हल्ली ए आयचं आणि त्यातल्या त्यात चॅट जीपीटीचं फॅड भलतंच वाढत चालललं आहे. कोडींग, मैत्री, शिक्षण, चित्रकारी कोणतंही क्षेत्र या बाबाने सोडलेलं नाही. पण "भविष्यात हे चॅट जीपीटी किंवा तत्सम कोणतंही ए आय टूल लेखन क्षेत्रातसुद्धा घुसखोरी करून आपणा लेखकांच्या पोटावर पाय आणू शकेल काय?" अशी बसल्याबसल्या उगाचच धास्ती वाटली. शेवटी या बोचऱ्या शंकेचा सोक्षमोक्ष लावायचा म्हणून एक चाचणी घ्यायची असा बेत मनात आखला आणि एक अर्धवट लेख लिहून चॅट जीपीटीला तो पूर्ण करायला सांगितला. सदरच्या रामायणानंतर या चाचणीचा आऊटपुट इथे शेअर करून माझ्या शंकेचा अंतिम निकाल मी मायबोलीवरील समस्त महारथी लेखकांवर सोपवत आहे.
विषय तसा मिळमिळीतच आहे. हाजारो कविता, आणि लाखो व्याख्यानांनी बुळबुळीत झालेला, आपल्या तोंडातून प्रत्येकाने कधी ना कधी घोळून घोळून, आपल्या प्रत्येकाच्या कानांवर रगडून रगडून,अगदी गुळगुळीत झालेला असा हा विषय म्हणजे 'आयुष्य..!'
नाही...नाही... हे आपलं कायमचंच म्हणून उगाच तोंड वेंगाडू नका, किंवा " हम्म्म... झालं याचं आपलं सुरू." म्हणून उगीच नाकं मुरडू नका. मी काही इथे जीवनावरती सो कॉल्ड प्रवचन देणार नाहीये किंवा, '१० गोष्टी ज्या तुमचं जीवन बदलतील' टाईप इमोशनल अत्याचार करणार नाहीये. या आयुष्य नावाच्या कथेचं जस्ट एक हलकं फुलकं समालोचन करणार आहे.
तर, आयुष्य सुरू होतं ते निरागस बालपणापासून. हा जादुई काळ प्रत्येकासाठीच पहाटेच्या साखरझोपेत पडलेल्या एका गोड स्वप्नासारखा असतो. एक वेगळंच स्वतःच निराळं जग.पण रखरखत्या वाळवंटात डोळे उघडुन ते स्वप्न मोडल्यानंतर प्रत्येकालाच ते पुन्हा एकदा पाहायचं असतं पण आठवणींच्या पाऊलखुणा मागे सोडून ते मृगजळी स्वप्न दूर...दूर कुठेसं निघून जातं.
हा लेख पुढं तू पूर्ण कर
...ते हरवलेलं बालपण, जणू एखाद्या जुन्या वहीत ठेवलेला गुलाब – वाळलेला, पण अजूनही त्या प्रत्येक पाकळीवर गोडसर आठवणींची सुगंधी छटा असते.
त्याच्यापाठोपाठ येतो तो तरुणपणाचा टप्पा – सगळ्या ‘पहिल्यांदा’ गोष्टींचा काळ. पहिलं प्रेम, पहिली चूक, पहिलं अपयश... आणि या सगळ्यांतून जन्म घेते ती पहिली ओळख – स्वतःशीच. इथे आयुष्य फक्त एक गमतीदार खेळ वाटत नाही, तर त्यातले नियम हळूहळू कळायला लागतात. कधी हे नियम पाळायला आवडतात, कधी त्यांच्याशी लढावंसं वाटतं.
नंतर नकळत आपण पाय ठेवतो प्रौढत्वाच्या शिडीवर. जबाबदाऱ्या, करिअर, घर, माणसं, नातं, अपेक्षा – सगळ्याचं एक चक्र सुरू होतं. इथं आयुष्य थोडंसं गंभीर होतं. काही स्वप्नं मागे राहतात, काही नव्याने उगम पावतात, आणि काही स्वप्नांची किंमत चुकवावी लागते.
पण गंमत म्हणजे, हे सगळं असतानाही, आयुष्य स्वतःचं सौंदर्य कधी गमावत नाही. एक संध्याकाळी बाल्कनीत बसून येणारा थंडगार वारा, चहा हातात घेऊन एखाद्या जुन्या मित्राशी केलेली गप्पा, अचानक एखाद्या गाण्यानं डोळ्यात येणारे अश्रू – या छोट्या छोट्या क्षणांत आयुष्य आपली जादू दाखवत राहतं.
आणि मग एक दिवस, मागे वळून पाहिल्यावर कळतं – आयुष्य खरं तर एका मोठ्या कथा-कवितेसारखं आहे. काही ओळी सुंदर, काही विस्कटलेल्या, काही अजून अपूर्ण… पण तरीही संपूर्ण!
कारण शेवटी, आयुष्य हे वाचत राहण्यात, अनुभवत राहण्यात आणि त्याच्या प्रत्येक वळणावर प्रेम करत राहण्यातच असतं.
.............
माझ्यासाठी तर हा रिझल्ट शॉकिंग होता. बाकी तुम्ही सुज्ञ आहातच.
।।नमोस्तुते।।
Promising
Promising
लेखनाबरोबरच AI आता विडिओ
लेखनाबरोबरच AI आता विडिओ सुद्धा बनवू शकते. सध्या विडिओ बनविण्याचे त्याचे कसब बाल्यावस्थेत आहे . पण आणखी काही वर्षांनी त्यात इतकी सुधारणा होईल कि केवळ प्रॉम्प्ट वापरून चित्रपट बनविता येईल.
याचा एक तोटा असा कि यामुळे विडिओ पुराव्यांची उपयुक्तता संपुष्टात येईल. कारण तो विडिओ खरा कि AI ने बनविलेला आहे ते सांगता येणार नाही.
कारण तो विडिओ खरा कि AI ने
कारण तो विडिओ खरा कि AI ने बनविलेला आहे ते सांगता येणार नाही.>>> दुसरा एक AI त्याची तपासणी करून तो
विडिओ खरा कि AI ने बनविलेला आहेहे सांगू शकेल.
आयुष्या विषयी जे लिहिलंय ते
आयुष्या विषयी जे लिहिलंय ते ढोबळ मानाने लिहिल्या सारखं वाटलं. ज्यांच्या वाट्याला अष्टोप्रहर कष्ट, दु:ख,वेदना, अवहेलना, उपेक्षा,शोषण , माणूस म्हणून नाकारलेल अस्तित्व आलंय त्याचं आयुष्य एखाद्या वाक्यात बसेल का? वहितल्या वाळलेल्या फुलात सुगंध असतो का?
माझ्यामते एखाद्या विषयावर दहा लेखक दहा वेगळ्या अंगाने लिहितील.
चॅटजिपीटी कितीही केलं तरी कृत्रीम बुध्दीमत्ता. यंत्राने केलेल्या पोळीत आईच्या हाताची माया कशी भरणार?
वाह. मस्त. AI बाळ झपाट्यानं
वाह. मस्त. AI बाळ झपाट्यानं मोठं होतंय.
चॅटजिपीटी कितीही केलं तरी कृत्रीम बुध्दीमत्ता. >>> ती आपल्या दृष्टिने. AI च्या दृष्टीने मानवी बुद्धीमत्ता कृत्रिम ठरू शकते. शिवाय लॉजिकल नाहीच. मधे भावना येतात.
मला वाटतं मानवी बुद्धीमत्ता chemistry-based आहे तर AI ची physics-based आहे.
अरे वाह भारी आहे AI
अरे वाह भारी आहे AI
पुढच्यावेळी गणपतीत शशक स्पर्धेत AI ला शशक सुद्धा पूर्ण करायला लाऊया..
AI प्रचंड अंडरएस्टीमेटेड आणि
AI प्रचंड अंडरएस्टीमेटेड आणि प्रचंड ओव्हरएस्टीमेटेड प्रकरण आहे सध्या.
मला वाटतं मानवी बुद्धीमत्ता
मला वाटतं मानवी बुद्धीमत्ता chemistry-based आहे तर AI ची physics-based आहे. >>> इंटरेस्टिंग
AI Training प्रमाणे वेग वेगळे
AI Training प्रमाणे वेग वेगळे ए आय टूल्स वेगवेगळे उत्तर देतात.
मला वाटतं मानवी बुद्धीमत्ता
मला वाटतं मानवी बुद्धीमत्ता chemistry-based आहे तर AI ची physics-based आहे. >> मामींना कोट करावे असे वाक्य!
मला वाटतं मानवी बुद्धीमत्ता
मला वाटतं मानवी बुद्धीमत्ता chemistry-based आहे तर AI ची physics-based आहे.>>
अगदी चपखल! 'बायो-केमिस्ट्री'