मी पाहिलेला माहितीपट
मी वाचलेलं पुस्तक, किंडलवर वाचलेलं पुस्तक, तुम्ही कोणते यूट्यूब चानेलस subscribe केले आहेत असे धागे इथे आहेत. ते पाहून वाचून हा धागा सुचला. मला documentaries - माहितीपट पाहायला आवडतात.
धागा मायबोली admin ने चालवला तर उत्तमच. सुरुवात करत आहे.
dw tv - जर्मनीचा चानेल,
Nhk world - जपानचा चानेल,
Aljazeera - कत्तारचा चानेल,
ABC - ओस्ट्रेलिया,
History - चानेल ( इजिप्तचे खासच.)
असे आणखी बरेच आहेत ते माहितीपट प्रसारित करत असतात. सर्वच विडिओ पाहणे अशक्य असते. पण कुणी पाहून त्याबद्दल सांगितले तर वेळ वाचेल आणि काम सोपे होईल.
या माहितीपटाने सुरुवात करतो.
Zimov hypothesis
उत्तर धृवाजवळच्या साइबेरियातील बर्फ वितळला तर - समुद्राची पातळी वाढेल, २) कार्बन डायॉक्साइड वाढेल. गवत खाणारे आणि थंड प्रदेशात शून्याखाली तीस चाळीस अंश तापमानास राहू शकणारे प्राणी तिथे आणून सोडले,वाढले तर बर्फाचा थर वितळणे थांबवता येईल असे झिमॉव शास्त्रज्ञाने सुचवले होते. त्याप्रमाणे काम चालू होते २०१३ पासून.
एक बाप लेक हे काम नेटाने करत होते त्याची माहिती आहे. निरनिराळे प्राणी आणून ते वाढवण्याचा खटाटोप दाखवला आहे. इथला भाग हे एक जीवशास्त्रीय वाळवंट आहे म्हणतात. इथली झाडे गवतखाऊ प्राणी खाऊ शकत नाहीत. एके काळी इथे mammoth सारखे अजस्त्र हत्ती होते त्यांचे अवशेष सापडतात.
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्याचा निषेध म्हणून पश्चिमी देशांनी या उपक्रमाला दिला जाणारा निधी बंद केला आहे.
- के २ या शिखरावरच्या चढाईचे
- के २ या शिखरावरच्या चढाईचे युट्यूब व्हिडीओज आवर्जून पहा. वाहत्या पानावर दिले होते यापूर्वी.
- चेर्नोबिल या गावाची दुर्दशा आणि धनुषकोडी या गावाच्या दुर्दशेबद्दलचे व्हिडीओजही पहा. दोन्ही गावांना भूतांचे गाव म्हटले जाते.
- झिरो ग्रॅव्हिटी असलेली जगातली आश्चर्यकारक ठिकाणे
लिंक मुद्दाम देत नाही. हे व्हिडीओज थोडेसे रिपोर्ताज प्रकारचे आहेत.
डॉक्युमेण्टरीज
https://www.youtube.com/watch?v=cvFt2Xcuois
जगातले सर्वात उंच शिखर एव्हरेस्ट आहे हा क्लेमही अधून मधून के२ मुळे धोक्यात येत असतो. अनेकांचे ठाम मत आहे कि के२ हेच सर्वोच्च शिखर आहे. ते जगातले सर्वात धोकादायक शिखर आहे. त्यावर चढाया कमी झाल्या आहेत. त्यातही मृत्यूंचे प्रमाण सर्वाधिक आहे.
https://www.youtube.com/watch?v=xtXdwpuHHG8
नंगा पर्बत आणि नंदादेवी हे त्या खालोखाल धोकादायक आहेत.
के २ विरूद्ध एव्हरेस्ट.
के २ विरूद्ध एव्हरेस्ट.
के २ ला शिखरांचा राजा म्हणतात.
https://www.youtube.com/watch?v=wGSVWVjyw6s
पाहिले के२. आवडले.
पाहिले के२. आवडले.
एक दोन आठवडे राहायचं तर किती जेवण लागेल न्यायला.
एक नंबरचे जाऊ द्या पण K2 हे
एक नंबरचे जाऊ द्या पण K2 हे शिखर दुसऱ्या स्थानावर पण काठावर पास झाले आहे. तिसऱ्या क्रमांकाचे कांचनजुंगा(8586 m) हे शिखर K2 (8611 m) पेक्षा केवळ २५ मीटरनी छोटे आहे.
७०च्या दशकात CIA आणि IB मिळून नंदादेवी सर करण्याची मोहीम हाती घेतली होती. गिर्यारोहण मोहिमेच्या नावावर नंदादेवी शिखरावर कसले तरी उपकरण बसवून चीनच्या हालचालीवर लक्ष ठेवणे हे मोहिमेच्या मागचे मूळ कारण होते. मोहिमेदरम्यान जोराच्या वादळाने सर्व गिर्यारोहकांना परतावे लागले आणि ते उपकरण शिखरावरच कुठे तरी पडले. नंतर ते उपकरण शोधायला बऱ्याच मोहिमा हाती घेतल्या पण सगळ्या अपयशी झाल्या. ते उपकरण कुणाच्या हाती पडू नये म्हणून नंतर भारत सरकारने नंदादेवी आणि आसपासच्या भागाला special biosphere zone घोषित केले. ह्या विषयावर प्लॅनेट अर्थ वर सुरेख माहितीपट पाहण्यात आला. लिंक मिळाली तर देतो. अधिक माहिती इथे,
https://en.wikipedia.org/wiki/Nanda_Devi_Plutonium_Mission
एका national geographic
एका national geographic मासिकात आणि नंतर भटकंती मासिकात Reinhold Messner याची माहिती कळली. तेव्हा लेख आणि मुलाखती हेच माध्यम होते. आता याचे काही विडिओ आहेत. त्यानेही नंगा परबत आणि k2 एवरेस्टपेक्षा अधिक धोकादायक म्हटले आहे.
झंपु दामले छान माहिती.
झंपु दामले छान माहिती.
एव्हरेस्ट , कांचनजुंगा आणि के२ असा वाद नाही. भारतीय हद्दीतले कोणते शिखर जास्त उंच आहे असा वाद आहे. के२ आता निर्विवादपणे पाकिस्तानात म्हटले जाते. त्यामुळे कांचनजुंगा हे भारतीय हद्दीतले सर्वोच्च शिखर आहे.
के २ ची उंची जेव्हां मोजली तेव्हां ते हिमाच्छादित नव्हते. एव्हरेस्टवर केव्हांही बर्फ असते. चीनने एव्हरेस्टची उंची खडकापर्यंतच मोजावी असा आग्रह धरला होता. त्याला नेपाळ आक्षेप घेत आले आहे. एव्हरेस्टची ब्रिटीशांनी मोजलेली उंची अचूक नाही असा विवाद होता. चीनने खडकापर्यंतची जी उंची मोजली त्या वेळी के२ हे एव्हरेस्टपेक्षा उंच भरले. पण आता नेपाळ आणि चीन या दोन्हीही देशांनी बर्फाच्छादीत उंची मोजण्याचे मान्य केले आहे. त्यानुसार दरवर्षी एव्हरेस्टची उंची वाढत असल्याचे आढळते.
खडकाची उंची बदलत नाही. कांचनजुंगाची उंची खडकापर्यंतची मोजली आहे की बर्फासहीत ?
जून जुलैमध्ये बर्फ कमी असतो
जून जुलैमध्ये बर्फ कमी असतो तेव्हाच मोहिमा असतात. तीच उंची गिर्यारोहकांना गाठायची असते. नंतर उंची वाढते. म्हणजे सटेलाईट नंतर अधिक दाखवत असेल.
(No subject)
सध्या ह्यांचा नाद लागला आहे, मेजर लेविसन वूड्स, हा ब्रिटिश आर्मी ऑफिसर आहे अन प्रत्येक ठिकाणी पायी पायी फिरतो, जबरदस्त डॉक्युमेंटरी असतात
१. फ्रॉम रशिया टू इराण
२. वॉकिंग द नाईल
३. वॉकिंग द हिमालयाज
४. अरेबिया - जर्नी थ्रू हार्ट ऑफ मिडल ईस्ट
५. वॉकिंग द अमेरिकाज
इतक्या सध्या बघितल्या आहेत सिरीज मी, लैच अत्युच्च आहेत. नक्की बघा
अत्युच्च आहेत. नक्की बघा
अत्युच्च आहेत. नक्की बघा
नवीन Submitted by जेम्स वांड >> थँकु. कुठे आहेत.
मस्त धागा.Parrots in the Land
मस्त धागा.
Parrots in the Land of Oz हा ऑस्ट्रेलियातील पोपटांवरचा माहितीपट फार आवडला होता.
वॉकिंग द नाईल पाहिले आहेत
वॉकिंग द नाईल पाहिले आहेत कुणाचे तरी. हाच माणूस का माहिती नाही। मजा येते.
टॉमी अभिलाष जग फिरून आला एकटा बोटीने . त्याची बोट दांडेकर नावाच्या माणसाने अशी बनवली होती की त मोठ्या वादळात बुडणार नाही. त्यानेच तो दुसऱ्या फेरीत वाचला. माहिती वाचली आहे बऱ्याचदा पण वीडिओ आहे का? त्याचे पुस्तकही आहे म्हणतात.
मी तरी डिस्कव्हरी चॅनल
मी तरी डिस्कव्हरी चॅनल स्ट्रीमिंग ऍप वर बघितले सगळे एपिसोड.
@srd
@srd
ती शिडाची बोट होती INSV म्हादेई
INSV - Indian Navy Sailing Vessel
भारतीय नौदलाने जेव्हा अशी बोट बांधायचे नक्की केले तेव्हा त्याचे कंत्राट ऍक्वेरियस शिपयार्ड गोवा ह्या कंपनीला दिले होते ह्या कंपनीचे डायरेक्टर आहेत रत्नाकर दांडेकर.
१) तो चालणारा माणूस रोज ४०
१) तो चालणारा माणूस रोज ४० किमी चालायचा. याचं आश्चर्य वाटायचं.
एकदा नेरळला ( माथेरानजवळचं) एका टपरी वडेवाल्याशी गप्पा मारत होतो. तो म्हणाला की त्यांचा साताठ जणांचा ग्रूप आहे. डिसेंबरात शिर्डीला चालत जातो. आठ दिवसांत . म्हणजे रोजी चाळीसचा हिशोब पडला.
२) शिडाची होडी एकट्याने जग फिरवायची तर जेवण, झोप, दिवस रात्र चालवणे, मार्ग न चुकणे हे कसे साध्य करतात हे जाणून घ्यायचे आहे. त्याचे विडिओ हवेत.
अभिलाष टॉमीची सफर सुरू होती
अभिलाष टॉमीची सफर सुरू होती तेव्हा तो नियमित ब्लॉग लिहायचा.
तेव्हा मी अधूनमधून त्या ब्लॉगपोस्ट्स पहायचे. आताही लिंक गूगल केली तर मिळायला हरकत नसावी.
Srd, जेम्स वांड, वर्षा छान
Srd, जेम्स वांड, वर्षा छान माहिती आहे.
उत्तम धागा आहे. कृपया उकसवणाऱ्या, शेरेबाजी असणाऱ्या कमेंट्स इथे नकोच.
मस्ताड आहे धागा!
मस्ताड आहे धागा!
<<मेजर लेविसन वूड्स, हा ब्रिटिश आर्मी ऑफिसर आहे अन प्रत्येक ठिकाणी पायी पायी फिरतो, जबरदस्त डॉक्युमेंटरी असतात<< हे भारीय..
https://www.youtube.com/watch?v=skcqFTi3s_A
https://www.youtube.com/watch?v=2YP8y3S5ALk
मला यांचे व्हिडीओज आवडतात.