इराण – इराक
ट्रम्प यांनी इराणविरुद्ध घोषित न केलेले युद्ध सुरू करून जवळपास दोन महिने पूर्ण झाले आहेत. अमेरिकेचे व्यावसायिक दृष्टिकोनातून दोन मुख्य उद्देश आहेत. पहिला म्हणजे तेलाची विक्री डॉलरमध्ये करणे आणि दुसरा म्हणजे जगभरात आधुनिक शस्त्रास्त्रे व दारुगोळा पुरवणे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी इतर देशांतील विध्वंस आणि मृत्यूबद्दल अमेरिकेला फारशी काळजी नसते.
कल क्या होगा किसने जाना
गेल्या आठवड्यात बीजिंग मध्ये एकवीस किलो मीटरची मॅरेथॉन पळण्यात आली. ही स्पर्धा लायटनिंग नावाच्या खेळाडूने पन्नास मिनिटात जिंकली. पुढच्या स्पर्धकाला एक तास अठरा मिनिटे लागली. एक लक्षात ठेवले पाहिजे कि जिंकलेला स्पर्धक हा रोबो होता. थोडक्यात आता रोबो बुद्धीच्या दृष्टीनेच नव्हे तर शारीरिक तंदरुस्तीने माणसावर मात करू लागले आहे.
अधल्या-मधल्या नोंदी – १
..... एक-एक म्हणता म्हणता अशा क्षणांची मोळीच बनत जाते.. अन् मग आपल्यातलंच माणूसपण निघून जातंय की काय असं वाटायला लागतं..
दूर सारायचे ठरवले तरी सगळे प्रसंग तसेच नजरेसमोर असतात.. गळून नं जाणाऱ्या ओंजळीतच!!! कुठल्याही अपेक्षा करणं नाहीच आता, पण असलेली किमान तत्व.. खूप मोठा शब्द आहे का हा..? मग तत्व नको.. पण ‘माणसाने माणसाशी माणसासम वागणे..’ असं वाटणं म्हणजे तर खूप नाहीय नं?
रोजच्या जगण्यात अनेक छोटे मोठे प्रसंग घडत असतात. त्यातले काही प्रसंग, तेव्हा मनात आलेली भावना कुठे तरी खोलवर रुतुन बसते. तसं बघायला गेलं तर त्यात फार काही विशेष नसते, पण त्यावर लिहावेसे वाटते. अगदी महत्वाचे नाही, फार काही उदात्त किंवा थोर नाही. तरी पण असेच आयुष्यात लक्षात राहिलेल्या छोट्या मोठ्या प्रसंगांची नोंद...... असंच, उगीचंच.....
घाव
संध्याकाळ झाली. रवी झोपेतून उठला. त्याला चांगलीच झोप लागली होती ; पण जेव्हा तो बेडवर उठून बसला तेव्हा त्याचं डोकं गरगरत होतं . त्याच्या मनामध्ये असंख्य भोवरे फिरू लागले होते . लहान पोरं भोवरा खेळतात आणि मध्येच तो हवेत फेकून तळहातावर झेलतात . तसंच त्याचं होत होतं ; पण इथे भोवरे अनेक होते . आणि - एखादा भोवरा उचलून घेतलाच तर तो थेट हृदयाला सलत होता .
त्याला कारणही तसंच होतं . आज सकाळीच त्याचा डिव्होर्स झाला होता. कोर्टातल्या त्या सगळ्या किचकट प्रोसिजर्स, कागदपत्र आणि सह्या आणि सगळंच ; पण उरकलं होतं एकदाचं . त्यांच्या विभक्तपणावर अखेरीस शिक्कामोर्तब झालं होतं.
स्त्री जन्मा हि तुझी कहाणी-
१) माझ्याकडे बर्याच स्त्रिया येतात सोनोग्राफी साठी का तर पाळी नीट येत नाही म्हणून. म्हणजे केवळ "दोनच दिवस" अंगावर जातं
सोनोग्राफी केल्यावर मी त्यांना विचारतो तुम्हाला त्रास काय आहे? त्रास काही नाही पण "व्यवस्थित" ब्लीडींग होत नाही.
परत --त्याचा तुम्हाला काय त्रास होतो?
--त्रास काही नाही पण चार दिवस व्यवस्थित ब्लिडींग होत नाही.