परदेशात (UK) जाणाऱ्या विद्यार्थ्याच्या पालकांचे प्रश्न

Submitted by rr38 on 23 August, 2024 - 23:05

नमस्कार. माझा मुलगा UK मध्ये मास्टर्स करण्यासाठी जातो आहे. इतर सर्व तयारी झाली आहे. आता शेवटचा टप्पा चालू आहे त्या दृष्टीने काही प्रश्न आहेत. कृपया तुमच्या अनुभवानुसार मार्गदर्शन करा.
१. University आणि हॉस्टेल फी भरून झाली आहे. मुलाच्या दैनंदिन खर्चासाठी विविध बँकांचे Forex card, Ebix असे वेगवेगळे पर्याय ऐकले आहेत. यातील सर्वात फायदेशीर पर्याय कोणता आहे?
२. Student Forex खरंच उपयुक्त आहे का?
३. आजकाल dehydrated food ची चर्चा आहे. इथे मी आपण घरी बनवलेल्या खाद्यपदार्थांच्या dehydration बद्दल बोलत आहे. मला ही प्रक्रिया करणाऱ्या २-३ युनिट बद्दल माहिती मिळाली आहे पण ते खरंच किती उपयुक्त आहेत याबद्दल कोणाला माहिती असेल तर सांगा. हे लोक ६महिने शेल्फ लाईफ सांगतात, त्यावर काही सूचना आहे का?
४. चपात्या व्हॅक्यूम पॅक करण्याबाबत कोणाचा काय अनुभव आहे? किती दिवस टिकतात? फ्रीज मध्ये ठेवण्याची आवश्यकता असते का?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

4) सकस किंवा सोनाली च्या घडीच्या पोळ्या best option आहे.. Freezer मध्ये सहा महिने टिकतात ..ऐन वेळी गरम करून घ्यायची...लेकीला दिल्या होत्या ..सुरवातीला adjust होई पर्यंत चांगला उपयोग होतो ready to eat चा.. घरी केलेले पराठे, उपमा mix, खिचडी मिक्स,धिरडी,डोसा कोरडी पीठे हे पण देऊ शकता..non veg खात असाल तर तिकडे बरेच ऑप्शन्स आहेत..
एकदा routine लागलं की मुले आपल्या आपण manage करतात..

सकस फ्रोझन उत्तम ऑप्शन आहे.थोडा सराव झाल्यावर इंडियन शॉप मधून चांगला आटा आणून गरम गरम पराठे करता येतील.ते स्वस्त पडेल आणि फ्रोझन चांगले मिळणे न मिळणे हे प्रश्न सुटतील.घरच्या घरी मुगडाळ तांदूळ मसाला तेलावर एकदम खुटखुटीत परतून वाळवून खिचडी मिक्स देता येईल, मायक्रोव्हेव ला उकळून खिचडी.(याने आमचे खूप श्रम सोपे केले होते जेव्हा कधी गेलो तेव्हा.)
हल्ली एअरलाईन्स खूप गोष्टी रिजेक्ट करतात.सर्व वाचून माहिती करूनच पदार्थ द्या.शक्यतो पॅक मध्ये.राहायला जाऊन दुकानं मिळेपर्यंत एखादा वेळ निभली की झाले.बाकी युटिलिटी शॉप सगळीकडे असतातच.ब्रेड जॅम सॉस नाचो मिळतात.एक वेळ निभायला काहीच प्रॉब्लेम नाही.

केया आणि mi_anu प्रतिसादाबद्दल धन्यवाद. मी नवी मुंबईत राहते त्यामुळे सकस available नाहीये. खिचडी मिक्स आणि काही ड्राय मसाले देणार आहेच. उपमा पण देईन. भाज्या आणि चिकनचे काही प्रकार तो बनवू शकतो. भाताचे पण एक दोन प्रकार जमतात. आटा आणि पराठे किंवा चपात्या त्याला सध्या तरी कठीण आहे.