शशक लेखन स्पर्धा- अंत: अस्ति प्रारंभ: ३: संयम

Submitted by संयोजक on 11 September, 2024 - 02:11

नमस्कार मायबोलीकर,

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गणेशोत्सवात शशक पूर्ण करा हा आवडता उपक्रम आहेच पण यावर्षी त्यात एक ट्विस्ट आहे.

अंतापासूनच एक नवी सुरुवात होतेच ना! तर यावर्षी एका गोष्टीचा शेवट आम्ही देणार आहोत आणि तुम्हाला त्या कथेचा पूर्वार्ध तुमच्या कल्पनाशक्तीने पूर्ण करायचा आहे, आणि तुमच्या कथेला साजेसे शीर्षक द्यायचे आहे. यावर्षी शशक हा उपक्रम नसून स्पर्धा आहे.

कथेचा शेवट खालीलप्रमाणे आहे.

"खाण्यासाठी जन्म आहे का बयो? संयम असावा जरा !"

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पुढील गोष्टी लक्षात घ्या :

१. प्रवेशिका पाठवण्याकरिता 'मायबोली गणेशोत्सव २०२४' या ग्रूपचे सदस्य असणे आवश्यक आहे. हा ग्रूप सदस्य नोंदणीकरता ७ सप्टेंबरला खुला करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.
२. 'मायबोली गणेशोत्सव २०२४' ह्या ग्रूपचे सदस्यत्व घेण्यासाठी या पानाच्या उजवीकडे दिसणाऱ्या 'मायबोली गणेशोत्सव २०२४' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा. नंतर 'सामील व्हा' या शब्दांवर टिचकी मारा.
३. याच ग्रूपमध्ये उजवीकडे 'नवीन लेखनाचा धागा' या शब्दांवर टिचकी मारा. (गणेशोत्सव २०२४ ग्रूप मधले गप्पांचे पान, नवीन कार्यक्रम हे पर्याय वापरायचे नाहीत).
४. प्रवेशिकेचे शीर्षक पुढील प्रकारे द्यावे - "अंत: अस्ति प्रारंभ: - १ - {कथेचे शीर्षक } - {तुमचा आयडी}"
५. प्रवेशिका ०७ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर २०२४ या वेळेत पाठवता येतील.
६. स्पर्धेचे विजेते मतदानाने निवडण्यात येतील.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users