Submitted by संयोजक on 6 September, 2024 - 08:19
काय मंडळी,
शीर्षक वाचून शाळेतले दिवस आठवले ना? पण घाबरू नका आम्ही काही तुम्हाला परत धडे वाचणे, पाठांतर करणे असे काही करायला लावणार नाही.
आपण शाळेत हे प्रश्न सोडवायचो त्याच स्वरुपाचा हा गंमतखेळ आहे.
खेळ एकदम साधा व सोप्पा आहे.
मराठी चित्रपट, कथा, कादंबर्या, प्रसिद्ध व्यक्ती यांच्या तोंडी आलेला संवाद अथवा त्यांचे प्रसिद्ध वक्तव्य दिले जाईल व ते वक्तव्य कोणी केले हे ओळखायचे आहे.
उदाहरणार्थ.
१. "अरे, पुराव्याने शाबित करेन!" :- हरितात्या,
२. "तुमचे सत्तर रुपये वारले" :- धनंजय माने
३. " काय हॉटेल! काय झाडी! काय डोंगर!":- शहाजीबापू पाटील
सुरुवातीला संयोजक एक वक्तव्य देतील, बरोबर उत्तर देणारा पुढचे वक्तव्य आणि गरज पडल्यास क्ल्यू देईल व हा खेळ पुढे चालू राहील.
तुमच्यासाठी पहिला संवाद आहे...
"गॉड इज सफरिंग--आमचे बायकोचा चिमटा असते तसा"
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पेस्टनजी
पेस्टनजी
छान, कल्पक खेळ आहे.
छान, कल्पक खेळ आहे.
AI,
AI,
बरोबर.
आता तुम्ही पुढचे वक्तव्य/ संवाद द्या.
Ok, धन्यवाद "नया है वह"
Ok, धन्यवाद
"नया है वह"
सारखा सारखा काय त्याच झाडावर.
बाबा - वैभव मांगले
सारखा सारखा काय त्याच झाडावर.
सारखा सारखा काय त्याच झाडावर.
अशी ही बनवा बनवी
अशी ही बनवा बनवी
परश्या बळीला…
पुढचे कोडे…
पुढचे कोडे…
अहो तुम्ही तर ह्याची ही पार ह्याला टांगलीत!
बनवाबनवीतला परश्या!!
प्रोफेसर बारटक्के?
तरुण तुर्क म्हातारे अर्क
प्रोफेसर बारटक्के
प्रोफेसर बारटक्के
तरुण तुर्क
त्या भांगेत ही तुळस फुलली आहे.
(मराठी ची अट वाचून कोडे बदलले)
अनु, नाथा कामत का? निवडुंगात
अनु, नाथा कामत का? निवडुंगात जाई फुलली आहे असं काही तरी वाक्य आहे ना? 'भांगेत तुळस' ला तेजस्वी भावंड? आत्ता हाताशी पुस्तक नाहीये.
अरे हो बरोबरच की.ऑनलाईन
अरे हो बरोबरच की.ऑनलाईन पाहिलं.कोडं फाऊल.
स्वरूप ने माझ्या आधी बारटक्के कोडं सोडवलंय, स्वरूप देईल पुढचं.
मघाशीच ठरवून ठेवलेले
मघाशीच ठरवून ठेवलेले
हे घ्या:
"आपल्या लाईनकडे बघणं ही सुद्धा एक कला आहे"
शाळा- मुकुंद जोशी
शाळा- मुकुंद जोशी
बरोबर वावे!!
बरोबर वावे!!
द्या आता पुढचे वक्तव्य तुम्ही
"वेड्या मुली, मला नको असताना
"वेड्या मुली, मला नको असताना मीही तुझ्या प्रेमात पडलो आहे. ये ना तू माझ्याकडे ! ये ना लवकर !"
काहीतरी क्ल्यू द्या की!!
काहीतरी क्ल्यू द्या की!!
क्ल्यू- पत्रातलं वाक्य आहे.
क्ल्यू- पत्रातलं वाक्य आहे.
किती सोप्पे झालेय आता ओळखायला
किती सोप्पे झालेय आता ओळखायला या क्ल्यूमुळे
काळ जुना असावा आणि शैलीवरुन
काळ जुना असावा आणि शैलीवरुन नाटकातले असेल असे वाटतेय!!
लंपनचं आहे का?
लंपनचं आहे का?
स्वरूप
स्वरूप
अमितव, लंपन नाही.
नाटकातलं नाही, कथेतलं आहे.
भाषेवरून तरी खांडेकर / फडके /
भाषेवरून तरी खांडेकर / फडके / गडकरी तत्सम जुन्या काळातील लेखकांचे वाटतं आहे . अंदाज फक्त
पुढचा क्ल्यू द्या
पुढचा क्ल्यू द्या
जुना काळ बरोबर, पण हे वरचे
जुना काळ बरोबर, पण हे वरचे तिन्ही लेखक नाहीत आणि फडके-खांडेकर पठडीतीलही कुणी नाही!
वावे, मला खात्री नाही पण
वावे, मला खात्री नाही पण वाक्य अनंत सामंतांच्या अविरत मधलं आहे का? विराज अविरतने मारिषाला लिहिले होते का पत्र? (ती कादंबरी वाचूनही बरीच वर्षं झाली)
नाही श्रद्धा.
नाही श्रद्धा.
एक क्ल्यू- कथेचं नाव एका जुन्या, पारंपरिक गोष्टीवरून घेतलेलं आहे.
लेखक कोण वगैरे याचा क्लू
लेखक कोण वगैरे याचा क्लू मिळेल ?
लेखक कोण वगैरे याचा क्लू
लेखक कोण वगैरे याचा क्लू मिळेल ?
>>आणि फडके-खांडेकर पठडीतीलही
>>आणि फडके-खांडेकर पठडीतीलही कुणी नाही!
मग कोणी विद्रोही वगैरे आहे का?
ते वाक्य ग्रामीण वाटत नाहिये.... शहरीच वाटतय!! कोण असावे बरे?
Pages