सहज सर्फिंगमध्ये टीव्हीवर 'मिनीमलिझम' ही नेटफ्लीक्समध्ये तयार झालेली डॉक्युमेंटरी दिसली.
त्यांच्या देशात ज्याप्रकारे चंगळवाद आणि ग्राहकतावाद वाढून आज पुन्हा मिनिमलीझम अर्थात 'तेवढ्यापुरते' ही लाट आली आहे त्या लाटेमध्ये मला भारत हा त्यांच्या पोळलेल्या तोंडाच्या उंबरठ्यावर दिसतो.
म्हणून ही डॉक्युमेंटरी पाहण्यास मी चालू केली आणि मध्ये मध्ये जेव्हा वाटेल तेव्हा त्याविषयीचे माझे विचार व्यक्त नोंदवत गेलो.
डॉक्युमेंटरी पाहत असताना मनात व्यक्त केलेल्या विचारांची मालिका म्हणजे हा लेख.
मी पाहिलेला माहितीपट
मी वाचलेलं पुस्तक, किंडलवर वाचलेलं पुस्तक, तुम्ही कोणते यूट्यूब चानेलस subscribe केले आहेत असे धागे इथे आहेत. ते पाहून वाचून हा धागा सुचला. मला documentaries - माहितीपट पाहायला आवडतात.
धागा मायबोली admin ने चालवला तर उत्तमच. सुरुवात करत आहे.
dw tv - जर्मनीचा चानेल,
Nhk world - जपानचा चानेल,
Aljazeera - कत्तारचा चानेल,
ABC - ओस्ट्रेलिया,
History - चानेल ( इजिप्तचे खासच.)
असे आणखी बरेच आहेत ते माहितीपट प्रसारित करत असतात. सर्वच विडिओ पाहणे अशक्य असते. पण कुणी पाहून त्याबद्दल सांगितले तर वेळ वाचेल आणि काम सोपे होईल.
दिल्लीत ‘कठपुतली कॉलनी’ नावाची एक वसाहत आहे... ५०-६० वर्षांपूर्वीची... तिथे जवळपास अडीच ते तीन हजार लोक राहतात... ही सारी कुटुंबं म्हणजे पारंपरिक कठपुतळ्यांचा खेळ करणारी; जादूचे-हातचलाखीचे प्रयोग करून दाखवणारी; नाहीतर डोंबार्यासारखे खेळ करणारी, कसरती करून दाखवणारी... अशा प्रकारची ही आशियातली बहुधा सर्वात मोठी वसाहत आहे...
यातलं मला काहीही माहिती नव्हतं, ‘टुमॉरो वुई डिसअपिअर’ हा माहितीपट बघेपर्यंत!