गझल

Submitted by Kalpesh Gaikwad on 11 April, 2025 - 12:44

वाटते जगावे मला पुन्हा एकदा नव्याने
उशाशी ठेवला गे फोटो तुझ्या विचाराने
तोडून सारी बंधने तू चाल माझ्या सवे
दिला संकेत केव्हांच मला श्रीविठ्ठलाने
विचारते सवाल जिंदगी नि दुनिया मला
मिळेल उत्तरही दोघांना तुझ्या असण्याने
या कुशीत त्या कुशीवर रे ती झोपमोड
पुन्हा एक रात्र रेंगाळली तुझ्या नसण्याने
होईल संसार आपलाही रामजानकीचा
ठेवली हातावर चतकोर वेड्या नशिबाने
ही दुभंगलेली नाती अन् तुझी आठवणं
एकटा पुसतो कैकदा आसवे रूमालाने

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users