मनकोलाज - १
सकाळच्या पारी जीमचा रस्ता पकडते तेंव्हा बर्यापैकी काळोख असतो. त्या धूसर अंधारात दवात न्हाल्या रस्त्याचा, झाडापानांचा मिळून येणारा ओला वास माझी पहाटे उठण्याची नाराजी घालवतो.
नेहमीच्या झाडाखाली मी गाडी पार्क करते. एक मोठ्ठा श्वास घेऊन आत शिरते. शूज चढवून अवयवांना चालू करते.
स्वत:ची अशी निरुपद्रवी पाच मिनिटं मला सध्या मिळत नाहीत. वर्क आऊट चालू असतानाही पुढं दिवसात घडतील अशा आणि मला घडवायलाच हव्यात अशा गोष्टींची यादी फ़िरत असते.