मायबोलीकर आयडी ओळखा कोडे
१.मराठी हिंदी इंग्रजी सर्व भाषा वापरून कोडे सोडवा
२. चित्रावरून शब्दशः अर्थ काढा
३. काल पेडगावी ज्यांनी हे सोडवले आहे त्यांनी उत्तरे लिहू नका
१.मराठी हिंदी इंग्रजी सर्व भाषा वापरून कोडे सोडवा
२. चित्रावरून शब्दशः अर्थ काढा
३. काल पेडगावी ज्यांनी हे सोडवले आहे त्यांनी उत्तरे लिहू नका
कुजबुज
२७ मे २०११
नमस्कार वाचकहो,
२३ जानेवारी २००१ रोजी सुरू झालेल्या कुजबुजचे हे दहावे वर्ष. "दशकपूर्ती निमित्ताने" मालिका लिहितांना कुजबुजला सुद्धा १० वर्षे झाल्याचे लालू यांनी आमच्या निर्शनास आणून दिले या बद्दल कुजबुज संपादक मंडळ त्यांचे आभारी आहे.
"कुजबुजच्या नावाखाली काय वाट्टेल ते लिहून मायबोलीकरांची बोचरी टवाळी करता" असा आरोप कुजबुजवर अधून मधून होत असतो. या आरोपाची दखल घेत या दशकपूर्ती कुजबुज अंकात आम्ही टवाळी करणारा एक शब्दही लिहायचा नाही असे ठरवले. हितगुजवर जे जसे दिसले तसेच छापायचे हे एकच ध्येय यावेळी समोर ठेवले आहे.
कुजबुज
२१ ऑक्टोबर २०१०
नमस्कार वाचकहो,
टायटल बघून दचकू नका. कुजबुजची "धार वाही" कादंबरी दररोज मायबोलीवर प्रकाशीत करण्याचा आमचा अजिबात मानस नाही. पण गेल्या काही अंकाच्या प्रकाशना नंतर "अंक फार लहान वाटला" "मॅटर ज..रा कमी वाटतेय" अशी तक्रार काही वाचकांनी केली होती. त्याला घाबरून यावेळी आम्ही विचारपूर्वक हे शिर्षक दिले आहे जेणे करून यावेळी पण कुजबुज मधे मॅटर कमी वाटल्यास हाफ प्लेट आहे म्हणत वेळ मारून नेता येईल.
कुजबुज
३१ मार्च २०१०
नमस्कार वाचकहो,
मा. अॅडमिन साहेबांनी "उद्योजक व्हा!" चा नारा दिल्यामुळे पुन्हा एकदा कुजबुज प्रकाशीत करण्याचा उद्योग आम्ही चालू करीत आहोत. उत्पादन पुन्हा चालू करण्या आधी "पण विकत कोण घेणार?" असा प्रश्न आम्हालाही पडला आणि यावर सोप्पा उपाय म्हणून ही कुजबुज आम्ही विक्रीला नं ठेवता मोफत वाटत आहोत.
वैधानिक इशारा : ही कुजबुज आम्ही कळकट तोंडाने, फुटलेल्या घामाने आणि खाजर्या हाताने लिहीली आहे तेव्हा प्रत्येकाने ती आपल्या जबाबदारीवार वाचावी. यातून विषबाधा झाल्यास कुजबुज प्रकाशक जबाबदार राहणार नाही.