लेखन
वैषम्य
वैषम्य
जे समजत होते माझे हातून हरवले आहे
उमजले मला भवताली निर्वात पोकळी आहे
का फुलला आहे केव्हा पारिजात माळावरती
लागले वनाला वणवे राखोळी झाली आहे
बांधून घेतले काही क्षण ओले उरले सुरले
वेड्यागत मागे मग मी का वळुनी बघते आहे?
साम्राज्य लयाला गेले सिंहासन ओके बोके
दगडाच्या सांध्यांमधुनी डोलते लव्हाळी आहे
जाणिवा मनाच्या हळव्या बोथटल्या खुरट्या झाल्या
डोक्यावर माझ्या आता तलवार टांगली आहे
-डॉ. रोहिणी चंद्रात्रे वाघमारे
रंगीत स्वप्न
रंगवत जा स्वप्न.
जशी चित्र रंगवतेस तशीच,
एकचित्ताने, तन्मयतेने.
सप्तरंगात.
करड्या रंगात कधी,
आभाळ झाकोळले तरी,
अंतरंगातले रंग राहू देत
उत्फुल्ल, सोनेरी.
एखाद्या दिवशी दिसेल फक्त
काळ्या- भु-या छटांचीच नक्षी
रात्रीच्या अंधारात, दिवसा ही, कदाचित.
तरीही तुझी चित्र मात्र असावीत
तुझ्या स्वप्नांसारखीच रंगीत.
स्वच्छ सोनेरी उन्हात,
चांदण्यांच्या शान्त प्रकाशात,
अनंत निळ्या आकाशात,
गर्द, पाचूच्या हिरव्या रानात.
जिवंत ठेव ही रंगीत स्वप्न
तुझ्या खोल, गहि-या डोळ्यांच्या समुद्रात.
मायबोलीवरील चुम्मा ने गाबाचा किल्ला फोडला
अरे बाबा, 2021 सालची गाबा कसोटी म्हणजे क्रिकेटच्या इतिहासात झकास chapter आहे राव! भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या कसोटी मालिकेचा चौथा मॅच होता, आणि काय भयंकर टेंशन! 328 धावांचा target दिला होता ऑस्ट्रेलियानं, आणि त्या गाबा ग्राउंडवर तर 32 वर्षं ऑस्ट्रेलिया हारलाच नव्हता! पण काय पायजेल, आपला ऋषभ पंत मैदानात आला आणि बाजी पलटून टाकली.
असोशी
ग्रेटचेन रुबिन यांच्या हॅपीनेस प्रॉजेक्ट बद्दल ऐकलेले होते पूर्वी. पण मला ते कधीच अपीलिंग वाटलेले नव्हते. पोकळ आनंदी आनंदी, सतत आनंदी रहाणे असे काहीतरी असावे असा अंदाज होता. त्यामुळे मी नंतर त्यांचे काहीच वाचले नाही.
पण मध्यंतरी 'लाइफ इन फाइव्ह सेन्सेस' नावाचे पुस्तक सापडले. ग्रंथालयात बसून चाळता चाळता इतके आवडून गेले की घरी घेउनच आले. म्हणजे इश्यु करुन, चेक आऊट करुन.
त्यात प्रत्येक सेन्स - गंध, स्पर्श, दृष्टी, श्रवण आणि स्वाद यांबद्दल विविध माहीती आहे, प्रयोग आहेत बरेचसे अर्थात स्वतःचे विचार मांडलेले आहेत. पुस्तक फार रोचक वाटले.
अनवधानातील गमतीजमती . . .
डॉक्टरांच्या रुग्णालयीन कामातील एक महत्त्वाचा कारकुनी भाग म्हणजे रुग्णासंबंधीच्या दैनंदिन नोंदी करणे. प्रत्येक रुग्णाच्या केस पेपरवर सुरुवातीस कनिष्ठ डॉक्टर सविस्तर माहिती लिहितात आणि पुढे त्यामध्ये अनेक वरिष्ठ डॉक्टरांच्या टिपणांची भर पडत जाते. अवाढव्य कारभार असलेल्या रुग्णालयांमध्ये प्रत्यक्ष रुग्णतपासणीची आणि इतर आनुषंगिक कामे खूप दमवणारी असतात. रुग्णालयाच्या काही विभागांमध्ये तर परिस्थिती सतत तणावपूर्ण असते. हा सर्व बोजा सतत डोक्यावर घेऊनच डॉक्टरांना या जोडीने रुग्णनोंदीचे कामही इमानइतबारे करावे लागते. त्याला कायदेशीर महत्त्व आहे.
वाचावे ते नवलंच - 'अमीश' जीवनपद्धती! (पूर्वार्ध)
पानगळीचा रंगोत्सव
प्रायश्चित्त.
8am Metro - गुलजार यांच्या कविता व दोघांची गोष्ट
मी जर सोनमासळीचे शरीर घेवून या तलावाच्या तळाशी लपून राहीले असते
तेव्हा तू चंद्रबिंबासारखा या पाण्यावर तरंगत आला असतास
आणि माझ्या काळोख्या घरात चांदणे पसरवले असतेस
तरंगत म्हणालाही असतास या एकाकी तळ्यात , 'तुझ्यावरही कुणी प्रेम केले असते'. मग मी किनाऱ्यावर येऊन तुझ्याशी मैत्री केली असती, तुझ्या सोनमासळीने तुझा एकाकीपणा दूर केला असता. या कल्पनेने तुला 'सुकून' मिळाला असता, जर खरेच अशी सोनमासळी या तलावात राहत असती, जर खरेच अशी सोनमासळी या तलावात राहत असती