Distressed

वैषम्य

Submitted by डॉ. रोहिणी चंद्... on 20 December, 2024 - 23:45

वैषम्य

जे समजत होते माझे हातून हरवले आहे
उमजले मला भवताली निर्वात पोकळी आहे

का फुलला आहे केव्हा पारिजात माळावरती
लागले वनाला वणवे राखोळी झाली आहे

बांधून घेतले काही क्षण ओले उरले सुरले
वेड्यागत मागे मग मी का वळुनी बघते आहे?

साम्राज्य लयाला गेले सिंहासन ओके बोके
दगडाच्या सांध्यांमधुनी डोलते लव्हाळी आहे

जाणिवा मनाच्या हळव्या बोथटल्या खुरट्या झाल्या
डोक्यावर माझ्या आता तलवार टांगली आहे

-डॉ. रोहिणी चंद्रात्रे वाघमारे

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - Distressed