याआधीचा भाग!
https://www.maayboli.com/node/85936
सकाळी गायत्री उठली.
तिच्यासोबत त्यालाही जाग आली होती. पण तरीही तो शांत पडून राहिला...
...त्याच्या डोक्यात विचारांचं थैमान चालू होतं.
गायत्री निघून गेली, तरीही तो पडून होता. शेवटी न राहवून तो उठला.
'रिकवरीला वेळ लागेल,' गायत्रीचे शब्द त्याला आठवले.
तो तसाच उठला. खाली आला...
...आणि सरळ बेमसेंटच्या एका कोपऱ्याजवळच्या खोलीत गेला.
तिथे एक लेदरची खुर्ची होती.
आणि समोर एक पुरुषाचा सहा फूट उंचीचा भलंमोठं फोटो होता...
...पूर्ण...
पायापासून ते डोक्यावरच्या टोपीपर्यंत...
...त्याने आकाशी शर्ट आणि शेवाळी पँट घातलेली होती. पोट अक्षरशः खाली लोंबत होतं, आणि कंबरेच्या खाली चरबी लोंबत होती. लाल काळे स्पोर्ट्स शुज झिजले होते. फुगलेल्या चेहऱ्यात अतिशय बारीक डोळे, राखाडी टोपी आणि त्यावर एक बारीक काडी असलेला चष्मा त्याच्या अवतारात भर घालत होता...
त्याखाली लिहिलेलं होतं.
मनिष - १९८७-२०१५.
...तो त्या फोटोकडे बघत राहिला. कितीतरी वेळ.
"...मी याच्याशी लढू शकतो, याला संपवू शकतो, तर जगातल्या कुठल्याही ताकदीशी लढू शकतो..."
प्रचंड संतापाने तो उठला. आणि तिरमीरीत बाहेर आला.
... बेसमेंटच्या बाजूला त्याने जिम बनवलं होतं. जवळजवळ तीन हजार स्क्वेअर फुटांचा एरिया त्याने व्यापला होता.
त्याने टी शर्ट काढून फेकला...
...समोर चाळीस किलोचे दोन डंबेल होते.
...त्याने ते उचलले व तो बायसेप कर्ल मारू लागला.
पुढचा दीड तास त्याने जिममध्ये घालवला.
त्याचा थकवा, त्याच्या जखमा यांचा त्याला पूर्णपणे विसर पडला होता...
तो वर गेला, आणि सरळ विक्रमादित्यच्या खोलीत गेला.
तो शांत झोपलेला होता.
त्याने त्याच्या केसांमध्ये हात फिरवला.
तेवढ्याने देखील विक्रमला जाग आली.
"बाबा..." तो डोळे चोळत उठला.
"झोप अजून थोडावेळ राजा."
"नाही. नको. तो उठून बसला."
"बाबा मला स्वप्नात ना, प्लेन दिसलं. त्यात तुम्ही मी आणि ममा खूप उंच उडालो... खूप उंच."
"मोठं प्लेन होतं की छोटं?"
"अहो तुमचं प्लेन..."
"...अच्छा. चल मग आज तुला प्लेन दाखवतो. आपल्या बंगल्याजवळच आहे ना."
तो उत्साहाने उठून बसला.
"चलो." तो ओरडलाच.
मनू आणि तो सोबतच निघाले...
...कॉकपिटमध्ये दोघेजण बसले होते.
विक्रमचे प्रश्न चालू होते, मनू त्याला उत्तरे देत होता.
"चल विक्रम, ममा येईल. लेट मी कुक ब्रेकफास्ट फॉर अस."
"मला भूक नाहीये."
"तरीही खावं लागेल. स्ट्राँग व्हायचय ना?"
"तुमच्यासारखं?"
"नाही."
"मग?"
"तुझ्या ममासारखं." तो अभिमानाने उद्गारला.
...ते दोघेजण बंगल्याकडे परत निघाले.
"विक्रम. येईलच ममा इतक्यात, तू इथेच थांब. मी ब्रेकफास्ट बनवतो."
"ओके बाबा."
"तो आत किचनमध्ये गेला... तिथेच चीलरमधून दहा मीलीची एक सिरींज आणि एकवीस गेजची निडल घेतली. एक अंपुल तोडली... त्यातील लाल द्रव सिरिंजमध्ये भरलं, आणि ती सिरिंज मांडीत खुपसली..."
पाच मिली... त्याच्या शरीरात गेलं...
तो थोडावेळ सुन्न झाला.
...भानावर येऊन आणि त्याने ब्रेकफास्ट बनवायला सुरुवात केली...
...पोहे आणि त्याच्यासाठी एक पूर्ण चिकन ब्रेस्ट, एवढाच नाश्ता त्यांच्यासाठी पुरेसा होता.
तेवढ्यात त्याला गायत्रीचा आवाज ऐकू आला.
गायत्री परत आली. आज तिने स्वतःहून जिमला सुट्टी घेतली होती.
"ममा..."
विक्रम तिच्या समोर आला.
"बेबी केव्हा उठलास तू?"
"खूप वेळ झाला. मग मी आणि बाबा मस्त राऊंड मारून आलो. बाबांनी मला प्लेन दाखवलं..."
"...मनू उठला?"
"हो."
"तू जेव्हा गाडी स्टार्ट केलीस, तेव्हाच मी उठलो होतो." मनू तिकडून येत म्हणाला.
ती हसली.
"सहज सकाळी राईड करून आले."
तो तिच्या कानाजवळ आला.
"गन कॅरी करत जा." अतिशय हळू आवाजात तो म्हणाला.
'उजव्या बाजूला पोटाला हात लावून बघ." तीदेखील तितक्याच हळू आवाजात म्हणाली.
...तो हसला, आणि तीदेखील.
"आता राजा विक्रमादित्य ब्रेकफास्ट करणार आहे, आणि त्याची ममादेखील. ओके? चलो डायनिंग टेबलपे." त्याने विक्रमला उचलून घेतले, आणि ते टेबलावर आले.
"गायत्री, गांधीनगरला दोन वाजता प्लेन येईल." खाताना तो सांगत होता. "मिहिर आणि आर्या तीन वाजेपर्यंत पोहोचतील."
"मी सकाळी साक्षीबरोबर एक क्विक मीटिंग करून घेते, त्यानंतर एक मायनर सर्जरी आहे ती करून घेईल."
"डन..."
"मनू..."
"बोल ना."
"मी मराईमलाईनगर, सांगारेड्डी, कुंबलगोडू, जिगनी, काळकुट्टम आणि नरसिंम्हानायकनपलायम या सहा ठिकाणी जागा अक्वायर करतेय. टोटल पाचशे एकर. तुला ब्रिफिंग देऊ?"
"आय हॅव झिरो स्टेक इन प्राजक्ता एंटरप्रायजेस गायत्री. इट्स युवर बिजनेस. पण आय नो, जो निर्णय तू घेशील, तो बेस्टच असेल. बरोबर ना विक्रम?"
"येस बाबा. ममा बेस्ट आहे."
"गुड बॉय. आय एम डन." त्याने प्लेटमध्ये चमचा ठेवला.
"मी टू." विक्रमदेखील म्हणाला.
"संपव पूर्ण. काय मी टू?" गायत्रीने त्याला दरडावले.
"पोह्यांमध्ये कुणी इतके पीनट टाकतं का? चावून चावून तोंड दुखतं माझं."
"तुझ्या बाबांना सांग. स्वतः मस्त एक चिकन ब्रेस्ट एन्जॉय करून मोकळे झाले."
"नॉट डन बाबा."
"ओ ममाज बॉय. संपवा ते."
विक्रमने नाईलाजाने पुन्हा चमचा हातात घेतला.
गायत्री थोड्यावेळाने उठली, व तिच्या बेडरूममध्ये गेली.
ब्लू जीन्स, आणि एक क्लासिक व्हाईट शर्ट, रेड शूज घालून ती पुढच्या दहा मिनिटात रेडी देखील झाली, आणि तिने साक्षीला एक मेसेज टाकला.
तशीच ती खाली आली...
"...सी या बेबी." तिने विक्रमला जवळ घेतले.
"मी टू." मनूने दोघानाही मिठी मारली.
गायत्री आली तशी निघूनही गेली.
"विक्रम, आज मी दिवसभर घरी असेन. पण खूप मीटिंग आहेत, सो तुला एक छान ऑप्शन देऊ?"
"येस."
"पीएस सिक्सवर नवीन स्पायडरमॅनचा गेम टाकलाय."
"खरंच?"
"हो. जा पळ."
विक्रम पळतच त्याच्या रूममध्ये गेला.
त्याने एक बटनांचा फोन काढला, काही मेसेज टाईप केले...
...अमितसर तेवढ्यात आत आले.
"अमित सर..." गुड मॉर्निंग.
"खुर्चीवर बस आधी." ते म्हणाले.
"काय झालं?"
त्यांनी त्यांचा फोन काढला, व त्याच्या समोर धरला.
"तुझ्या कालच्या लँडिंगमुळे होम मिनिस्टरचे चार कॉल येऊन गेले." ते म्हणाले.
"त्याला पाच कोटी द्या, आणि गप्प बसवा."
"नंबर बघ ना आधी."
"मयुरभाई पटेल... चार कॉल. सेंट्रल होम मिनिस्टर."
"कॉल करा." तो शांतपणे म्हणाला.
अमित सरांनी कॉल लावला.
...तिकडची व्यक्ती बराच वेळ बोलत होती.
हा शांतपणे ऐकत होता.
"आता मी बोलू?" याच्या आवाजात जरब होती...
"महाराष्ट्रात पाच महिन्यांनी निवडणुका आहेत. तीनशे चाळीस जागांपैकी तुम्ही एकशे साठ जागा लढणार आहात. तुम्ही वेळेवर फंड मागायला याल. मी कसं अरेंज करू?
त्या विमानात दोन हजार कोटी, निव्वळ कॅश होती... फक्त निवडणुकांच्या फंड साठी... किंबहुना फक्त जनता कल्याण पक्षाच्या फंडिंग साठी..."
इकडे अमित सरांनी आ वासला.
"...आणि मला कुठलीही रिस्क नकोय. म्हणून आय वॉन्ट फ्री हॅण्ड इन लँडिंग. ते एअर मूव्हमेंट वगेरे सगळं मी मॅनेज करेन. आणि हो, पैसे पोहोचवले जातील तुम्हाला. लवकरच."
त्याने उत्तराची अपेक्षा न ठेवता फोन कट केला.
"दोन हजार कोटी?" अमित सर म्हणाले.
"येस."
"कसं मॅनेज करणार?"
"...बघू."
"प्लेनमध्ये पैसे नव्हते. मला माहितीये."
"हो नव्हते."
"मग?"
"इफेड्रीन... एक टन..."
अमित सर त्याच्याकडे बघत राहिले.
"व्हॉट अबाऊट मोक्ष शेलार."
"तो अजिबात अप्रोचेबल नाहीये."
"मला तो कुठल्याही परिस्थितीत इथे हवाय..."
"तो येणार नाही असं मी कुठे म्हटलो." अमित सर म्हणाले.
"म्हणजे?"
"म्हणजे, तो तुझ्या पार्टीला हजर असेल."
"वेल डन सर."
"गायत्री. वेल डन गायत्री."
त्याच्या चेहऱ्यावर हसू पसरलं.
"गाड्या आल्या?"
"तासाभरात हजर होतील."
"तरनला सगळ्या गाड्या घेऊन गांधीनगरला पाठवा गायत्रीसोबत. कबीर निघाला?"
"इतक्यातच निघालाय."
"बरं. रितू? ओम?"
"वी आर ऑलरेडी हियर..."
...त्याची बहीण समोरच उभी होती...
साडेपाच फूट उंच उंची, गोल चेहरा, गोरा रंग...
...आणि सोबत तिचा नवरादेखील होता...
"माय सिस्टर!" तो उठला...
"दादू..." ती त्याला येऊन बिलगली.
"काय अवस्था करून घेतलीय स्वतःची? चेहरा बघ तुझा..."
"...आता बॉक्सिंगचा शौक चढलाय साहेबाना..." अमित सर म्हणाले.
"गायत्री काही बोलत नाही का? येऊ दे तिला. एवढा चांगला भाऊ तिच्या हवाली केलाय मी."
"हो तुम्ही दोघीजणी भांडा, किंबहुना तू आर्यालादेखील तुझ्या साईडला घेऊ शकतेस."
"तीसुद्धा येतेय?"
"मिहिरसुद्धा!"
"बापरे... दादू त्यांची नवीन मूव्ही, १५ ऑगस्टला रिलीज झाली, अजूनही क्रेझ कमी नाही झालेली त्याची."
"हो ना. बरं ओम?"
"दादा नमस्कार." तो समोर आला.
"बसा दोघेजण. यांच्या बॅग्स वर ठेवा रे."
"दादा मला तो शेवटचा रूम हवाय यावेळी. तुझ्या मास्टर बेडरूम शेजारचा..."
"ऐकलं ना?" बॅग्स तिथेच ठेवायच्या आहेत.
"थॅन्क्स दादुस."
"काय म्हणतय एलए बाकी?"
"फर्स्ट क्लास..."
"आयटी आणि इंवेस्टमेंट फर्म, डेडली कॉम्बिनेशन आहे."
"लाईक यू आणि गायत्री." रितू म्हणाली.
तो हसला. "जेवण झालं?"
"कशाच? मुंबईहून ट्रॅव्हल करून आलो आम्ही, रस्त्यात कुठेही थांबलो नाही."
"...जेवण करून घ्या आधी."
"डन. आधी आम्हाला फ्रेश होऊ दे." ती म्हणाली.
"होय. बरं ओम, कॅलिफोर्निया गव्हर्नर इलेक्शन विषयी तुझं काय मत आहे?"
"मला असं वाटतं, की सिनियर राजाध्यक्ष उभे राहतील यावेळी."
"व्हॉट अबाऊट ज्युनियर राजाध्यक्ष?" तो म्हणाला.
ओम चमकला...
"थिंक ओवर इट... जर ओम राजाध्यक्ष उभा राहिलाच, तर संपूर्ण कॅम्पेनचा खर्च मी करेन. थिंक."
"...अरे आल्या आल्या काय बिजनेस आणि पॉलिटिक्स. दादा. थोडी तरी विश्रांती घे रे."
"तुम्ही जेवण करा आणि आराम करा. संध्याकाळी बोलू निवांत. ओके?"
"ओके दादू."
तो थोडावेळ बसला असेल, तेव्हाच कबीरचा फोन आला.
"अण्णा, हम निकल रहे."
"हळू ये."
"हा."
तरनचा फोनदेखील तेव्हाच आला.
"दादा, निघालो सगळे."
"गुड."
आज तो आणि गायत्री फक्त अरेंजमेंटमध्ये व्यस्त होते.
तो एका ठिकाणाहून मॅनेज करत होता, पण गायत्री मात्र भिंगरीसारखी धावत होती.
बऱ्याच गोष्टी त्याला एकाच वेळी जुळवून आणायच्या होत्या.
एका महानाट्याचा तो शेवटचा अंक रचत होता.
*****
त्याची आई आणि बाबा त्याच्या समोर उभे होते.
अजूनही गायत्री आलेली नव्हती.
तो उठला, आणि त्याने त्याच्या आईला मिठी मारली...
...त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते. कुणालाही कारण समजत नव्हतं.
"बाबा. मला आईशी बोलायचंय थोडावेळ."
ते आताच आले होते तरीही त्याला धीर नव्हता.
"तुम्ही जा वर, रितूला भेटा, मी आलेच."
त्याचे बाबा वर निघून गेले.
ते दोघेजण आतल्या रूममध्ये आले.
बोल काय झालं?
तो ढसाढसा रडला...
...असाच कित्येक वर्षांपूर्वी तो नरक चतुर्दशीच्या दिवशी रडला होता.
त्याचा आईला घट्ट मिठीत मारून...
...शांत हो. काय झालं?
"एकच सांगायचंय."
"सांग..."
"आई जर मी सांगितलं, हे सगळं साम्राज्य मी जगातल्या सगळ्यात वाईट मार्गाने कमवलं आहे तर?"
ती शांत राहिली.
"मुलींचा व्यवहार तर नाही केला ना?" तिने विचारले.
"नाही. ते नाही..."
"मग आता मला काहीही सांगू नकोस."
आई?
"तुम्हाला असं वाटतं, आई बाबा मूर्ख असतात. त्यांना काही कळत नाही. इतक्या कमी वयात एवढं उभं करणं सरळ मार्गाने शक्य नाही, हे लहान मुलाला देखील कळतं.'
"...आई मी...'
"गप्प बस. तुझी आई आहे मी. तू काय आहेस, कोण आहेस, हे सगळं माहितीये मला. एक सांगते, आजपर्यंत मी देवाकडे एकच मागितलं आहे, माझा मुलगा फक्त जिवंत रहावा...
...दहा वर्षांपूर्वी हेच मागितलं होतं. आजही हे मागतेय.
मनू... तुझी सगळी पापे मी स्वतःच्या उरावर घेतेय. या क्षणापासून. असं समज तू रावण होतास, आणि जे केलं, ते सगळं त्याच्या आईसाठी केलं.
नो मोअर रीग्रेट्स... नी मोअर सफरिंग. तू काहीही असू दे, कसाही असू दे... तू माझा मुलगा असशील. ओके?"
त्याच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं ओझं उतरल्यासारखं झालं.
तेवढ्यात त्याला मेसेज आला.
"वी आर हीयर." गायत्रीचा मेसेज आला.
"गायत्री आली." तो म्हणाला.
"बोलावून घे तिला थोडावेळ इकडे." त्याची आई म्हणाली.
त्याने गायत्रीला फोन लावला. पुढच्या दोन मिनिटात ती हजर झाली.
"गायत्री, तुझ्या नवऱ्याला सांभाळ. लहान मुलासारखा रडत होता माझ्याकडे. आल्यावर आराम सुद्धा करू दिला नाही. मी जातेय."
त्याची आई निघूनसुद्धा गेली.
"काय झालं." गायत्रीने विचारले?
"तिला सगळं माहितीये गायत्री." तो म्हणाला.
"मी वर्षभरापूर्वीच सांगितलं होतं..."
तिने बॉम्ब टाकला.
त्याने फक्त तिच्याकडे बघितले...
"...कधी ना कधी तू तुटशिल, तुला सगळं असह्य होईल, आणि तू काहीही न विचार करता सगळं सांगशील. त्यावेळी समोरची व्यक्ती ती सहन करू शकेल की नाही हेसुद्धा आपल्याला माहिती नसतं...
...म्हणून मी आधीच तयारी केली होती मनू. तू प्लेन उडवशील, जग जिंकशील, पण सॉफ्ट लँडिंगसाठी मलाच ग्राउंड तयार ठेवावं लागेल."
त्याच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते.
"तू माझा आहेस मनू." तिने त्याला पोटाशी कवटाळले.
हळूहळू संध्याकाळ होत होती, लक्ष्मीपूजनाची वेळ जवळ येत होती.
...आणि त्याचा वाढदिवसदेखील...
क्रमशः
मस्त!!!
मस्त!!!
मागील भागातला ब्रेकफास्टचा प्रसंग या भागात पुन्हा टाकलाय... मुद्दामहून की नकळत..
तसा फ्लो मध्ये काही फरक पडला नाही त्याने..!!
@आबा - धन्यवाद!
@आबा - धन्यवाद!
तो मुद्दाम टाकला, कारण मागचा भाग गायत्रीचा होता, तर हा भाग मनूचा
पण दोघंही थोडा वेळ एकत्र होते, सो दोन्ही भागात टाकला.
हा भाग चांगला जमला आहे. खास
हा भाग चांगला जमला आहे. खास अज्ञातवासी स्टाइल. ही खरी खऱ्या अज्ञातवासीची कथा.
ओके, आल लक्षात
ओके, आलं लक्षात
वेगवान कथानक
वेगवान कथानक
इंटरेस्टिंग आहे
वाचतोय
पूर्ण करा ही नम्र विनंती
अजून एक विनंती.
पात्रं कोणाची कोण नावासहीत एकदा लिहिता का?
लिंक लागायला सोप्प