डॉक्टरांच्या रुग्णालयीन कामातील एक महत्त्वाचा कारकुनी भाग म्हणजे रुग्णासंबंधीच्या दैनंदिन नोंदी करणे. प्रत्येक रुग्णाच्या केस पेपरवर सुरुवातीस कनिष्ठ डॉक्टर सविस्तर माहिती लिहितात आणि पुढे त्यामध्ये अनेक वरिष्ठ डॉक्टरांच्या टिपणांची भर पडत जाते. अवाढव्य कारभार असलेल्या रुग्णालयांमध्ये प्रत्यक्ष रुग्णतपासणीची आणि इतर आनुषंगिक कामे खूप दमवणारी असतात. रुग्णालयाच्या काही विभागांमध्ये तर परिस्थिती सतत तणावपूर्ण असते. हा सर्व बोजा सतत डोक्यावर घेऊनच डॉक्टरांना या जोडीने रुग्णनोंदीचे कामही इमानइतबारे करावे लागते. त्याला कायदेशीर महत्त्व आहे. संगणकपूर्वकाळात अशा सर्व नोंदी हातानेच केल्या जायच्या. अजूनही रुग्णालयानुसार काही प्रमाणात हस्तलिखित नोंदी असतात. रुग्ण बरा झाल्यावर घरी पाठवून दिल्यानंतर असे सर्व केस पेपर्स नोंद विभागात ठेवावे लागतात. त्यामुळे अशा खोल्या कागदांच्या ढीगभर थप्प्यांनी ओसंडून वाहत असतात.
एकदा अशाच एका मोठ्या रुग्णालयातील डॉक्टरांच्या चमूने एक वेगळाच ‘संकलन प्रकल्प’ हाती घेतला. त्यांनी नोंद विभागावर चक्क धाड घालून अनेक वर्षांपूर्वीच्या काही ठराविक फायली बाजूला काढल्या. त्या निवडक जुन्या नोंदीमधून त्यांना काही गमतीशीर वाक्ये सापडली. काही वाक्यांमध्ये ठराविक शब्द भलत्याच प्रकारचे होते तर काही ठिकाणी वाक्यरचना गंडलेली होती. परिणामी अर्थाचा अनर्थ झाला होता. नोंदीमधील काही चुकांची खाडाखोड केलेली देखील आढळली. तर अन्य काही चुकांच्या भोवती वरिष्ठ डॉक्टरांनी लाल शाईने गोल काढलेले होते. सहसा अशा चुका अनवधानातून होतात. पण काही वेळेस अशा चुकांतून त्या व्यक्तीचे भाषिक अज्ञान उघड होते.
संबंधित चुका ज्यांच्या हातून झाल्या त्या डॉक्टरांची कदाचित वरिष्ठ डॉक्टरांनी कानउघडणी केली असेल किंवा अन्य काही प्रसंगी त्या वाक्यातून निर्माण झालेल्या विनोदाचा आनंद संबंधित डॉक्टरांनी एकत्रित लुटला असावा. तिकडे जे काय झालं असेल ते असो. अशा गमतीजमतींचे जे संकलन त्या संकलक चमूने प्रसिद्ध केलेय त्यात आज आपण थोडीशी डुबकी मारणार आहोत. त्यातून शाब्दिक विनोदाचा आस्वाद घेता येईल. अशा काही निवडक गमतीजमतींचे स्पष्टीकरणासह केलेले हे छोटे संकलन वाचकांना रोचक वाटावे.
. . .
पहिली केस आहे ताप आलेल्या प्रौढ महिलेची. डॉक्टरांनी तापासंबंधी सर्व विचारपूस केली. तापाबरोबर येणाऱ्या अन्य लक्षणांची पण दखल घेतली. पण नोंद करताना ते लिहून गेलेत :
She has no rigors or shaking chills, but her husband states she was
very hot in bed last night.
बाईच्या नवरोबांनी सांगितलं असेल की रात्रभर ती खूप तापली होती; ठीक आहे. पण डॉक्टरांनी नोंद करताना मात्र hot ऐवजी febrile हा शब्द लिहिणे अपेक्षित होते. पण त्यांनी करून टाकले शब्दशः भाषांतर !
. .
हा बघा गुप्तरोगाच्या डॉक्टरांचा प्रताप. रुग्णाने वेश्यागमनाची कबुली दिलेली आणि काय त्रास होतो ते सांगितलेय. आता डॉक्टर त्याच्या जननेंद्रियाची तपासणी करतात. तिथे प्रथमदर्शनी त्यांना काहीतरी महत्त्वाचे दिसले आणि मग ते लिहून गेलेत :
Examination of genitalia reveals that he is circus sized.
रुग्णाने सुंता केल्याची (circumcised) नोंद करताना त्यांनी शब्दस्पेलिंग तर चुकवलेच आणि शब्दही उगाचच तोडला !
. .
कर्करोगाच्या कक्षातली ही घटना. एका रुग्णाबाबत त्या रोगाचा संशय होता आणि आता खात्रीशीर निदान करण्यासाठी त्याच्यावर biopsy ची तपासणी करायची होती. या प्रकारची लघुशस्त्रक्रिया करण्यापूर्वी रुग्णाची लेखी परवानगी घेणे आवश्यक असते. त्यासाठी रुग्णाला त्या क्रियेतील थोडेफार धोके देखील समजावून सांगितले जातात.
या प्रकरणातला रुग्ण जरा हट्टी होता. डॉक्टरांनी त्याला सगळे समजून सांगितल्यावरही त्याने ती तपासणी करण्यास ठाम नकार दिला. ही महत्त्वाची बाब डॉक्टरांना लिहून ठेवणे आवश्यक होते. पण लिहिता लिहिता biopsyच्या जागी ते लिहून बसले एक साधर्म्य दाखवणारा भलताच शब्द :
The patient refused autopsy.
Autopsyचा अर्थ मरणोत्तर शवविच्छेदन. (कायदेशीर प्रकरणांमध्ये असे विच्छेदन सक्तीचे असते आणि त्याला पोस्टमार्टम म्हटले जाते). मात्र नैसर्गिक मृत्यू झालेल्या अन्य सामान्य प्रकरणांमध्ये एखाद्याच्या मृत्यूचे नक्की कारण जाणून घेण्यासाठी करायचे शवविच्छेदन मृताच्या नातेवाईकांच्या परवानगीनेच केले जाते.
इथे मात्र जिवंत व्यक्तीच्या बाबतीत autopsy अशी नोंद झाली आणि अनर्थ झाला !
. .
आता एक चक्कर अस्थिरोग विभागात.
गुडघेदुखीचा रुग्ण आहे आणि त्याच्यावर उपचार चालू आहेत. आता आलेले डॉक्टर त्याची विचारपूस करतात. त्याने आपल्या गुडघ्याबद्दलची प्रगती डॉक्टरांना सांगितली अन त्याची नोंद करताना डॉक्टर लिहून गेले :
On the second day the knee was better, and on the third day it
disappeared.
. .
सर्जन मंडळींना शरीरातील विविध ग्रंथींची (glands) तपासणी करावी लागते. त्यामध्ये प्रामुख्याने थायरॉईड, स्तन आणि प्रोस्टेट यांचा समावेश असतो. एखाद्या खूप गर्दीच्या दिवशी या तिन्ही प्रकारचे अनेक रुग्ण जर हाताळले असतील तर डोक्यात आजारांची अगदी सरमिसळ होऊ शकते.
प्रोस्टेटच्या तपासणीसाठी संबंधित पुरुषाला कुशीवर झोपवून त्याच्या गुदद्वारात डॉक्टरांनी बोट घालून त्या ग्रंथीचा अंदाज घ्यायचा असतो. एक मूलभूत तपासणी म्हणून तिचे महत्त्व आहे. एकदा प्रोस्टेटसाठी म्हणून अशी तपासणी केल्यानंतर एक सर्जन बघा काय लिहून गेलेत :
Rectal examination revealed a normal sized thyroid !!
कुठे प्रॉस्टेट, कुठे ती दूरवरची थायरॉईड, पण गफलत झाली आहे खरी. हे वाचल्यानंतर एकाने आणि त्यावर विनोद केला,
“अरे बापरे ! या डॉक्टरांचे बोट एवढे लांब आहे काय” !!
. . .
रुग्णालयातील तातडीच्या वैद्यकीय सेवेचा विभाग नेहमीच गजबजलेला असतो. तिथे असंख्य प्रकारचे वेदनाग्रस्त रुग्ण येतात. त्यांच्या शारीरिक तपासणीबरोबर काही मूलभूत चाचण्यांची सोय तिथे केलेली असते. अशाच एका महिला रुग्णाला x-ray वगैरे तपासण्या करून काही विशेष न निघाल्याने घरी पाठवून देण्यात आले होते. त्याची डॉक्टरांनी केलेली ही नोंद :
While in the Emergency room, she was examined, x-rated and sent home.
..
बद्धकोष्ठाची समस्या तर अनेकांच्या पाचवीलाच पुजलेली असते. या विकारावर निरनिराळे उपचार करून रुग्ण देखील कंटाळलेले असतात. अशाच एक बाई डॉक्टरांकडे नियमित यायच्या. त्यातून परिचय वाढल्याने डॉक्टरनी त्यांच्याशी व्यक्तिगत स्वरूपाच्या गप्पा देखील मारल्या होत्या. एकदा त्या उपचारासाठी येऊन गेल्यानंतर डॉक्टर अवचितपणे लिहून गेले :
She stated that she had been constipated for most of her life,until
she got a divorce.
. .
मनोरुग्णांच्या नोंदींमध्ये तर अनेक उलटीपालटी वाक्ये बऱ्याचदा आढळतात. अनेक रुग्णांवर दीर्घकालीन उपचार चालू असतात. एका डॉक्टरांनी नैराश्याच्या रुग्णाबाबत केलेली ही टिपणी :
The patient has been depressed since she began seeing me in 1993.
वाक्यरचना गंडलेली .
….
रुग्णालयातील बहुतेक रुग्णांच्या भरपूर प्रयोगशाळा तपासण्या होतातच. लॅबमधून वॉर्डात रिपोर्ट आले की ज्या त्या रुग्णानुसार त्या रिपोर्टचा गोषवारा मुख्य केसपेपरमध्ये लिहिणे हा एक वेळखाऊ उद्योग असतो. एका रुग्णाच्या यकृताच्या आरोग्यासंबंधीचा टेस्ट रिपोर्ट लिहिताना हे डॉक्टर काय लिहून गेलेत बघा :
The lab test indicated abnormal lover function.
एका महत्त्वाच्या शब्दाच्या एकाच अक्षराने चुकलेल्या स्पेलिंगमुळे छानपैकी विनोद होऊन गेला खरा !
..
आणि आता शेवटी शारीरिक तंदुरुस्ती विभागात एक फेरफटका. अनेक संस्थांमधून विशिष्ट कामासाठी नेमणूक करताना शारीरिक तंदुरुस्तीचा दाखला अधिकृत रुग्णालयाकडून मिळवावा लागतो. त्यामुळे येथे येणाऱ्या लोकांमध्ये अर्थातच निरोगी लोकांचा भरणा जास्त असतो. त्यांच्या काही तपासण्या करून काही सुप्त दोष निघतोय का ते पाहणे हे डॉक्टरांचे काम. सर्व तपासण्या केल्यानंतर संबंधित व्यक्तीचा एकंदरीत आढावा घेणारा गोषवारा शेवटी लिहितात. एका मध्यमवयीन व्यक्तीच्या बाबतीत अशी नोंद केली गेली :
Patient has two teenage children, but no other abnormalities.
..
असं आहे हे गमतीदार संकलन. डॉक्टरांच्या सहकारी असलेल्या नर्सेस आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञांच्या टिपणांमध्येही अशी 'वेचक रत्ने' सापडतात - त्यांची जातकुळी थोडीफार वेगळी. कळत नकळत अशा चुका हातून होणे हा मानवी गुणधर्म आहे. इंग्लिशमधील नोंदींच्या बाबतीत वरवर पाहता असं वाटू शकेल की ती मातृभाषा नसलेल्या लोकांकडून अशा चुका होतात. परंतु असे मानणे भाबडेपणाचे ठरेल. या चुकांची व्याप्ती पाश्चात्य जगतासह अगदी जागतिक आहे ! जालावर त्याचे असंख्य नमुने वाचायला मिळतात.
संपूर्ण संगणकीकरण झालेल्या रुग्णालयांमध्ये देखील अशा नोंदींची अचूकता दाद द्यावी इतकी नाही. हस्तलेखन असो अथवा संगणक टंकन, या दोन्ही कृती करणारा शेवटी माणूसच असतो. स्पीच टायपिंगच्या वाढत्या वापरानंतर तर काही नव्या प्रकारच्या चुका आढळू लागल्यात ( बोलायला गेलो एक. . .!). जोपर्यंत अशा चुकांनी कुठल्याही निर्णय प्रक्रियेवर परिणाम झालेला नसेल तोपर्यंत काळजीचे कारण नाही. अनवधानातून अकस्मात झालेले मनोरंजन अशा दृष्टीकोनातून त्यांच्याकडे पाहता येईल.
तसंही कामाच्या व्यापतापाने शिणलेल्या मनांना अशा घटकाभर विरंगुळयाची अधूनमधून गरज देखील असते. सातत्याने होणाऱ्या काही भाषिक गफलती आणि विनोदांमधून कधीकधी बोलीभाषेला नवे वाक्प्रचारही मिळून जातात. अनेक अभ्यासक्रमांच्या लेखी व तोंडी परीक्षांदरम्यान कधीकधी भले भले विद्यार्थी सुद्धा एखादी गफलत किंवा घोडचूक करून बसतात आणि त्यानंतर दुसऱ्याच क्षणी सावरून स्वतःच्या कपाळावर हात मारून घेण्याची वेळ त्यांच्यावर येते. तणावपूर्ण वातावरणाचा तो परिणाम असतो.
वैद्यकीय वगळता अन्य कार्यक्षेत्रांमध्ये देखील या प्रकारच्या मौजमजा होत असणार. वाचकांनी त्याबद्दलचे आपापले अनुभव प्रतिसादातून लिहिल्यास लेखातून झालेले मनोरंजन द्विगुणीत होईल.
**********************************************************************
(No subject)
नवा सिस्टीम ऍडमिन कामावर
नवा सिस्टीम ऍडमिन कामावर लागला होता. त्याला सर्व्हर मेंटेनन्ससाठी तासभर बंद ठेवायचा होता. म्हणून एक मेल टाकायला सांगितली. जी मेल आली ती वाचून आम्ही हसून हसून मेलो.
Server down for one hour maintenance. Regret incontinence.
Inconvenience च्या जागी incontinence झालं होतं!
त्यानं काय टाईपलं, आणि ऑटोकरेक्टनं या महाभागाला का ही करेक्शन सुचवली भगवंतालाच (किंवा मायक्रोसॉफ्ट ऑफिसला) ठावे! बरं, भाषेची बोंबच त्यामुळे त्यानं वाचलं असलं तरी कळतेय कुठे...
कस्टमरनं उत्तरादाखल मेल पाठवली.
No diapers available here. Wrap it up quickly before it gets too wet...
खूप वर्षांपूर्वी वाचलेल्या
खूप वर्षांपूर्वी वाचलेल्या लेखातून - सुधा करमरकरांची एक अभिनेत्री मैत्रीण, " नाटकात खरंखरं रडण्याऐवजी ग्लिसरीनचे अश्रू काढ," असं म्हणत त्यांच्या खनपटीलाच बसली. त्यात ग्लिसरीन म्हणजे काय तर constitution झाल्यावर देतात ते .
धमाल... धमाल किस्से....
धमाल... धमाल किस्से....
मस्त आहेत सगळे किस्से
मस्त आहेत सगळे किस्से
(No subject)
वरील सर्व मंडळींना धन्यवाद !
वरील सर्व मंडळींना धन्यवाद !
. . .
* incontinence , constitution >>>
धमाल किस्से !
धमाल किस्से !
व्वा, धमाल किस्से आहेत सगळे.
व्वा, धमाल किस्से आहेत सगळे.
या सर्व नोंदीत सर्व डॉक्टर बरीच लघुरुपे वापरतात त्यांचा वेगळा कोश आहे का?
S/B
O/E
Ct all
FU
SOS
मायबोलीवरील लघुरुपे वापरण्यावरून आठवले.
धन्यवाद !
धन्यवाद !
* त्यांचा वेगळा कोश >>> बरेच आहेत :
https://www.asha.org/practice-portal/professional-issues/documentation-i...
ही रील पाहून हाच धागा आठवला
ही रील पाहून हाच धागा आठवला
# भावी डॉक्टर
# भावी डॉक्टर >>>
# भावी डॉक्टर >>>
हा हा ! एकदम खल्लास
मजेदार आहे हे.
मजेदार आहे हे.
कोड मध्ये अनवधानाने नाही मुद्दामुन अशा फनी कमेंट कधी कधी सापडतात.
>>>>>>>.Patient has two
>>>>>>>.Patient has two teenage children, but no other abnormalities.
मस्त किस्से आहेत एकेक.
Common typo while using MS
Common typo while using MS Teams chat
1 sex - instead of 1 sec
lick the button - instead of click the button
मजेदार कीस्से!
मजेदार कीस्से!
भारी किस्से आहेत
भारी किस्से आहेत
धन्यवाद ! * 1 sex >>>
धन्यवाद !
* 1 sex >>>
मी आधीच्या कंपनीत होतो, तिथे
मी आधीच्या कंपनीत होतो, तिथे आमचा बॉस/डायरेक्टर चांगलीच विनोदबुद्धी असलेला होता, हजरजबाबी होता (आणि ex-Navy)
तेव्हा इमेल्स सुरू झाले असले तरी विशेष प्रचलीत नव्हते.
येणारा सगळा पत्रव्यवहार सॉर्ट आऊट करून त्यातील बहुतेक सर्क्युलेशन फोल्डर मध्ये ठेवला जाई, आणि फोल्डर रोज सगळ्यांनी वाचून, वाचल्याची नोंद करायची असा नियम होता. सगळ्यात आधी बॉस कडे फोल्डर जाई, त्यावर मग तो लाल शाईत कॉमेंट्स लिहीत असे, अमुक -reply today itself, तमुक-see me with back papers, चमुक- this is not acceptable इत्यादि.
यात सेल्स,सर्व्हिस इंजिनिअर्सचे व्हिजिट रिपोर्ट्स सुद्धा असत.
एक इंजिनिअर इंदूरला गेला होता. त्याच्या व्हिजिट रिपोर्ट मध्ये ही दोन वाक्ये होती.
He was on leave today. I phoned him to his house and he agreed to come. So I mated with him in hotel.
आणि बॉसने यात mated with him ला लाल शाईने high light करून लिहिले होते. Must have been painful!
Must have been painful!
Must have been painful!
आमच्या PT सरांचा हा किस्सा.
आमच्या PT सरांचा हा किस्सा.
शी वाज लाइंग विथ मी फॉर थ्री डेज बट प्रोड्यूस नथिंग!
* mated with him
* mated with him
* लाइंग विथ मी फॉर ..
>>> आई ग ! धमालच . . .
Must have been painful!>>
Must have been painful!>>
शी वाज लाइंग विथ मी फॉर थ्री डेज बट प्रोड्यूस नथिंग!>> हे वाचून अरे भाई कहना क्या चाहते हो झालंय.
कुमार १, मस्त खुसखुशीत लेख
अरे भाई कहना क्या चाहते हो >>
अरे भाई कहना क्या चाहते हो >> अगदी अगदी.आम्हा विद्यार्थ्यांना पण समजले नाही. तेव्हा.
आता अगदी माझी स्वतःची बोष्ट;
आता अगदी माझी स्वतःची बोष्ट; चौथीत का पाचवीत असताना मला लो. टिळकांवर भाषण करायचे होते. जेव्हा माझी वेळ आली तेव्हा समोरची गर्दी बघून पाठ केलेले सगळे विसरलो. पहिलेच वाक्य असे बाहेर पडले. "आज आपण इथे जे जन्मलो आहोत..."
मस्त आहे लेख . हहापुवा झाली
मस्त आहे लेख . हहापुवा झाली वाचून
माझ्या बाबतीत कॉलेजात असताना असा एक किस्सा झालेला . कॉलेजात हजेरी लावण्यासाठी attendace sheet असे . प्रत्येक विषयाचे प्राध्यापक वर्गात आल्यावर पहिल्या बेंचवर जो विद्यार्थी / विद्यार्थिनी बसलेली असेल तिच्याकडे देत असत . त्याने /तिने आपले नाव लिहून त्यापुढे सही करायची असे .
आम्ही सगळे ग्रुपने बसत असल्याने ज्याच हातात ती sheet येई तो ग्रुपात असलेल्या सगळ्याच नावे एकदम लिहून पुढे सरकवत असे . बाकीच्यांना फक्त आपले नाव बघून सही करायची एवढेच काम असे .
एकदा मी पहिल्या बेंचवर बसल्याने शीट माझ्याकडे आली. प्रथेनुसार मी माझ्या ग्रुपत असलेल्या ५ /६ जणांची नावे लिहिली . माझ्या मैत्रिणींच नाव prajkta sarfare असे होते . मी अवधानाने prajkta sarfire असे लिहिले आणि पुढे शीट सरकवली. ते नेमके ग्रुपातील वात्रट मुलांनी बघितले आणि तिला चिडवायला सुरुवात केली वर्ग संपल्यावर . प्राजक्त त्या दिवशी थोडी उखडूनच होती माझ्यावर
छान किस्से
छान किस्से
अगदीच नव्हे पण मुद्रा राक्षसाच्या विनोदाची जातकुळी
* इथे जे जन्मलो , sarfire >>>
* इथे जे जन्मलो , sarfire >>> छान !
* मुद्रा राक्षसाच्या >>> जरा वेगळ्या शिंगांचा राक्षस म्हणूया
धन्यवाद !
बँकेत असताना महाराष्ट्राच्या
बँकेत असताना महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात बदली झाली.
ठेव पावतीची मुदत संपली होती व ती पुन्हा वाढवायची होती म्हणून एक ग्रामीण ग्राहक आले आणि माझ्या हातात पावती ठेवून म्हणाले
"हिचे दिवस भरलेत आणि तिला पलटी करायची करायची आहे"
बँकेत असताना महाराष्ट्राच्या
बँकेत असताना महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात बदली झाली.
ठेव पावतीची मुदत संपली होती व ती पुन्हा वाढवायची होती म्हणून एक ग्रामीण ग्राहक आले आणि माझ्या हातात पावती ठेवून म्हणाले
"हिचे दिवस भरलेत आणि तिला पलटी करायची करायची आहे"
(पावतीची मुदत संपल्यावर मागच्या बाजूला वाढलेल्या मुदतिची नोंद करायची असे,म्हणून पलटी)
Pages