अवांतर
अर्धवट वय
लहान मुलांना सुरक्षित कसे ठेवावे?
घरात पावणे दोन वर्षाचे लहान मूल आहे. जरा जास्तच द्वाड, अवखळ, ऍक्टिव्ह आहे. दार उघडले की बाहेर पळत जातो आणि उतरत्या जिन्याच्या तोंडाशी उभा राहतो. परवा त्याचा अंदाज चुकला आणि पहिल्या पायरीवर पडला. तोंडाला थोडेसे लागले पण नशिबाने गडगडत गेला नाही.
घरात सतत कोणी ना कोणी त्याच्यामागे असतेच. कधी कधी तर एकापेक्षा जास्त माणसे असतात. घर छोटे आहे आणि सामान बरेच आहे त्यामुळे इजा होण्याची भीती वाटते.
मदत हवी
मायबोली ॲप डाऊनलोड करायचं आहे पण प्ले स्टोअर वर नाहीय .कसं करावं ॲड्राॅइड आहे मोबाईल.
स्पर्श: एका चौकातले
तोच रोजचा रस्ता. तोच गर्दीचा चौक. तिकडेच दुचाकी पिळत चाललो होतो. माझ्यासारखीच सकाळी कामावर निघालेली मंडळी. कुणी ऑफिसला, कुणी कॉलेजला. कुणी पॅथॉलॉजी लॅबची भली मोठी बॅग पाठीला अडकवून, कुणाच्या कुरियरवाला भली मोठी बॅग पायात घेऊन. कुणी हेल्मेट घालून, कुणी टोपी घातलेलं. कुणाचे केस वाऱ्यावर लहरताहेत, तर कुणी तोंड, डोकं सगळं बांधून चाललंय. कुणी कामाच्या युनिफॉर्ममधे, कुणी फॅशनेबल फाटक्या जीन्स मध्ये. कुणाला मी ओव्हरटेक करतोय, कुणी मला डावी घालून पुढे निघतोय. बहुतेक एकटेच, पण काही दुकटे.
अपघात टळला तो प्रवास
एका लग्नाच्या निमित्तानं अलीकडेच नागपूरला जाणं झालं होतं. 32 वर्षांनी नागपूरला जाणं होत असल्यामुळं उत्साह वाढलेला होताच. मग बऱ्याच आधी मी पुणे-अजनी एक्सप्रेसच्या विनावातानुकुलित श्रेणीचं आरक्षण करून ठेवलं. काही दिवसांनी समजलं की, वऱ्हाडी मंडळीही माझ्याच गाडीनंच जात आहेत, पण ते वातानुकुलित श्रेणीनं जाणार होते.
महाराष्ट्रियन घरात डिशवॉशर कितपत उपयुक्त?
आजकाल घरकाम बायांच्या सुट्ट्या बर्याच वाढत चालल्यायत. चालायचेच!
ऐनवेळी असा प्रसंग असल्यास अडचण होते. विषेशतः पाहुणे वगैरे असल्यास. तर, जसा रोबो फ्लोअर क्लिनर वगैरे हाताशी उपयोगी पडतो तसा डिशवॉशर उपयुक्त आहे का? भांडी आपली नेहमिचीच - ताट , वाटी, पेले, चमचे वगैरे...की घेतल्यावर आणी नवलाई संपल्यावर नुसताच ; मला पहा अन फुले वाहा! आणि मग नंतर नुसताच 'भुईला भार'?
ओढ (अंतिम भाग)
(भाग २ - https://www.maayboli.com/node/86070)
रस्ता पार करून गल्लीच्या तोंडावर मी उभी होते, सुभाषकाकाचा मागोवा घेत. काका एका ओट्यावर चढला आणि त्यानं खोलीचं कुलूप उघडलं.
भाजीवाली माझ्याकडे बघत होती.
"काय, भाजी पायजे का बाई?" तिनं प्रश्न केला.
मी तंद्रीतून बाहेर आले. मान नकारार्थी हलवली.
भाजीवालीच्या शब्दांत कुतुहल होतं. "इथं कोनाकडं आलावता?" तिलाही ती विसंगती जाणवत होती.
माझ्या नजरेचा अंदाज घेत तिनं विचारलं, "कोन पायजे व्हतं?"
ओढ (भाग २)
ओढ (भाग पहिला)
कार्यक्रम छानच झाला हो! सगळेच असं म्हणत होते. इतक्या दिवसांच्या मेहनतीचं फळ मिळालं. आम्ही सगळेच हौशी. कुणी बासरी वाजवतो, कुणी माऊथ ऑर्गन, तर कुणी गातं. कोविडच्या काळात ऑनलाईन एकत्र आलो होतो. पण इतक्या दिवसांनी हा पहिलाच पब्लिक असा परफॉर्मन्स सादर केला होता. प्रेक्षकांत आमचेच सगेसोयरे, चाहते बहुसंख्येने होते. त्यामुळे भरभरून दाद मिळाली होती! व्हायोलिन हा प्रत्येक गाण्याचा अविभाज्य भाग असल्याने माझ्यावर बरीच जबाबदारी होती. त्यामुळे सगळं उत्तम पार पडल्यानं अगदी हायसं वाटलं होतं बघा! मी व्हायोलिनची केस उचलली आणि सगळ्या कलाकारांबरोबरच बाहेर पडले. या ग्रुपमध्ये प्राधिकरणातून आलेली मी एकटीच होते.
Pages
