©सर्व हक्क लेखकास्वाधीन.
याधीचा भाग - https://www.maayboli.com/node/85935
सकाळी साडेपाच वाजता ती उठली.
शार्प साडेपाच.
मनू तिच्या शेजारीच होता. शांत झोपलेला.
ती तशीच बाथरूम मध्ये गेली, आणि शॉवर चालू केला...
...बॉडीवॉशने तिला काही ठिकाणी चुरचुरलं, आणि तिला कालच्या रात्रीची जाणीव झाली.
...ती स्वतःशीच हसली...
अंघोळ करून तिने ट्रॅकसुट चढवला. वर लेदर जॅकेट देखील.
केस मोकळेच होते, किंबहुना तिला तसेच आवडत असत.
तिने हेल्मेट घेतलं, आणि ती बाहेर आली, बंगल्याच्या डाव्या बाजूला ती गेली, तिथून एका बाईकवरचा कपडा काढून बाजूला ठेवला...
...हार्ले डेव्हिडसनवर स्वार होऊन ती निघाली.
रस्त्यावर अतिशय तुरळक गर्दी होती. एखादा बघणारा कुतूहलाने तिच्याकडे बघत होते.
ती सरळ मुंबई आग्रा हायवेला निघाली, रस्त्यात एक डांबरी आडवाट पकडली.
गेट खोलो... ती समोर येताच एक सिक्युरिटी ओरडला आणि धावतच समोर येऊन त्याने सलाम ठोकला...
...ती सरळ वरवर जात निघाली... एक डोंगरातून ती वाट वर जात होती.
...ती सगळ्यात वर पोहोचली... वर एक छोटेखानी बंगला होता.
... तिने गाडी पार्क केली. व हाताची घडी घालून निश्चल उभी राहिली...
सकाळचा मंद वारा सुटला होता, वाऱ्यावर तिचे केस हळूवार उडत होते... सूर्याची पहिली किरणे तिच्या लांब केसांना सोनेरी झळाळी प्राप्त करून देत होती.
गौरकांती असलेली ती सूर्यकिरणांत अक्षरशः सोनेरी दिसत होती... तिच्या नितळ, निखळ त्वचेवर किरणे मनसोक्त वर्षाव करत होते.
तिचे राखाडी डोळे समोर रोखले गेले होते... संपूर्ण नाशिक ती न्याहाळत होती.
...' प्राजक्ता ' नावाची अतिभव्य बिल्डिंग इतक्या लांबूनही स्पष्ट दिसत होती.
...गायत्री खरोखरच जगातील सगळ्यात सुंदर मुलगी होती.
*****
ती परत आली. आज तिने स्वतःहून जिमला सुट्टी घेतली होती.
"ममा..."
विक्रम तिच्या समोर आला.
"बेबी केव्हा उठलास तू?"
"खूप वेळ झाला. मग मी आणि बाबा मस्त राऊंड मारून आलो. बाबांनी मला प्लेन दाखवलं..."
"...मनू उठला?"
"हो."
"तू जेव्हा गाडी स्टार्ट केलीस, तेव्हाच मी उठलो होतो." मनू तिकडून येत म्हणाला.
ती हसली.
सहज सकाळी राईड करून आले.
तो तिच्या कानाजवळ आला.
"गन कॅरी करत जा." अतिशय हळू आवाजात तो म्हणाला.
"उजव्या बाजूला पोटाला हात लावून बघ." तीदेखील तितक्याच हळू आवाजात म्हणाली.
...तो हसला, आणि तीदेखील.
"आता राजा विक्रमादित्य ब्रेकफास्ट करणार आहे, आणि त्याची ममादेखील. ओके? चलो डायनिंग टेबलपे." त्याने विक्रमला उचलून घेतले, आणि ते टेबलावर आले.
"गायत्री, ओझरला दोन वाजता प्लेन येईल. खाताना तो सांगत होता. मिहिर आणि आर्या तीन वाजेपर्यंत पोहोचतील."
"मी सकाळी साक्षीबरोबर एक क्विक मीटिंग करून घेते, त्यानंतर एक मायनर सर्जरी आहे ती करून घेईल."
"डन..."
"...मनू..."
"बोल ना."
"मी मराईमलाईनगर, सांगारेड्डी, कुंबलगोडू, जिगनी, काळकुट्टम आणि नरसिंम्हानायकनपलायम या सहा ठिकाणी जागा अक्वायर करतेय. टोटल पाचशे एकर. तुला ब्रिफिंग देऊ?"
"आय हॅव झिरो स्टेक इन प्राजक्ता एंटरप्रायजेस." तो थांबला.
"इट्स युवर बिजनेस. पण आय नो, जो निर्णय तू घेशील, तो बेस्टच असेल. बरोबर ना विक्रम?"
"येस बाबा. ममा बेस्ट आहे."
"गुड बॉय. आय एम डन. त्याने प्लेटमध्ये चमचा ठेवला."
"मी टू." विक्रमदेखील म्हणाला.
"संपव पूर्ण. काय मी टू?" गायत्रीने त्याला दरडावले.
"पोह्यांमध्ये कुणी इतके पीनट टाकतं का? चावून चावून तोंड दुखतं माझं."
"तुझ्या बाबांना सांग. स्वतः मस्त एक चिकन ब्रेस्ट एन्जॉय करून मोकळे झाले."
"नॉट डन बाबा."
"ओ ममाज बॉय. संपवा ते."
विक्रमने नाईलाजाने पुन्हा चमचा हातात घेतला.
गायत्री थोड्यावेळाने उठली, व तिच्या बेडरूममध्ये गेली.
ब्लू जीन्स, आणि एक क्लासिक व्हाईट शर्ट, रेड शूज घालून ती पुढच्या दहा मिनिटात रेडी देखील झाली, आणि तिने साक्षीला एक मेसेज टाकला.
तशीच ती खाली आली...
"...सी या बेबी." तिने विक्रमला जवळ घेतले.
"मी टू." मनूने दोघानाही मिठी मारली.
"निर्भय." बाहेर जाताच तिने आवाज दिला...
"...जी भाभीजी."
"चावी. आज मी स्वतः ड्राईव्ह करणार आहे."
त्याने निमूटपणे चावी तिच्या हातात सोपवली.
थोड्याच वेळात ती भरधाव वेगाने निघून ऑफिसला पोहोचली देखील...
...' प्राजक्ता ' तिने पुन्हा एकदा नाव बघितलं, मात्र आता ते नाव आभाळाला टेकलेलं वाटत होतं.
नाशिकमधील सगळ्यात उंच टॉवर...
...प्राजक्ता एंटरप्रायजेसच हेडक्वार्टर...
आज जवळजवळ ऑफिस रिकाम होतं. दिवाळीच्या सुट्टीमुळे, हे तिला जाणवलं. अतिशय तुरळक लोक ऑफिसमध्ये होते. तिला बघून अलर्ट होत होते. काही सिनियर मंडळी गुड मॉर्निंग म्हणून अभिवादन करत होती. ती हसून प्रतिसाद देत होती.
तिच्या केबिनमध्ये येऊन ती बसली. तेवढ्यात एक स्त्री लगबगीने आत आली.
"मॅडम ग्रीन टी?"
"येस. थॅन्क्स." ती म्हणाली.
थोड्याच वेळात एक गरम कप तिच्या हातात होता, आणि ती संपूर्ण नाशिक बघत होती.
"मे आय कम इन? आवाजाने तिची तंद्री भंगली."
"साक्षी. यू डोन्ट निड टू आस्क."
"आय नो गायत्री."
"आफ्टर ऑल, आय वॉज युवर असिस्टंट... यू वेर माय फर्स्ट बॉस..."
"कम ऑन गायत्री, एमआरव्ही सरांची ती सगळ्यात वाईट ट्रीक होती."
गायत्री हसली.
"आज रात्री आठ वाजता पार्टी आहे, लक्षात आहे ना?"
"कशी विसरेन?"
"एक रिक्वेस्ट होती."
"रिक्वेस्ट?"
"येस. शरावतीलाही तू सोबत आणावंस, अशी मनूची इच्छा आहे."
साक्षी शांत राहिली.
गायत्री तिच्याकडे रोखून बघत होती.
"...आणि तुझी?" तिने गायत्रीला विचारले.
"माझ्या हजबंडचा आज चाळीसावा बर्थडे आहे. सो..."
"सो?"
"त्याच्या कुठल्याही इच्छेला मी नाही म्हणू शकत नाही." गायत्री स्मितहास्य करत म्हणाली.
"यू आर इम्पोसीबल." साक्षीचं आश्चर्य लपत नव्हतं.
"आय नो." गायत्री पुन्हा हसली. "नाऊ बॅक टू बिजनेस. तुझा जागा अक्वायर करण्याचा प्लॅन मनूने अप्रूव केलाय."
"माहिती होतं मला, साऊथ इंडिया म्हटल्यावर ते एका पायावर तयार होतील."
"आपला बेसच तो झालाय, म्हणून दिवाळीनंतर तू बेंगलोरला जाऊन तिथून सुरुवात कर..."
"लगेच?"
"हो लगेच. बेंगलोर इजी आहे... तिथे काम लगेच होईल."
"हमम. तुझं घरच आहे ना ते."
"नाही. माझं घर नाशिक आहे. तुझ्या टेबलवर एक फाईल ठेवलीय. आय होप तिची तुला मदत होईल. ऑल द बेस्ट साक्षी."
गायत्री उभी राहिली.
साक्षी देखील.
"तिच्या हजबंडला देखील घेऊन ये. मनू वॉन्टस टू मीट हिम."
"हे प्रॉमिस मी नाही करणार..."
"गेट इट डन साक्षी. तुझे जिजू तुझं नक्की ऐकतील. सी या." ती तिथून निघून गेली.
"बाय गायत्री." साक्षी म्हणाली.
*****
गायत्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल.
तिने ग्लोवज चढवले. मास्क लावलं.
समोर पेशंट बेशुद्ध पडलेलं होतं.
अतिशय सराईतपणे तिचे हात फिरू लागले.
'वन ऑफ द बेस्ट सर्जन इन इंडिया.' असं तिला का म्हणतात याच प्रात्यक्षिक ती दाखवत होती.
एकेकाळी दिवसाला चार सर्जरी करणारी गायत्री...
...कामाचा व्याप वाढला तरीही तिने प्रॅक्टिस थांबवली नव्हती.
प्राजक्ता इंटरप्रायजेसची एमडी असूनही तिचं हे काम अव्याहत सुरू होतं.
पाऊण तासात ती बाहेर आली, आणि सरळ तिच्या रूममध्ये गेली.
आज शॉवर घेण्याची तिची ही दुसरी वेळ होती.
*****
गांधीनगर! तिच्या मोबाईलवर मेसेज वाजला.
गुड. कारण आता ती सरळ धावपट्टीवर गाडी घेऊ शकत होती...
...तिचे अप्पा आणि अम्मा आज येणार होते, थोड्याच वेळात पोहोचणार होते.
गांधीनगर धावपट्टी तशीही वापरात नव्हती. पण तिचे कॉन्टॅक्टस वापरून तिने ती वापरात आणली होती...
...तेवढ्यात तिचा फोन वाजला.
"भाभीजी हम लोग पोहोच रहे हैं." तरन तिकडून म्हणाला.
"हो." मीही निघालेय.
तिने फोन ठेवला, आणि कबीरला लावला.
"कबीर."
"हॅलो दीदी."
"कुठे पोहोचलास?"
"पिंपळगाव बसवंत पाच मिनिटात येईल."
"ओके. आई बाबांची तयारी झालीय ना."
"रेडी आहेत... सकाळपासून."
"गुड. बाय..."
तिने फोन कट केला, पुढचा फोन लावला.
तो फोन लागला नाही.
अजून एक नंबर तिने डायल केला, तोही फोन लागला नाही.
तिच्या कपाळावर सूक्ष्म आठी उमटली.
ती थोड्याच वेळात गांधीनगरला पोहोचली.
पुढच्या पाच मिनिटात दहा बारा गाड्या तिथे पोहोचल्या, व ओळीने उभ्या राहिल्या.
रायफल घेऊन सुसज्ज अशी फौज तिथे उतरली.
तरन सगळ्यात समोर उभा होता.
"भाभी. चीफ मिनिस्टर विदाऊट सिक्युरिटी येतायेत. म्हणून दादांनी आपली सिक्युरिटी तैनात करायला लावली आहे."
"ओके. छत्री आहे?"
"काय?"
"छत्री आहे का?"
"हो आहे ना."
"दे मला."
तरनने छत्री आणून दिली.
तिने छत्री उघडली, व सनग्लासेस चढवले.
"भाभी."
"बोल ना तरन."
"आपको रोल्स रॉइस लेनी चाहिए."
"का रे."
"तिच्यात छत्रीसाठी स्पेशल जागा असते."
ती खळखळून हसली.
"...तुझ्या लोकांना सांग, अप्पा आल्यावर अजिबात हवेत गोळीबार करायचा नाही. थोडं सोफिस्टीकेटेड वागा."
"... सूनो सब लोग."
"जी तरनभैया."
"किसी ने भी हवामे गोली चलाई. तो मैं दुसरी गोली सीधा उसके सिरमे दाग दुंगा. ओके?"
"ओके भैया. लोक त्याच उत्साहात म्हणाले."
"एक मिनिट." गायत्री म्हणाली.
"काय."
"ह्या सगळ्या गाड्या नव्या आहेत. इतक्या डिफेंडर कुठून आल्या?" गायत्रीने विचारले.
कुणी काहीही बोललं नाही.
"दादांनी राईट?" तिनेच विचारले.
"हा भाभी."
"गिफ्ट दिल्या?"
"हा भाभी."
"मग आधी तुमच्या बायकांकडून नीट पूजा तरी करून घ्यायची, सरळ इकडे आलात?"
"दादांनीच सांगितलं."
"काय सांगितलं?"
"की या गाड्या आधी गायत्रीच्या सोबत राहतील, आणि मगच यांची पूजा होईल."
...ती निःशब्द झाली.
"...अजून एक. रितूदीदी आणि ओमभैया. पोहोचलेत." तरनने तिला माहिती पुरवली.
म्हणूनच तिचा फोन बंद येत होता. तिने स्वतःशीच विचार केला.
...आणि तेवढ्यात आकाशातून एक प्लेन जमिनीवर उतरलं.
सर्वजण ताबडतोब गाडीत बसले, व सुसाट वेगाने गाड्या निघाल्यादेखील.
छोटेखानी विमानाचा दरवाजा उघडला गेला, व त्यातून एक प्रौढ जोडपं बाहेर पडलं...
...सिके शिवराजकुमार आणि वंदना शिवराजकुमार...
सहा महिन्यापूर्वी कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली होती...
...मात्र त्यांच्या मागे एक तरुण जोडपं देखील उतरलं.
एक उंचापुरा पुरुष, त्यानेदेखील मनुसारखेच केस कुरळे केले होते, आणि मनूसारखीच फिजिक बनवली होती.
पीपल मॅगझिनचा तो करंट सेक्सियस्ट मॅन अलाइव्ह होता...
...एवढंच त्याचं वर्णन पुरेसं होतं.
आणि त्याच्याबरोबर असणारी स्त्री...
...थोडीशी कमी उंचीची, पण गायत्रीची बहीण शोभावी अशी.
मात्र दोघींमध्ये फरकही होता.
गायत्री गंभीर होती, तर ती अवखळ वाटत होती.
गायत्रीचा चेहरा करारी होता, तर तिचा निष्पाप.
गायत्री जास्तीत जास्त स्मितहास्य करायची, मात्र ती खळखळून हसायची...
...गायत्रीला बघताच ती अप्राप्य असल्याची जाणीव व्हायची.
...मात्र ती सगळ्यांना हवीहवीशी वाटायची...
"सिरीयसली?" गायत्रीच्या तोंडून शब्द बाहेर पडले.
"हॅलो भाभी." तो पुरुष म्हणाला.
त्याचं नाव मिहिर पाटील...
त्याला द काँकरर असं टोपण नाव पडलं होतं.
आणि तिचं नाव होतं आर्या.
ते खाली उतरले.
गायत्रीच्या आईने तिला घट्ट मिठी मारली.
...आणि आर्याने देखील...
तिचा संपूर्ण परिवार आज तिच्या सोबत होता.
...आणि न राहवून आकाशात शेवटी गोळ्या चालवल्या गेल्याच.
क्रमशः
हा भाग पण छान !
हा भाग पण छान !