web, Deep State सारखंच
Deep Web, Deep State सारखंच भयावह. आहे.