लेखनात मुख्य चित्र/फोटो देण्यासाठी नवीन सोपी सोय
मायबोलीवरच्या लेखनात चित्रे/फोटो द्यायची सोय अनेक वर्षांपासून आहे. आधी तुमच्या वैयक्तीक जागेत फोटो अपलोड करायचा आणि नंतर तो लेखात चिकटवायचा. पण ही दोन टप्प्यात आहे आणि मोबाईलधारकांसाठी थोडी अडचणीची आहे.
इथे प्रकाशित झालेल्या ७०% टक्के लेखनात फक्त एकच चित्र असते (किंवा एकच चित्र योग्य दिसेल) असे दिसून आले. त्याला आपण मुख्य चित्र किंवा मुख्य फोटो म्हणू यात. आजपासून लेखनात मुख्य चित्र द्यायची सोपी सोय केली आहे.
नवीन लेखन करताना
१. " मुख्य चित्र /फोटो" इथे असलेले "choose file" बटन दाबून हवे ते चित्र /फोटो सिलेक्ट करायचा.
२. उपलोड "Upload" बटनावर टिचकी मारून ते चित्र /फोटो लेखनात चिकटवायचे.
३. नेहमीप्रमाणे इतर मजकूर लिहायचा .
झालं !
फोटोचा आकार खूप मोठा असेल , तर मुद्दाम छोटा करायची गरज नाही. तो आपोआप ९००x९०० इतका केला जाईल. मात्र फोटो कमीत कमी ३००x३०० इतका असणं गरजेचे आहे नाहीतर खूप छोटा फोटो चांगला दिसत नाही.
मुख्य चित्र आपोआप सगळ्यात वर कुठल्याही मजकूराच्या अगोदर दिसत राहील. उपलोड सोपे व्हावे म्हणून फाईल साईजची मर्यादा 2 MB इतकी वाढवली आहे. मोबाईलधारकांसाठी हे खूप सोपे झाले आहे.
सध्या "लेखनाचा धागा" आणि "पाककृती" या लेखनप्रकारात ही सोय केली आहे. हळूहळू इतर प्रकारातही होईल.
याचा आणखी फायदा म्हणजे ग्रूपच्या लेखनाच्या यादीतही या चित्राचे छोटेखानी रूप (Thumbnail) दिसत राहील. लवकरच हे मायबोलीच्या "मायबोलीवर नवीन्/ माझ्यासाठी नवीन " या याद्यांमधेही दिसू लागेल.
याची चाचणी म्हणून काही लेखात/ पाककृतीवर असे चित्र/फोटो चिकटवून पाहिले आहे. त्यामुळे ज्या लेखनात ही चाचणी केली त्यात "बदलून" असे दिसते आहे.
उदा. हे ग्रूप पहा.
गुलमोहर - इतर कला , पाककृती आणि आहारशास्त्र,
खेळाच्या मैदानात
या शिवाय तुम्हाला आणखी चित्रे/फोटो लेखात द्यायचे असतील , तर सध्याची सोय आहेच. त्यात बदल नाही.
छान. नवीन लेखनात जशी ही सोय
छान. नवीन लेखनात जशी ही सोय दिलीत तशीच प्रतिसादांत सुद्धा मिळावी अशी अपेक्षा आहे.
चांगली सोय
चांगली सोय
हे भारी काम केलंय ऍडमीन.
हे भारी काम केलंय ऍडमीन.
एक फोटो सोपेपणी लेखात टाकता आला तर नव्या युजर्स ना फायदा होईल.
मला जुनी सुविधा पण आवडते.पण मोबाईलवर करताना(वेगवेगळ्या ब्राऊजर च्या प्लगीन बिहेव्हीयर मुळे एका ब्राऊजर वर फोटो अपलोड ची ऍक्शन पूर्ण होते पण इमेज च्या जागी प्लेस होल्डर दिसते, दुसऱ्या ब्राऊजर वर फोटो पर्सनल स्पेस ला ऍड करता येतो पण इन्सर्ट इन पोस्ट चे बटन चालत नाही असा घोळ आहे.)एक बहिरा एक आंधळा एक मुका.तिघे एकमेकांची मदत घेऊन व्यवस्थित आयुष्य काढतात.
पीसी वर सगळे इमेज अपलोड व्यवस्थित होते.पण टायपिंग करताना चुकून एक बॅक स्पेस आधी स्पेस न दाबता दाबले तर भयंकर अक्षर घोळ होतो.यातल्या बऱ्याच गोष्टी द्रुपल आणि ब्राऊजर प्रॉपर्टी च्या आहेत.खुद्द मायबोलीच्या नाहीत.
(इतके असूनही टेक्स्ट आणि चित्रबडबड करायचा मोह आवरत नाही तो नाहीच )
काही नवीन करता आहात ते आवडले.
काही नवीन करता आहात ते आवडले.
वेगळी पद्धत ( मोबाइलवरूनही).
------------------------------
१) माझे सदस्यत्व ( खाते )
२) खाजगी जागा
३) सिलेक्ट फोटो- Open in new tab
अगोदर अपलोड करून ठेवलेल्या फोटोंच्या लिंका दिसतील. कोणतीही सिलेक्ट केल्यावर ती हाइलाइट होऊन खाली फोटो दिसेल. तोच हवा असल्यास त्याच फोटोवर क्लिक करणे. तो वेगळा मोठा दिसला पाहिजे.
४)कॉपी 'लिंक' अड्रेस बारमधली.
५)ती या टेम्प्लेटात टाकणे.
टेम्प्लेट
<img src="लिंक" width="40%" />
लिंक टाकलेले टेम्प्लेट पेस्ट करून लेखन सुरू करणे.
SAVE बटण दाबल्यावर फोटोसह लेखन दिसेल.
लिंक बदलून फोटोही बदलता येईल .
माझ्या पद्धतीने नवीन प्रतिसाद
माझ्या पद्धतीने नवीन प्रतिसाद, फोटो बदलून.
काही समांतर पद्धत चालवायचा हेतू नाही, पण नवीन पर्याय पुढे ठेवतो आहे.
वाह.. चांगला काम केलंय.. मस्त
वाह.. चांगला काम केलंय.. मस्त
(No subject)
याची चाचणी म्हणून काही लेखात/
याची चाचणी म्हणून काही लेखात/ पाककृतीवर असे चित्र/फोटो चिकटवून पाहिले आहे. त्यामुळे ज्या लेखनात ही चाचणी केली त्यात "बदलून" असे दिसते आहे.>>>
माझा Index investingचा धागा ‘बदलून’ अचानक पहिल्या पानावर आल्यावर अकाउंट हॅक वगैरे झालं की काय अशी शंका आली होती.....
छान सुविधा.
छान सुविधा.
नवीन धागा काढून चेक करायला हवे
प्रतिसादातल्या प्रत्येक फोटोला पटपट अपलोड करता आले मोबाईल ॲप वापरून तर चांगले होईल. सध्या फोटो अपलोड करून ती लिंक एकात कॉपीपेस्ट करून ते पुन्हा पेस्ट करणे त्रासदायक वाटल्याने कित्येकदा फोटो टाकतच नाही.
(No subject)
.
लेखाच्या बाजूला थंबनेल दिसतो
लेखाच्या बाजूला थंबनेल दिसतो हे अजूनच भारी काम केलं.
आता पाककृतींचे फोटो रोज बघता येतील
थंबनेलची सुविधा मस्तच!!
थंबनेलची सुविधा मस्तच!!
मस्त काम केलंत व्यवस्थाक!
मस्त काम केलंत व्यवस्थाक!
हा डिपी फोटो झाला एकप्रकारचा.
हा डिपी फोटो झाला एकप्रकारचा.
आता सगळ्यांचे थंबनेल फोटो
आता सगळ्यांचे थंबनेल फोटो लहान मोठे दिसत आहेत. थंबनेल फोटोचं रिझोल्यूशन काय असायला हंव जेणेकरून ते दिलेली सगळी जागा व्यापतील आणि सगळे फोटो एकाच आकाराचे दिसतील?
चाचणी
चाचणी
खूप चांगली सोय. धन्यवाद.
खूप चांगली सोय. धन्यवाद.
आतापर्यंत दोन नव्हे तर तीन पायर्या होत्या ना?. किमान पाककृतींसाठी तरी , मुख्य लेखनात फोटो अपलोड करता येत नसे. प्रतिसाद विंडोत अपलोड करून तो अॅड्रेस मुख्य लेखात द्यावा लागे. आता खूपच सोपं होईल.
असा सरळ लेखात अपलोड केलेला फोटो खाजगी जागेतही आपोआप येणार आहे की त्याची गरज नाही?
@ऋन्मेऽऽष
@ऋन्मेऽऽष
एकदा फोटो अपलोड झाल्यावर त्या अपलोड झालेल्या इमेजवर टीचकी मारली तर ती लिंक आपोआप इथल्या लेखनाच्या खीडकीत दिसायला हवी. मुद्दाम कॉपी+पेस्ट वेगळे करायला लागू नये.
@ बोकलत, सगळ्या थंबनेल एका आकाराच्या आपोआप असाव्यात असा प्रयत्न आहे. अजून काही त्रुटी राहिल्या आहेत.
@भरत हा मुख्य फोटो खाजगी जागेत असणार नाही त्यामुळे तो जागाही घेणार नाही.
हा मुख्य फोटो DP आहे.
हा मुख्य फोटो
DP आहे.
(No subject)
छान सोय! धन्यवाद!
थंबनेलची सुविधा मस्तच!!
थंबनेलची सुविधा मस्तच!!
+७८६
पण त्याचबरोबर प्रतिसादात आयडीनावासह डीपीचा थंबनेल, जसे फेसबूक ऑर्कुटमध्ये असते तसेही द्या की मस्त यंग आणि फ्रेश लूक येईल माबोला
IMG-20200910-WA0000.jpg
IMG-20200910-WA0000.jpg
वेमा हा फोटो मला अमानवीय ३
वेमा हा फोटो मला अमानवीय ३ धाग्यावर थंबनेल म्हणून टाकून द्या ना.
@बोकलत,
@बोकलत,
ह्या फोटोचे प्रताधिकार कुणाकडे आहेत किंवा हा प्रताधिकार मुक्त आहे का? तुमच्याकडे या फोटोचे नसतील तर टाकणे योग्य नाही. त्या ऐवजी
हा लेख पहा आणि प्रताधिकारमुक्त फोटो सुचवा.
@वेमा, तो फोटो मी गुगलवर
@वेमा, तो फोटो मी गुगलवर Creative commons लिसेन्सेस वापरून सर्च केला होता. पण आता माहिती काढल्यावर समजतंय त्यावरही कॉपीराईट यायचे चान्सेस असतात त्यामुळे तुम्ही हा फोटो टाका अमानवीय धाग्यावर. धन्यवाद.
https://www.pxfuel.com/en/free-photo-oikpo
फोटो थंबनेल ठेवल्याबद्दल वेमा
फोटो थंबनेल ठेवल्याबद्दल वेमा तुम्हाला मनापासून धन्यवाद.
रेसिपी चा मुख्य फोटो लोड होत
रेसिपी चा मुख्य फोटो लोड झाला.
रेसिपी एडिट करता येत नाहिये.. आतमधे पण सेम फोटो आहे.. तो काढून टाकायचा आहे.
मायबोली अँपवरून फोटो देण्याची
मायबोली अँपवरून फोटो देण्याची काही वेगळी पद्धत आहे का? किती महिने झाले प्रयत्न करतेय मी पण नाहीच अपलोड करता येत.
@mrunali.samad बदल केला आहे.
@mrunali.samad बदल केला आहे.
@पिन्कि ८० तुमची चूक नाही अॅप मधे काही बदल आवश्यक आहे त्यावर काम सुरु आहे.
धन्यवाद webmaster
धन्यवाद webmaster
Pages