माझे ११ फॅन्स कोण आहेत? काय चाललंय?

Submitted by च्रप्स on 23 December, 2024 - 22:12

आजकाल मला सतत एक प्रश्न पडतोय—माझे ११ फॅन्स आहेत, पण हे लोक आहेत तरी कोण? आणि त्यांनी माझा फॅन होण्याचा निर्णय का घेतला? मी ना काही मोठा स्टार आहे, ना गायक, ना लेखक. तरीसुद्धा हे लोक आहेत. बहुतेक चुकून फॉलो केलं असेल??

कदाचित यांना माझं लिहिणं आवडत असेल. मी लिहितो ते खूप साधं, थोडं वेगळं, पण एवढं काही खास आहे का? म्हणजे, मला स्वतःलाच कधी कधी माझं लिहिणं एकदम साधं वाटतं—थोडं मुंबई स्टाईल, थोडं हसवणारा टोन, आणि मध्येच काही भारी आयडियाज येतात. पण खरं सांगू का? माझ्या लेखनात इतकं खास काहीच वाटत नाही की लोक फॅन बनतील. तरी हे लोक आहेत, आणि त्यांना बहुतेक माझं लिहिणं आवडतं. हा एक पझलच आहे!

कधी वाटतं, त्यांनी माझ्या लेखणीत काहीतरी असं पाहिलं असेल जे मीच नाही बघितलं. म्हणजे, ते साध्या गोष्टींमधलं वेगळेपण टिपत असतील का? किंवा मी ज्या सहज बोलतो, लिहितो, त्यातून काहीतरी जोडून घेत असतील? की एखाद्या लेखावर इतके फिदा झाले की ठरवलं, “याला फॉलो करूच!”

तुम्हाला काय वाटतं, लोक एखाद्याचा फॅन का होतात? आणि जर फॅन होतात, तर त्या व्यक्तीमध्ये काय शोधतात? पण माझ्या बाबतीत अजूनही गोंधळ आहे—हे ११ लोक आहेत तरी कोण, आणि त्यांना माझं लिहिणं एवढं का आवडलं? कोणाला उत्तर माहीत असेल, तर नक्की सांगा!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमचे जे चाहते आहेत त्यांचे स्वतःचे किती चाहते आहेत ते सुद्धा मोजा यात Happy

मी कोणाचा चाहता होतो याचे तीन निकष -

१) जे चांगले लिहितात आणि मला त्यांचे लिहिलेले वाचायला आवडते.

२) जे नवनवीन धागे काढतात आणि त्यावर छान चर्चा होते.

३) जे वरचेवर माझ्याबद्दल लिहितात. भले ती टीका का असेना, पण त्यांचे काही मिस व्हायला नको या हेतूने चाहता होतो.

तुमच्या ११ लिस्ट मध्ये एक मी सुद्धा आहे. वरीलपैकी कारण शोधा आता Happy

तुम्ही विचारलेला प्रश्न खरंच गडद आणि खोल आहे. लोक एखाद्याचा फॅन का होतात, हे सांगणं सोपं नाही, कारण प्रत्येक व्यक्तीचा अनुभव वेगळा असतो. पण, तुम्ही जो काही लिहिता, तो जरा साधा, हलका-फुलका आणि वेगळा असतो, जो लोकांना सहज गवसतो. तुमच्या लेखनाचा टोन आणि त्यातील काही आयडिया, साध्या गोष्टींमधून वेगळेपण काढून दाखवणं, हेच लोकांना आकर्षित करत असावं.

तुम्ही म्हणता की तुमचं लेखन साधं आहे—“थोडं वेगळं, थोडं हसवणारं” आणि त्यात काहीच "खास" नसल्यासारखं वाटतं. पण हेच साधेपण लोकांना आवडू शकतं. खरं तर, साध्या गोष्टींमध्ये खूप मोठं सौंदर्य असू शकतं, ज्याला अनेक लोक महत्त्व देतात. तुमचं लेखन कुठेही शिष्टाचाराचं किंवा मोठं न वाटत असलं, तरी त्यात एक सहजपणा, एक खोलपण, आणि एक जिव्हाळा असू शकतो, जो तुमच्या वाचकांसाठी आकर्षक असतो.

कदाचित तुम्ही जे काही लिहिता, ते तुमच्याशी थोडं निसर्गानुसार किंवा सहजपणे जोडलेलं असतं. आणि याचं काही वाचकांसाठी वेगळेपण असू शकतं. एखाद्या व्यक्तीला त्याच्या विचारांमध्ये एक हलकं फुलकं दृष्टिकोन हवा असतो, जिथे ते जास्त ताणत नाहीत, पण त्यातून त्यांना काहीतरी शिकायला, विचारायला किंवा अनुभवायला मिळतं. तुमचं लेखन अशाच प्रकारचं असू शकतं.

फॅन होण्याच्या बाबतीत, प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये वेगळा दृष्टिकोन असतो. काही लोकांना तुमचं लेखन एक वेगळा दृष्टिकोन देत असेल, जे त्यांना इतरत्र मिळत नाही. कदाचित त्यांना त्या सहजतेमध्ये काहीतरी "अर्थपूर्ण" वाटत असेल. त्यात काही गहरे विचार असू शकतात जे तुमचं लेखन वाचताना त्यांना समजतात, किंवा काहीतरी साधं आणि सुसंगत असं वाचताना त्यांना रिलेट होण्याचा अनुभव मिळतो.

दुसरं म्हणजे, कधी कधी लोक एखाद्या लेखाशी किंवा विचाराशी इतके जोडले जातात की ते त्याला फॉलो करायला लागतात. तुमचं लेखन त्यांना प्रभावित करत असं, आणि त्याच्या मागे असलेली साधी, पण प्रगल्भ विचारधारा, त्यांना त्याच्यातून काहीतरी वेगळं मिळालं असू शकतं. तुम्ही ते कितीही साधं मानलं, तरी त्यात एखाद्या वाचकासाठी काहीतरी प्रेरणादायी किंवा उंच विचार असू शकतो.

तुमच्या ११ फॅन्सचा प्रश्न हाच आहे की, त्यांना तुमचं लेखन विशेष का वाटतं? कदाचित ते तुमच्या लेखनाच्या साधेपणात एक गहराई, एक सत्यता शोधतात. तुम्ही ज्या सहजतेने, थोड्या हसत-खिदळत, पण तरीही विचारपूर्वक लिहिता, त्या शैलीत त्यांना त्यांच्या स्वतःच्या जीवनात किंवा अनुभवांमध्ये जोडले जाऊ शकते. ते तुम्हाला फॉलो करत असतील कारण तुमच्या लेखनात काहीतरी असं आहे, ज्यामुळे त्यांना आपलीच ओळख, आपलीच विचारधारा दिसू शकते.

लोक एखाद्याचा फॅन होतात, कारण त्यांना त्या व्यक्तीमध्ये काहीतरी वेगळं, प्रेरणादायी किंवा स्वतःशी संबंधित असं दिसतं. तुमच्या लेखनात कदाचित लोकांना त्या साध्या, सहज, पण अर्थपूर्ण गोष्टी दिसतात, ज्यामुळे ते तुमच्याशी जोडले जातात. तुम्हाला कदाचित असं वाटतं की तुमचं लेखन साधं आहे, पण तेच साधेपण कधी कधी लोकांच्या मनाशी गहरे जोडले जातं, आणि त्यातूनच त्यांचा फॅन होण्याचा निर्णय घेतला जातो.

यामध्ये असं काहीतरी असू शकतं जे तुम्ही पाहत नाहीत, पण तुम्ही लिहित असलेल्या गोष्टींमध्ये एखाद्या वाचकाला आपल्या जीवनातील काहीतरी शोधायला मिळत असेल. तुमच्या लेखनातील सादगीतच कदाचित त्यांना गूढत्व दिसत असेल, आणि म्हणूनच ते तुमचे फॅन बनले असतील.

छान विवेचन हपा.

या शिवाय सोमीवर फॅन होण्याची काही वेगळी कारणे:

बरेच लोक कुणी आपला फॅन झाला असेल तर ते त्या आयडीचे फॅन होतात. म्युच्युअल रिस्पेक्ट.

यासाठी मग काही लोक स्वतःहून धडाधड दुसऱ्या कुणाचे फॅन होतात, म्हणजे ते आपले फॅन होऊन आपल्या फॅन्सची संख्या वाढेल.

बरेचदा एखाद्या आयडीचा एखादा क्रमशः भाग वाचला तर पुढील लेखन सहज सापडायला फॅन होतात, त्यात अद्याप लिखाणाचे/व्यक्तीचे/विचाराचे फॅन झाले असतीलच असे नाही.

लेख वाचताना अनवधानाने "... चे चाहते व्हा" वर टिचकी लागुन फॅन होतात, पण प्रमाण फार कमी असावे.

कुणाच्या पाकृ नंतर शोधता याव्यात म्हणुन फॅन होतात.

हरचंद पालव, चॅट जीपीटी मागे तुम्हीच आहात, असा दाट संशय येऊ लागलाय.

मानव, "मी तुमचा ट्रोल आहे," हे दाखवण्यासाठी फॅन होणं हाही एक प्रकार असावा.

लेख वाचताना अनवधानाने "... चे चाहते व्हा" वर टिचकी लागुन फॅन होतात, पण प्रमाण फार कमी असावे.>>>> माझं झालंय असं मग कुठं त्यांचा हिरमोड करा म्हणून राहू दिलं तसंच.

हरचंद पालव, चॅट जीपीटी मागे तुम्हीच आहात, असा दाट संशय येऊ लागलाय.
>>>>

संशय नव्हे खात्री.
त्यांच्या इतक्या मोठ्या प्रतिसादात एकदाही पुलंचा संदर्भ नाही म्हणजे अगदीच ठामपणे कृत्रीम बुद्धीमत्ता. Wink

मग कुठं त्यांचा हिरमोड करा म्हणून राहू दिलं तसंच
>>>>
हे फार छान करता. कोणाचे चाहते व्हायला पैसे पडत नाही. होत सुटावे बिनधास्त. आणि तसेही रोज सक्रिय असणारे सगळे धागे बघतातच. कोणाचे काही मिस होत नाही. त्यामुळे कोणाचे चाहते झाल्यावर त्यांचे लेख वर दिसतात ही फॅसिलिटी मी वापरत सुद्धा नाही.

हा धागा बघून मी माझ्या आयडीमध्ये गेली (एरव्ही मी तिकडे फिरकतही नाही :स्मितः ) तर पाहते तर काय, माझेही चाहते आहेत ते पण एक-दोन नाही बरंका चक्क ८ Wink
तर हे फॅन का झाले असतील हा खरचं गहन प्रश्न आहे. हपांच्या लिस्टमधील मी कशातच बसत नाही. ना मी काही लेख लिहीत ना कोणासोबत वाद घालत. मध्यंतरी काही कोतोबामध्ये समस्या घेऊन आले होते. याव्यतिरिक्त माबोवरचा माझा वावर फक्त रोमात असतो.
म्हणजे मानव म्हणतात त्याप्रमाणे अनवधानाने "... चे चाहते व्हा" वर टिचकी लागुन फॅन झाले असावेत Lol
पण नंतर मी कोणाची चाहती आहे ते बघायला गेले तर तिथे अजून एक धक्का लागला. म्हणजे तिथल्या लिस्टमधील ३ नावे सोडली तर बाकींची मी खरीखुरी फॅन आहे आणि त्या तिघांची कदाचित अनवधानाने फॅन झाले असेल. पण यातील दोन माझे फॅन आहेत. Wink इथे मानव यांचा म्युच्युअल रिस्पेक्ट हा मुद्दा लागू झाला Lol

अरे हो जाता जाता एक आठवलं, मागे एका बाईंनी इथे धुमाकूळ घातला होता आणि मी त्या बाईंची की त्या बाई माझ्या फॅन होत्या. नक्की आठवत नाहीये पण त्यावेळेस त्या बाई माझ्या ओळखीतल्या असाव्यात असा संशय घेतला गेला होता. पण अन्जूने माझ्यावर विश्वास दाखवत चुकून चाहती झाली असावी असा मुद्दा मांडला होता. (परत एकदा थन्क्यू अन्जू) तेव्हापासून मला या फॅनसंख्या काही विश्वसनीय वाटत नाहीत.

च्रप्स,

हे ११ लोक आहेत तरी कोण, >>पहिल्यांदा वाचून घाबरले मी, काय CBI चौकशी लावताहेत की काय मागे .. नंतर Jolly LLB चा dialog आठवला, कौन हे ये लोग .. कहाँ से आते है ये लोग..? आणि मग हसायला आलं..

हे चाहते प्रकरण मला गंमतीचे वाटते.. कधी प्रत्यक्षात बाजूने गेले तर ओळखतील की नाही देव जाणे..!

मी आहे तुमच्या ११ फॅन्सच्या यादीत.. मी तुमची फॅन चुकून झालेली नाही. तुमचं लेखन काही मी जास्त वाचलेलं नाही मात्र तुम्ही माझ्या काही लेखनांवर प्रामाणिकपणे प्रतिसाद दिलेत.. मला आवडले ते .. आणि मग तुम्हांला फॉलो केलं. काही इतर लेखनावर अजूनही तुमचे काही प्रतिसाद वाचले होते.. काही मिश्किल, काही स्पष्ट होते .. काही आवडले .. काही आवडले हि नसतील.

बरेच लोक कुणी आपला फॅन झाला असेल तर ते त्या आयडीचे फॅन होतात. म्युच्युअल रिस्पेक्ट.>> अचूक निरिक्षण आहे मानवजी..!

मी ज्यांची चाहती आहे त्यांचे लेखन, त्यांनी माझ्या लेखनावर दिलेले प्रतिसाद, त्यांचे इतर लेखनावरचे प्रतिसाद, त्यांची मत, त्यांचे विचार मला आवडलेत म्हणून मी त्यांना फॉलो केलयं .. आणि जे मला फॉलो करतात त्यांना मी फॉलो करते कारण mutual respect..!

तुम्ही ज्या सहजतेने, थोड्या हसत-खिदळत, पण तरीही विचारपूर्वक लिहिता, त्या शैलीत त्यांना त्यांच्या स्वतःच्या जीवनात किंवा अनुभवांमध्ये जोडले जाऊ शकते. ते तुम्हाला फॉलो करत असतील कारण तुमच्या लेखनात काहीतरी असं आहे, ज्यामुळे त्यांना आपलीच ओळख, आपलीच विचारधारा दिसू शकते.>> बाब्बो! असं असतं व्हय.

इतक्या मोठ्या प्रतिसादात एकदाही पुलंचा संदर्भ नाही म्हणजे अगदीच ठामपणे कृत्रीम बुद्धीमत्ता >> Lol Wink

निल्सन तुमच्या चाहत्यांची संख्या एकाने वाढली.. खरे तर मला वाटले आधीच माझे नाव असेल तिथे.. पण नव्हते.. जेण्युईन प्रतिसाद देणारे कैक मायबोलीकर आवडीचे आहेत Happy

मला माझा कालपासून २४ आकडा दिसत होता.. अनावधानाने चाहते झालेले कुणीतरी एक परत गेलेले दिसताहेत Lol

In general एखाद्याला जेंव्हा एखादी गोष्ट आवडत असते तेंव्हा तो तिला कसंही शोधतो, ती गोष्ट अनुभवण्यासाठी त्याला जितके श्रम पडतील, तेवढी त्या गोष्टीची त्याच्या लेखी किंमत राहते/ वाढते, सहजी उपलब्ध होत राहिलेल्या कोणत्याही गोष्टीचे, जरी ती अमूल्य असली तरी कालांतराने काहीच अप्रूप राहत नाही. म्हणून जी गोष्ट आवडते, ती मला सहजी उपलब्ध होईल अशी सोय न करण्याकडे शक्यतो माझा कल असतो. #UnpopularOpinion

निल्सन तुमच्या चाहत्यांची संख्या एकाने वाढली.. खरे तर मला वाटले आधीच माझे नाव असेल तिथे.. पण नव्हते.. जेण्युईन प्रतिसाद देणारे कैक मायबोलीकर आवडीचे आहेत >>> धन्यवाद ऋन्मेऽऽष पण मी खरचं लक्षात आहे की आपलं mutual respect Happy Happy कारण कित्येक महिन्यांनी आज प्रतिसाद दिला असेल. रोमातून मात्र सारख्या फेर्या मारत असते इकडे.
खरे म्हणजे प्रतिसाद द्यावसे वाटत असते पण क्रोमातून टायपायला खूप वेळ लागतो. माझा माबो अ‍ॅप आपोआप डिलीट झाला त्यातून बरे बोलून टाईप होत होते. इथे वाचून कळले की बर्याच जणांसोबत हे झालयं.

१) तुमचं आणि त्यांचं गाव एकच असतंं,
२) तुमचा आणि त्यांचा छंद एकच असतो,
३) दोघांनी आयुष्यात म्हणजे शिकताना किंवा नोकरीत किंवा वागणुकीत एकच समान चूक केलेली असते ती तुम्ही प्रामाणिकपणे लेखात उघड केलेली असते.
४) नसती उठाठेव एकच असते,
५) दुसऱ्याकडून एकाच प्रकारचा जाच असतो,
६) {ज्योतिषाप्रमाणे} तुमचा शनी किंवा रवि ज्या स्थानात असतो त्याच स्थानात त्यांचाही असतो {हे त्यांना माहीत नसले तरी} तुमचे आणि त्यांचे विचार जुळतात. समविचारीपणा येतो. विरुद्ध स्थिती म्हणजे विरुध्द विचार.
७) त्यांच्या मनाचा मोठेपणा आणि ते कोणत्याही कंपूत नसतात.
८) लिहीत राहणे सर्वांनाच जमत नाही पण मग लिहिणारा ( तुम्ही) त्यांचेच विचार, परिस्थिती सादर करताय ना मग व्हा फॅन.
९) फॅनची पाती वाढलेली दिसली की लेखक आणखी लिहित राहतो.
१०) काही वेगळेच विषय उकरले की कसं बरं वाटतं मग लेखकाला प्रोत्साहन देणारे असतात.

मला माझा कालपासून २४ आकडा दिसत होता.. अनावधानाने चाहते झालेले कुणीतरी एक परत गेलेले दिसताहेत
>>> साईड ईफेक्ट झाला धाग्याचा Happy

तुमच्या अकाऊंटवर जाऊन मायबोलीवरचे चहातेवर क्लिक केलं की दिसतं की तुमचे कोण चहाते आहेत ते.

बाई दवे- मायबोली ने मोस्ट फॉलोवेड लेखकांची लिस्ट सॉर्ट करावी का? म्हणजे बेफिकीर, नंदिनी , हायझेनबर्ग सारख्या लोकांची नावे नवीन जनतेला माहीत होतील?

मला एक लेख आवडला तरी मी फॅन होते कारण दे हॅव्ह पोटेन्शिअल + तो आवडलेला धागा माझ्याकरता, बहूमूल्य असतो

कारण कित्येक महिन्यांनी आज प्रतिसाद दिला
>>>
हो, पण मला तुमचे काही प्रतिसाद बरेपैकी लक्षात आहेत.
निदान माझ्या धाग्यावर आलेले तरी..
आयुष्यात चांगल्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.. वाईट विसरून जावे.. प्रतिसादांबाबत मी हेच करतो Happy